आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. बोलता बोलता बाप्पांच्या निरोपाची वेळ आली देखील. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पांचे सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन झाले. आज बाप्पा येऊन दहा दिवस झाले आणि आता बाप्पा आपला निरोप घेऊन निघणार. बाप्पाना निरोप दयायला कोणाचं आवडत नाही. मात्र रीत आहे. आणि तसेही आज निरोप दिला नाही तर पुढच्या वर्षी बाप्पा कसे येणार. या संपूर्ण गणेशोत्सवात आपण दररोज अष्टविनायकातील एका गणपतीची माहिती जाणून घेतली. सोबतच पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास देखील पाहिला. आज गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आपण मुंबईतील जगप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक गणपतीची माहिती जाणून घेणार आहोत. (Marathi)
मूंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले सिद्धिविनायक मंदिर कोणाला माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे. दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात रेलचेल असते. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन आणि मोठा इतिहास आहे. (Ganesh Chaturthi)
सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास
तब्बल २२५ वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर बांधल्याच्या नोंदी सापडतात. १९ नोव्हेंबर १८०१ रोजी हे सिद्धिविनायक मंदिर बांधण्यात आले. मंदिराची मूळ रचना घुमटाकार आहे. लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील नावाच्या दाम्पत्याने हे सिद्धिविनायक मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. माटुंगा परिसरात राहणाऱ्या देऊबाई पाटील या सधन घरातील होत्या. मात्र असे असूनही त्या नांदी नव्हत्या. याचे कारण म्हणजे देऊबाई पाटील यांना मूल होत नव्हते. त्यांच्या घरी सिद्धिविनायक गणपतीचा एक फोटो होतो. त्या दररोज मनोभावे या फोटोची पूजा करायच्या. देऊबाई यांनी त्यांना मुल झाल्यास मी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधेल असा नवस केला. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मूल झाले. (Ganeshotsav)
मूल झाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण केला. सन १८०१ मध्ये त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर बांधले. याचा सर्व खर्च पाटील कुटुंबानेच केला. मूळ सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप लहान होते. सुरुवातीला विटांचा वापर करुन घुमटाकार रचना असलेले हे मंदिर बांधण्यात आले. मात्र पुढे काही वर्षांनी याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यानंतर या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी देऊबाई पाटील यांची इच्छा होती. (Marathi News)
सिद्धिविनायक नाव कसे पडले?
सिद्धिविनायक हे श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रुपांपैकी एक रुप आहे. गणपतीच्या या रुपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. एका माहितीनुसार, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे म्हटले जाते. म्हणूनच गणपतीच्या या स्वरुपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत आचरणे कठीण असते, असे मानले जाते. अशा गणपतीचे सोवळे देखील अधिक असते. (Latest Marathi Headline)
सिद्धिविनायक मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती अडीच फूट रुंद असून ती मूर्ती पाषाणाची आहे. श्री गणेशाच्या मूर्तीची सोंड उजवीकडे असून, त्याला चार हात आहेत आणि त्यामुळे त्याला ‘चतुर्भुज’ असेही म्हणतात. श्री गणेशाच्या मुर्तीमध्ये वरच्या उजव्या हातात कमळ, वरच्या डाव्या हातात एक छोटी कुऱ्हाड आणि खालच्या डाव्या हातात पुष्पहार आणि त्यांच्या आवडत्या ‘मोदकाने’ भरलेली वाटी आहे. या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती विराजमान झाले आहेत. या मंदिरात गणपतीचे वाहन असलेल्या उंदराच्या दोन चांदीच्या मूर्त्या आहेत. गणपतीचे हे स्वरुप अत्यंत मनमोहक, प्रसन्नता देणारे आणि मनःशांतीदायक असेच आहे. सिद्धिविनायक मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो. (Todays Marathi Headline)
वास्तुविशारद शरद आठले यांनी मंदिराच्या डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी राजस्थान आणि तामिळनाडूमधील मंदिरांचा अभ्यास केला. सर्व आवश्यक व्यवस्था केल्यानंतर १९९० साली सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. देवतेची जुनी मूर्ती सोन्याचा मुलामा असलेल्या घुमटाच्या वर बांधलेली, बहुकोनी सहा मजली ठेवण्यात आली होती. आत जाण्यासाठी तीन मुख्य प्रवेशद्वार करण्यात आले असून या मंदिराच्या मुकुटालाही नवे रूप देण्यात आले आहे. (Top Marathi Headline)
श्री सिद्धिविनायक मंदिर हे प्राचीन हिंदू मंदिर स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराला सुंदर लाकडी दरवाजा आहे ज्यामध्ये भगवान गणेश आणि इतर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिरात एक प्रशस्त सभा मंडप आणि गर्भगृह आहे जिथे गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मूळ सिद्धिविनायक मंदिराची प्राचीन स्थापत्य शैली होती, ज्यामध्ये सभामंडप, गर्भगृह, काही मोकळी जागा आणि समोर पाण्याचे टाके होते. आतील गाभारा आणि मध्यवर्ती गणेशमूर्ती सोन्याने मढवलेली आहे. मंदिराचा बाह्य भाग सहा मजली, बहुकोणीय आणि मुख्य मध्यवर्ती घुमट सोन्याचा मुलामा आहे. मुख्य घुमटासह, ३७ इतर लहान सोनेरी घुमट मंदिराच्या संरचनेत योगदान देतात. मंदिराच्या बाहेरील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी विशेष गुलाबी संगमरवरी आणि ग्रॅनाइटचा वापर केला जातो. (Marathi Latest News)
श्रीमंत देवस्थान
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. सर्व जाती धर्माचे सर्वसामान्य नागरिक ते अगदी लोकप्रिय सेलिब्रेटीं बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत या मंदिराला स्थान मिळाले आहे. यापैकी एक मंदिर हे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे १६० किलो सोने आहे. मंदिराचा गाभारा हा ३.७ किलो सोन्याने मढवलेला आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे १२५ कोटींपेक्षा जास्त रुपये मिळते. (Top Trenidng News)
=========
Anant Chaturdashi : जाणून घ्या अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्याचा शुभ मुहूर्त
Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीच्या व्रताचे महत्व आणि माहिती
=========
या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे. मंदिराला दान स्वरुपात मिळालेली देणगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी वापरली जाते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन वैद्यकिय, शैक्षणिक तसेच गरजूंनाआर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक ट्रस्ट सामान्यांच्या मदतीला धावून जातो. नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या या मंदिराला प्रत्येकाने भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा. (Social News)