Home » ‘स्कूप’ विरोधात गँगस्टर छोटा राजन कोर्टात

‘स्कूप’ विरोधात गँगस्टर छोटा राजन कोर्टात

by Team Gajawaja
0 comment
Scoop Webseries
Share

गुन्हेगारी आणि त्या गुन्हेगारीच्या बातम्या करणारे पत्रकार यांच्यावर आधारित असणारी स्कूप ही वेबसिरिज नुकतीच ओटीटीवर रिलीज झाली आहे. स्कॅम या हर्षद मेहतावरील गाजलेल्या वेबसिरिजचे निर्माते हंसल मेहता यांचीच ही स्कूप वेबसरीज आहे. नेटफ्लिक्सवर 2 जून रोजी प्रदर्शित झालेली स्कूप वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यात करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत असून या क्राइम थ्रिलर वेबसिरीजला चांगले रेटींग मिळाले आहे. मात्र हंसल मेहतांच्या स्कॅम सारखीच ही वेबसिरीजही वादात अडकली आहे. गॅंगस्टर छोटा राजन यांनी या वेबसिरीजविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आहे. या स्कूपमध्ये छोटा राजनचे नाव जसेच्या तसे वापरले गेले आहे, यावर आक्षेप घेत राजननं कोर्टात धाव घेतली आहे.  

हंसल मेहता यांची स्कूप ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर हिट ठरली आहे. सध्या ओटीटीवर चालू असलेल्या क्राइम थ्रिलर वेबसिरजमध्ये स्कूपनं बाजी मारली आहे. मात्र आता ही वेबसिरिज कार्टोच्या फे-यात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण स्कूप विरोधात गँगस्टर छोटा राजनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या वेबसिरीजमध्ये वास्तवात असलेल्या सर्वंच पात्रांची नाव बदलली गेली आहेत. अपवाद फक्त छोटा राजनच्या नावाचा आहे. यालाच त्यानं आक्षेप घेतला आहे. इतर सर्वांची नावं बदलली, शिक्षा झालेल्या इतरांचीही नावं बदललीत मग केवळ माझंच खरं नाव का कायम ठेवलं? असा सवाल छोटा राजन याने याचिकेतून केला आहे. याशिवाय या वेब सीरीजमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा राजनचा दावा आहे.  या छोटा राजनच्या याचिकेवरील सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब झाली आहे.  

हंसल मेहता यांची अंडरवर्ल्ड,  दहशतवाद, गुन्हेगारी या सर्व विषयांवरील स्कूप वेबसिरीज सध्या गाजत आहे. जिग्ना व्होरा या क्राइम पत्रकारानं स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्कावर ही वेबसिरीज आधारित आहे. यात छोटा राजनची भूमिका महत्त्वाची असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण ही वेब सीरिज रिलीज करण्याआधी माझी पूर्व सहमती न घेता माझी प्रतिमा मलीन केली गेली आहे, असा दावा छोटा राजननं कोर्टात केला आहे. छोटा राजन सध्या तिहार जेलमध्ये आहे. वेबसिरीज प्रदर्शित होण्यापूर्वी कोर्टाने ही सीरिज थांबवावी आणि त्याचा ट्रेलर काढून टाकावा अशी मागणीही छोटा राजनने केली होती.  मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आणि वेबसिरीज प्रदर्शित झाली.  ‘स्कूप’मध्ये करिश्मा तन्ना, हरमन बावेजा, मोहम्मद झीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी, देवेन भोजानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

=========

हे देखील वाचा : 72 हुरें ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एकच खळबळ…

========

Behind Bars in Byculla: My Days in Prison  या आत्मचरित्रात्मक पुस्तकात जिग्ना व्होरा यांनी त्यांच्याबाबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची मांडणी केली आहे.  पत्रकार जिग्ना व्होरा यांच्यावर ज्योतिर्मय डे उर्फ ​​जे डे या वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येचा आरोप होता. जे डे हे अंडरवर्ल्ड आणि पोलिसांच्या बातम्या द्यायचे. जिग्नाही क्राईम रिपोर्टर होती.  स्कूप मध्ये जिग्नाची भूमिका  जागृती पाठक नावाची पत्रकार करत आहे.  तिला एका सहकारी पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करून मुंबई पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. तुरुंगात तिच्याबरोबर काय झाले,  तिला तुरुंगातून बाहेर पडू न देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावली. हे या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. स्कूपपूर्वी, हंसल मेहता यांनी 2020 मध्ये स्कॅम ही वेबसिरीज प्रदर्शित केली आहे. ही वेबसिरीज सुपरहिट ठरली.  यावेळीही थोडे वाद झाले होते.  पण स्कॅमची बांधणी एवढी पक्की होती की, त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.  स्कूपही त्याच वाटेवर असली तरी त्याचे शेवटचे दोन भाग कंटाळवाणे वाटत आहेत.   स्कूपमध्ये पत्रकार, गुन्हेगारी जगत, पोलीसांची भूमिका या सर्वात राजकारण या सर्वांची भेसळ झाल्यासारखे वाटते.  मुळात जिग्ना वोरा यांचे पुस्तक एकांगी असल्याचा आरोप पुस्तक प्रकाशित झाल्यावर करण्यात आला होता.  त्याच्यावरच आधारित या वेबसिरिजवर आता छोट राजन नाराज झाला आहे.  या बाबत कोर्ट काय भूमिका घेणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.