Home » पुढच्या वर्षी थाटात या बाप्पा…

पुढच्या वर्षी थाटात या बाप्पा…

by Correspondent
0 comment
Share

गेले १० दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज वेळ आली आहे बाप्पाला निरोप देण्याची. आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाचा दिवस. सर्वच गणेश भक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात आपल्या बाप्पाला निरोप देणार.

दर वर्षी ज्या मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन होत असतं तेवढ्याच उत्साहात बाप्पा निरोप देखील दिला जातो. ढोल-ताशे, वाजत गाजत, गुलाल उधळत बाप्पाची स्वारी निघते. लाखो गणेश भक्त आपल्या बाप्पा निरोप द्यायला तसेच बाप्पाचे विविध आणि उंच रूप पाहायला पुन्हा एकदा रस्त्यावर दिसत असतात. मात्र या वर्षी जरा वेगळे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा केला गेला. याच संदर्भात आम्ही मुंबईतील काही नामांकित मंडळांची काही मत जाणून घेतली आहेत.



उत्साह आहे पण जल्लोष नाही
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज आपल्याला देखील या समाजासाठी काही तरी करणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य उत्सव सारख्या गोष्टींमुळे आज गणेशोत्सव मंडळांनी सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
यंदाच्या वर्षी जल्लोष जरी तितक्या मोठ्या प्रमाणात नसला तरी जबाबदारी किती तरी मोठी होती आणि सर्वच गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांनी व्यवस्थित रित्या पार पाडली आहे असे मत काळाचौकीचा महागणपती मंडळाचे अध्यक्ष विजय लिपारे यांनी व्यक्त केले.

या वर्षाची सर्व कसर पुढच्या वर्षी भरून काढू

पर्यावरणाचा राजा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध गिरगांवचा राजाचे यंदा ९३ वे वर्ष असून यंदा या मंडळाची सध्या शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. मुंबईतील सर्वच मंडळांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात या मंडळाने देखील खारीचा वाटा उचलण्याचा ठरवले. फिझिकल डिस्टनसिंग आणि इतर सर्व नियम पाळत हा उत्सव साजरा करण्यात आला मात्र या वर्षाची सर्व कसर पुढच्या वर्षी पूर्ण करू असे गिरगांवचा राजा मंडळाचे गणेश लिंगायत यांनी क-फॅक्टसशी बोलताना सांगितले.

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे का होईना पण टिळकांच्या मनातला उत्सव आणि गिरगांवच्या राजाची ख्याती असलेला पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्यात आला याचा नक्कीच आनंद आहे. जाताजाता बाप्पाला हीच विनवणी असेल की हे विघ्नहर्ता हे संकट लवकर टळो आणि पुढच्या वर्षी तुझ्या भक्तांना थेट तुझ्या चरणा पाशी आसरा मिळो असे मत देखील गणेश लिंगायत यांनी व्यक्त केले.

हे वर्ष कधीच विसरता येणार नाही

यंदाच्या वर्षी जगभरावर कोरोनाचे संकट पसरले आहे. कोरोनामुळे सर्वच साणांवर मोठा फटका बसला आहे. दरवर्षी मुंबई आपल्या उंच मूर्ती, दिमाखदार देखावे, भव्य दिव्य आगमन आणि विसर्जनसाठी ओळखली जाते. मात्र या वर्षी हे काहीच शक्य झाले. मंडळांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे नक्कीच कौतुक आहे मात्र तो ढोल पथकांसह वाजत गाजत जल्लोष बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करणे शक्य नसल्याचे खंत नक्कीच आहे.

दार वर्षी लाखो भाविक खेतवाडीतील गणेशोत्सव पाहायला गर्दी करत असतात मात्र यंदा पहिल्यांदा गणेशोत्सव असताना देखील वेगळीच शांतता पसरली होती जे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले असे मत मुंबईचा सम्राट मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.