Home » जाणून घ्या अनंत चतुर्दशीची माहिती

जाणून घ्या अनंत चतुर्दशीची माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Anant Chaturdashi
Share

ज्या सणाची वर्षभर आपण सगळे आतुरतेने वाट पाहत असतो तो गणेशोत्सव सुरु होऊन आता दहा दिवस पूर्ण होत आले आहे. म्हणूनच आता लगबग सुरु झाली आहे ती बाप्पाच्या विसर्जनाची. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला, बाप्पा त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघतात. उद्या अर्थात १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अर्थात अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होत आहे. या दहा दिवसांमध्ये आपण सगळेच बाप्पाच्या सेवेमध्ये अगदी लिन झालेलो होतो. मात्र आता बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेत त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. जाणून घेऊया लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहोत. त्याचा विधी आणि शुभ मुहूर्त काय आहेत.

वैदीक पंचांगानुसार अनंत चतुर्दशी या तिथीची सुरुवात १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.१० वाजता सुरु होणार आहे. तर या चतुर्दशीची समाप्ती १७ सप्टेंबर २०२४ रोजी ११.४४ वाजता होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून सुरु होणार असून, हा मुहूर्त सकाळी ११.४४ वाजेपर्यंत असणार आहे.

तर हिंदू वैदिक पंचांगानुसार बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपासून सुरु होणार असून, तो रात्री ९ वाजून २८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अशी मान्यता आहे की, शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने शुभ फलाचा लाभ होतो.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीगणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. या प्रसंगी लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हाताला 14 गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहते, त्याला कशाचीही भीती नसते. श्रीहरींच्या कृपेने त्याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो. त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते.

======

हे देखील वाचा : “पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल

======

अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी एक अवश्य उपाय करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांदल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीचे नदी, तलाव किंवा समुद्रात विसर्जन केले जाते. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी श्रीगणेशाची विधीवत पूजा केली जाते, त्यानंतर फुले व नारळ अर्पण केला जातो. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मूर्ती विसर्जित केली जाते. अनेक लोक अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्याऐवजी गणेश चतुर्थी झाल्यानंतर दीड, तिसऱ्या, पाचव्या किंवा सातव्या दिवशी देखील गणेश विसर्जन करतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.