Home » कोकणात गणपतीमध्ये रेल्वे गाड्यांची रांग लागणार

कोकणात गणपतीमध्ये रेल्वे गाड्यांची रांग लागणार

by Team Gajawaja
0 comment
Special Konkan Trains
Share

जुलै महिना सुरु झाला की कोकणवासीयांची तयारी सुरु होते ती गणपतीबाप्प्याच्या आगमनासाठी. देशभरातच काय पण जगभरात कुठेही कोकणी माणूस रहात असेल तरी तो गणेशोत्सवासाठी कोकणात नक्की येतोच. यासाठी पहिली तयारी म्हणजे, कोकणात जाणा-या रेल्वेगाड्यंचे बुकींग करणे. कारण कोकणात गणेशोत्सवासाठी एवढे चाकरमानी जातात की रेल्वे प्रशासनाने कितीही गाड्या सोडल्या तरी त्या कमीच पडतात. यावर्षी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने २०२ विशेष गाड्या सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच पश्चिम रेल्वेनेही गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. य़ा सात गाड्या असून त्यामुळे कोकणात जाणा-या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. (Special Konkan Trains)

होळी आणि गणशोत्सव हे कोकणातील प्रमुख सण आहेत. कोकणी माणूस या दोन्ही सणांसाठी आपल्या गावाला जातोच. मात्र या सणांमध्ये जायचे कसे हा पहिला प्रश्न असतो. कारण गाडीनं कोकणात मुंबईहून जायला साधारण १० ते १५ तासांचा अवघी लागतो. त्यातही रस्ते कसे आहेत, ट्रॅफीक किती आहे, पाऊस कसा आहे, यावर हा वेळ अवलंबून असतो. ब-याचवेळा गणपतीला गावाला जाणारे चाकरमानी आपल्या कुटुंबासह हा प्रवास करतात. अशावेळी भरपूर सामान सोबत असते. या सर्वांची पहिली पसंती असते ती रेल्वेगाडीला. पण कोकणात गणपती उत्सवासाठी जेवढ्या रेल्वे गाड्या सोडल्या जातात, तेवढ्या कमी पडतात, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

मात्र यावर्षी मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेनेही गणेशभक्तांसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. मध्ये रेल्वेनं २०२ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यात मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११५१, मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११५३, एलटीटी – कुडाळ डेली स्पेशल (३६ ट्रिप) – ट्रेन क्र. ०११६७, एलटीटी – सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११७१, दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकुन ३६ फेर्या) ०११५५ मेमू स्पेशल दिवा, एलटीटी – कुडाळ स्पेशल (१६ सहली) – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०११८५., एलटीटी कुडाळ स्पेशल (६ सहली) – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०११६५ या गाड्यांचा समावेश आहे. (Special Konkan Trains)

याशिवाय कोकणातील गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेने आणखी विशेष गाड्या चालवण्याचे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, विश्वामित्री-कुडाळ आणि अहमदाबाद-मंगळुरू दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक विशेष, ट्रेन क्रमांक ०९००१/०९००२, मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड वीक, गाडी क्रमांक ०९००९/०९०१०, वांद्रे ते कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी, गाडी क्रमांक ०९०१५/०९०१६, अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी, गाडी क्रमांक ०९४१२/०९४११, विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक विशेष भाडे गाडी, गाडी क्रमांक ०९१५०/०९१४९, अहमदाबाद ते मंगळुरू साप्ताहिक विशेष गाडी, गाडी क्रमांक ०९४२४/०९४२३.

=================

हे देखील वाचा:  मुंबई रेल्वे स्थानकांच्या नावामागची कथा

==================

मध्यरेल्वेने सोडलेल्या २०२ गाड्यांचे बुकींगही सुरु झाले आहे. यातील बहुतांश गाड्या बुकही झाल्या आहेत. यातील मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी दैनिक विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या होणार आहे. ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोकणात जाणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे या गाडीला थांबे असणार आहेत. मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी दैनिक विशेष गाडीच्याही ३६ फे-या होणार आहेत. ही गाडीही १ ते १८ सप्टेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज सकाळी ११:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत पोहचेल. त्यानंतर ती पहाटे ४ वाजता रत्नागिरीहून सुटणार आहे. दुपारी दिड वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहचणार आहे. यावर्षी सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा भक्तांच्या घरी येणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी चाकरमानी आत्तापासून तयारीला लागले आहेत. (Special Konkan Trains)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.