Home » Gaslighting चा रिलेशनशिपवर होतो असा परिणाम

Gaslighting चा रिलेशनशिपवर होतो असा परिणाम

by Team Gajawaja
0 comment
gaslighting
Share

सध्या रिलेशनशिपमध्ये गॅसलाइटिंग शब्दाचा अधिक वापर केला जात आहे. खरंतर गॅसलाइटिंग हे एक प्रकारचे मानसिक आणि भावनात्मक शोषणाचे रूप आहे. जे नाते मोडणे किंवा नात्यात मानसिक छळ होण्यामागील फार मोठे कारण असते. नात्यात गॅसलाइटिंग (Gaslighting) म्हणजेच पार्टनरचा छळ करणे. याचा नात्यावर भावनात्मक रुपात फार मोठा परिणाम होतो. अशा स्थितीत पार्टनरला मानसिक रुपात आपण ब्रेक झाल्याचे वाटत राहते.

वेबएमडीच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला पटवून देते की तो किंवा ती चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे किंवा विचार करत आहे आणि तो किंवा ती काय विचार करत आहे किंवा करत आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी घटनांचा चुकीचा अर्थ लावतो. खरं तर ते बरोबर आहे.

गॅसलाइटिंग हा अनहेल्दी रिलेशनशिपचा एक मोठा सर्वसामान्य प्रकार आहे. ही स्थिती नात्यात कधीही उद्भवू शकते. याच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर भावनात्मक रुपात चुकीच्या गोष्टी त्यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. याचा इतका प्रभाव पाडला जातो की, त्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो. जसे की, माफी मागणे किंवा इमोशनल बोलणे.

गॅसलाइटिंग कसे ओळखाल?
-सर्रास खोटं बोलणे
-सत्य कळल्यानंतर ही स्विकार न करणे
-आपल्या निर्णय किंवा मतांबद्दल मनात शंका निर्माण होणे
-दुसऱ्यांचा विश्वास मोडण्याचा प्रयत्न करणे आणि दुसऱ्यांना भेटण्यापासून अडवणूक करणे
-वेळोवेळी तुम्हाला चुकीचे ठरविणे, जेणेकरून तुमच्या सर्व अपेक्षा संपल्या जातील

गॅसलाइटिंगमुळे तुमचे मानसिक आरोग्य प्रभावित होते. तुम्ही इमोशनल अब्युजचे शिकार झाल्याने नात्यात विश्वास राहत नाही. तुम्हाला खरं काय खोटं काय हे ओळखण्यास समस्या येते.(Gaslighting)

हेही वाचा- तुमच्या नात्यात Ego येतोय ‘या’ संकेतांवरून ओळखा

असा करा बचाव
-संकेत ओळखा की, तुमच्यासोबत सुद्धा गॅसलाइटिंग होत नाहीयं ना
-जर तुम्ही गॅसलाइटिंगच्या समस्येचा सामना करत असाल तर नात्यात थोडा ब्रेक घ्या आणि खरं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा
-आपल्या वागण्याबोलण्यात बदल करा
-आधीपेक्षा अधिक सेल्फ केअरवर लक्ष द्या
-या स्थितीतून दूर राहण्यासाठी घरातील मंडळींची मदत घ्या
-तुम्ही प्रोफेशनल एक्सपर्टची सुद्धा मदत घेऊ शकता

त्यामुळे तुम्ही सुद्धा गॅसलाइटिंगच्या समस्येचा सामना करत असाल तर वेळीच याचे संकेत ओळखा. अन्यथा तुम्ही तणावाखाली जाऊ शकता. अधिक तणावाच्या स्थितीत तुम्ही टोकाचे पाऊल उचलताना सुद्धा काहीही विचार करत नाही. त्यामुळे स्वत:ला अशा समस्येपासून वेळीच सावरा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.