Home » Ganesh Chaturthi : जाणून घ्या मानवी मुख असलेल्या अद्भुत गणेश मंदिराबद्दल

Ganesh Chaturthi : जाणून घ्या मानवी मुख असलेल्या अद्भुत गणेश मंदिराबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

सध्या सगळेच वातावरण बाप्पामय झाले आहे. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र त्यांचाच जयघोष आणि त्यांचीच चर्चा होत आहे. आता बाप्पा आले म्हटल्यावर सगळेच लोकं गणेश मंदिरांना भेटी देतात. आपल्या जवळील मंदिरांमध्ये तर लोकं जातात यासोबत जे काही अतिशय खास, खूपच वैशिष्ट्य पूर्ण मंदिरं असतील तिथे जाण्याचा देखील प्लॅन केला जातो. यात अष्टविनायक तर आलेच मात्र याशिवाय अजून जे काही अतिशय खास मंदिरं असतील तिथे देखील भाविक मोठ्या श्रद्धेने जातात. आज आम्ही तुम्हाला गणपतीच्या अशाच एका खास मंदिराबद्दल माहिती देणार आहोत. (Ganpati Temple)

सामान्यपणे गणपती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर सुपासारखे मोठे कान, सोंड असलेली मूर्ती डोळ्यासमोर येते. हेच तर आपल्या बाप्पाचे खरे वैशिष्ट्य आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या ज्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, तिथे बाप्पाचे असे रूप मुळी पाहायलाच मिळत नाही. मग या मंदिरात बाप्पा नक्की कोणत्या वेगळ्या रूपात विराजमान आहेत? चला जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)

भारतातील तामिळनाडू राज्यातील तिरुवरुर जिल्ह्यात गणपतीचे आदि विनायक मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे भगवान गणेशाची पूजा त्यांच्या परिचित गजमुख स्वरूपात नाही तर मानवी चेहऱ्याच्या स्वरूपात केली जाते. तामिळनाडुच्या कूथानुर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेले हे गणेश मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचे नाव आहे आदीविनायक मंदिर असून, अष्टविनायक गणपती म्हणून देखील या मंदिराला ओळखले जाते. शिवाय या मंदिराला नरमुख गणेश मंदिर देखील म्हटले जाते. या मंदिरातील गणपतीची मुर्ती मानवी चेहऱ्याची आहे. जी काळ्या पाषाणात कोरलेली असून, ध्यानस्थ बसलेल्या मानवी चेहऱ्याच्या गणपती बाप्पाची मूर्ती येथे पाहायला मिळते. (Top marathi News)

Ganesh Chaturthi

हे प्राचीन आदी विनायक मंदिर भगवान श्रीरामाशी संबंधित असून येथे दर्शन घेतल्यानेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. दरवर्षी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महागुरू अगस्त्य भगवान आदिविनायकाची पूजा करण्यासाठी येथे येतात. याशिवाय येथे गणेशाची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दूरदूरवरून भाविक येथे पूजेसाठी येतात. या मंदिरात गणेशाच्यासह माता सरस्वतीचेही मंदिर आहे. प्राचीन कवी ओट्टाकुथर यांनी या देवीच्या मंदिराची स्थापना केली. एका मान्यतेनुसार भगवान शंकरांनी गणपतीचा शिरच्छेद केला आणि गजमुख बसविले. मात्र आदी विनायक हा या सगळ्या घटनेच्या आधी असलेला मूळ चेहऱ्याचा गणपती आहे. (Latest Marathi News)

एका आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीराम वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पिंड दान करत होते तेव्हा त्यांनी बनवलेल्या तांदळाचे पिंड किड्यात बदलत होते. श्रीरामांनी जितक्या वेळा तांदळाचे पिंड बनवले तेवढ्यावेळा ते पिंड किड्यात बदलले. शेवटी त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली, मग महादेवाने त्यांना आदिविनायक मंदिरात जाऊन पूजा करण्यास सांगितले. यानंतर भगवान राम आदि विनायक मंदिरात आले आणि महाराज दशरथासाठी पूजा केली. त्यांनी बनवलेल्या तांदळाचे चार गोळे नंतर शिवलिंगात रुपांतरित झाले , ते आदिविनायक मंदिराजवळ असलेल्या मुक्तेश्वर महादेव मंदिरात स्थापित केले आहेत. (Top Trending News)

========

Gauri Pujan : गौरी अर्थात महालक्ष्मी सणाची संपूर्ण माहिती

Ovsa : कोकणात साजरा होणारा ओवसा म्हणजे काय?

========

या मंदिरात भगवान रामाने महाराज दशरथ आणि त्यांच्या पूर्वजांना केलेल्या पिंडदाना नंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी येथे येतात. तिलतर्पणपुरी हा देखील दोन शब्दांपासून बनलेला आहे, तिलतर्पण म्हणजे पूर्वजांच्या मुक्तीशी संबंधित आणि पुरी म्हणजे शहर. त्यामुळे या ठिकाणाला पितरांचे मोक्ष किंवा मुक्ती नगरी म्हटले जाते. पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी, पिंड दान नदीच्या काठावर केले जाते परंतु धार्मिक विधी मंदिरातच होतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.