गॅस सिलिंडर हा आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. याच कारमामुळे भारत सरकारच्या उज्जवला योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील लोकांसाठी नि:शुल्क एलपीजी गॅस सिलिंडर दिला जातो. घरात कोणताही लहान किंवा मोठा सिलिंडरचा वापर हा बहुतांश जण करतात. परंतु तुम्ही कधी सिलिंडरचे निरिक्षण केले आहे का किंवा तुम्ही गॅस सिलिंडरच्या खाली असलेल्या लहान लहान होल्सकडे पाहिले आहे का? (Gas cylinder holes)
तुम्ही कधीतरी नोटीस केले असेल की सिलिंडरच्या खालील बाजूस काही लहान होल्स असतात. परंतु ते होल्स नेमके का दिले जातात आणि त्याचे काय काम असा प्रश्न तर पडलाच असेल ना?जर तुम्हाला हे होल्स डिझाइनिंगसाठी आहे असे वाटत असेल तर तसे अजिबात नाही. कारण ते त्यामागे काही कारण आहेत. तर जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.
गॅस सिलिंडरच्या खालील बाजूस होल्स का असतात?
गॅस सिलिंडरच्या आतमध्ये भरलेला एलपीजी गॅसचे तापमान नियंत्रित करण्यासाठी या होल्सचा वापर केला जातो. काही वेळेस असे होते की, गॅस सिलिंडरचे तापमान अधिक वाढले जाते. अशातच या होल्समधून हवा पास होते जी गॅसमधील तापमान नियंत्रित करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त ते सिलिंडर खालून तापू नये म्हणून ही मदत करतात.

आता अजून एक प्रश्न उभा राहतो की, सिलिंडर(Gas cylinder holes) हा नेहमीच सिलेंड्रिकल शेपमध्येच का असतो किंवा अन्य आकारामध्ये का नसतो. तर यामागे सुद्धा विज्ञान आहे. खरंतर सिलेंड्रिकल शेपमध्ये गॅस आणि तेल समान प्रमाणात पसरतात. अशातच तो गॅस साठवून ठेवण्यासाठी सुरक्षित ऑप्शन असतो.
जर गॅस सिलिंडरमध्ये हे होल्स नसतील तर हवा सिलिंडरच्या रिंगमध्ये अडकून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्याचसोबत त्याची स्वच्छता सुद्धा अगदी सहज करता येतेच पण तो धुतला ही जाऊ शकतो. होल्स असल्याने तो धुतला तरीही त्यामध्ये पाणी अडकून राहत नाही, त्यामुळेच आपण अत्यंत सुरक्षितपणे सिलिंडरचा वापर करु शकतो.
हे देखील वाचा- बिहारचा ‘शुगर फ्री आंबा’ रंगवतोय चर्चा, १६ वेळा बदलतो रंग
गॅस मधून दुर्गंध का येतो?
तुम्हाला माहिती नसेल, पण एलपीजी गॅसला कोणताही वास नसतो. परंतु सिलिंडर भरण्यासह यामध्ये Ethyl Mercaptan नावाचा आणखी एक गॅस भरला जातो. हे अशासाठी केले जाते की, जेणेकरुन गॅस लीक झाला तरीही त्यामधून दुर्गंध वास येईल. त्याचसोबत लोकांसोबत होणाऱ्या अपघातापासून दूर राहता येईल. आणखी महत्वाचे म्हणजे त्याचा रंग लाल असण्यामागील कारण असे की, तो दूरवरुन सुद्धा दिसू शकतो.