परवापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. ज्या सणाची वर्षभर सगळेच आतुरतेने वाट बघत असतात, तो सना आता अवघ्या काही दोन दिवसांवर आला आहे. सगळीकडे बाप्पांचीच आगमची आणि स्वागताची संपूर्ण तयारी झाली असून, आता फक्त बाप्पा कधी येताय याचीच सगळे वाट बघत आहे. गणेशोत्सवाची धूम संपूर्ण देशामध्येच असते, मात्र महाराष्ट्रामध्ये या उत्सवाचे स्वरूप आणि जल्लोष एका वेगळ्याच उंचीवर पाहायला मिळतो. खासकरून मुंबईचा गणेशोत्सव संपूर्ण जगाचे आकर्षण असते. उंच आणि भव्य गणेश मूर्ती कायम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. आता गणेशोत्सव आणि मुंबई हा विषय निघाला की लगेच आठवतो तो ‘लालबागचा राजा’. लालबागच्या राजाची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. मुंबईच्या गणपती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘लालबागचा राजा’ गणपती. (Lalbaughcha Raja)
गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये लाखो भाविक या गणपतीचे दर्शन घेतात. आमपासून खासपर्यंत सर्वच बाप्पाचे रूप डोळ्यात साठवतात. नवसाला पावणाऱ्या या गणपतीचे नुकतेच यंदाचे प्रथम दर्शन भाविकांना मिळाले. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी बाप्पाचे भाविकांना दर्शन मिळाले. यंदा देखील बापापाचे रूप अतिशय विलोभनीय, भव्य आणि साजिरे आहे. बाप्पाला पाहून भक्तांच्या डोळ्यातून केवळ आनंदाश्रू निघत असल्याचे चित्र दिसले. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला असून, त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. (Ganeshotsav 2025)
=========
Religious : देवाची आरती करण्याचे महत्व
=========
लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पा ऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळत आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल ५० फूटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज लालबागचा राजा ही मुंबईची ओळख आहे. मात्र या गणपतीची सुरुवात कशी झाली? बाप्पाची कीर्ती कशी पसरत गेली? लालबागच्या राजाचा इतिहास नक्की काय आहे? याची माहिती आपण जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
मुंबईत १९३४ च्या काळात व्यापार खूपच मोठ्या प्रमाणात सुरु झाला होता. अनेक लहान मोठे व्यापार उद्योग त्याकाळी मुंबईत सुरु होते. समुद्रकिनारा जवळ असल्याने ब्रिटिशांना व्यापारासाठी सागरी मार्ग सहज उपलब्ध होता. हळूहळू मुंबईत टेक्स्टाईलचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढू लागला. मुंबईच्या परळ भागात कापड गिरण्या अस्तित्वात आल्या. लालबाग परळ या भागात अनेक कापड गिरण्या बांधण्यात आल्या. यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला. ज्या लोकांना गिरण्यांमध्ये काम मिळाले ते कामगार लालबाग परळमध्ये राहू लागले. यामुळे लालबाग परळमध्ये हळूहळू रहिवासी वस्तीचा विकास होऊ लागला. मुंबईचा देखील झपाट्याने विकास होऊ लागला. (Latest Marathi Headline)
मात्र कापड गिरण्यांचा विकास वाढत असताना कारखान्यासाठी जागा कमी पडू लागली. मग त्याकाळी इंग्रजांनी लालबाग परळमधील पेरू चाळ हटवून तिथे कारखाना बांधण्याची योजना आखली. तिथल्या मासेविक्री करणाऱ्या लोकांपुढे आता प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या व्यवसायावर गदा येणार होती. त्याकाळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मुंबईत देखील हा उत्सव काही ठिकाणी साजरा केला जात होता. मग सर्व मासेविक्रेत्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाला नवस केला. हे बाप्पा आमच्या व्यवसायाला हक्काची जागा मिळू दे. यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले. एक वर्षभरात या मासेविक्रेत्यांना मार्केट मिळाले. (Top marathi Headline)
सन १९३४ मध्ये लालबागच्या या मार्केटमध्ये सर्व मासेविक्रेत्यानी गणपतीची मूर्ती आणून तिची गणेशोत्सवात स्थापना केली. या मूर्तीची पहिल्या वर्षातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख झाली. तसेच तो लालबाग परळच्या मार्केटमध्ये बसवण्यात आल्याने त्याला लालबागचा गणपती लोक म्हणून लागले. लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा त्यांचा राजा म्हणजेच त्याची ओळख ‘लालबागचा राजा’ अशी कायमची झाली. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने आजही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कित्येक तास रांगेत उभे राहतात आणि आपल्या लाडक्या राजाचे दर्शन घेतात. (Latest Marathi News)
लालबागच्या राजाचे वैशिट्य
दरवर्षी बाप्पाची उंची २० फूट इतकीच असते. ह्या गणपतीची मुर्ती बनवायची सुरूवात ही गणपती बाप्पाच्या चरणांपासुन केली जाते, ह्या दिवशी पादय पुजन सोहळा देखील आयोजित करण्यात येत असतो. लाल बागच्या राजाची विसर्जणाची मिरवणुक मोठया राजेशाही थाटात काढली जाते. लाल बाग मधुन निघालेली गणपतीची विसर्जन मिरवणुक गिरगाव चौपाटी येथे पोहचायला दुसऱ्या दिवसाची पहाट होते. लालबागच्या राजाची सुरुवात साल १९३४ मध्ये झाली असली तरी लालबागच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीत बदल होत आला आहे. यंदाच्या लालबागच्या राजाची मूर्ती मरुन कलरचे पितांबर नेसलेली आहे. (Marathi Trending News)
=========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
=========
लालबागच्या मूर्तीची निर्मिती साल १९३४ पासून होत असली तरी आठ दशकात राजाच्या मूर्तीची निर्मिती मूर्तीकार कांबळी कुटुंब करीत आले आहे. लालबागच्या गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीमध्ये पूर्वी दरवर्षी बदल होत होते. कधी कृष्ण, कधी श्री राम तर कधी विष्णू अशा रुपात लालबागचा राजा दिसत आले आहेत. लालबागच्या राजाची मूर्ती बालगंधर्व यांच्या रुपातील सुद्धा दिसली. कधी लालबागच्या राजाच्या गणेश मूर्ती शेजारी महात्मा गांधी बसलेले दिसले. त्यानंतर मात्र ही मूर्ती एकच प्रकारची ठेवण्याचे ठरवण्यात आले. मागील अनेक दशकांपासून ही मूर्ती एकाच स्वरूपात असते आणि भक्तांना दर्शन देते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics