Home » Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला ‘हे’ वास्तू उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला ‘हे’ वास्तू उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

ज्या पाहुण्याची आपण सर्व आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो, तो बाप्पा आला. केवळ दोनच दिवसात बाप्पाचे सर्वत्र आगमन होत आहे. पुढील दहा दिवस आता सगळीकडे केवळ भक्तिमय आणि बाप्पामय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सावाची सुरुवात होत आहे. यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. चतुर्थीला घरामध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी बाप्पाच्या पूजेदरम्यान काही वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे. गणेश चतुर्थीच्या दिवशी वास्तु नियमांनुसार सजावट आणि बाप्पाची स्थापना केल्यास विशेष शुभ फळ मिळते. (Marathi News)

> गणेशाची मूर्ती स्थापन करण्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यावा. घरात ईशान्य दिशेला मूर्ती स्थापन करण्यासाठी जागा निवडा. येथे पाट किंवा चौरंग मांडून गणपतीची मूर्ती स्थापित करावी. चौरंगा भोवतीचा फुले, केळीची पाने इत्यादींनी आकर्षक सजावट करावी. अशा प्रकारे घरात गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते. (Ganesh Chaturthi)

> जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर चतुर्थीला योग्य पद्धतीने गणपतीची पूजा करा. त्यानंतर मोदक आणि इतर वस्तूंचा नैवेद्य दाखवा. दरम्यान, सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते. (Top Trending Marathi News)

> गणेश चतुर्थीच्या खास दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावा. या ठिकाणी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल, तसेच गणतपी बाप्पा तुमच्या आयुष्यातील चांगले दुःख दूर करेल. (Marathi News)

Ganesh Chaturthi

> धार्मिक मान्यतेनुसार, आर्थिक संकटातून सुटका करुन घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पूजेदरम्यान गणेश स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर गरिबांना दान करावे. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभाची शक्यता देखील निर्माण होते. (Todays Marathi Headline)

> गणेश चतुर्थीच्या काळात घराचा दरवाजा आकर्षक सजवणं खूप शुभ मानलं जातं. दरवाजातून श्री गणेश आपल्या घरात प्रवेश करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यासोबतच, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह देखील काढावे. दारात रांगोळी काढणे देखील खूप शुभ मानले जाते. (Top Trending News)

> जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आनंदावर कधीही वाईट नजर लागू नये असे वात असल्यास चतुर्थीच्या दिवशी गणेशासमोर शेणाच्या पेंडीवर 2 कापूर आणि 6 लवंगा अर्पण कराव्यात. त्यानंतर त्याची राख मुलांच्या कपाळावर लावावी. (Latest Marathi Headline)

> ज्या लोकांना घरात वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे अशा लोकांनी गणेश चतुर्थीच्या बाप्पाची मनोभावे पूजा करावी. तसेच गुळांचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर गाईची सेवा करुन तिला गूळ खाऊ घालावा. असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि घरामध्ये सुरु असलेल्या समस्या हळूहळू दूर व्हायला लागतील. (Top Marathi News)

> गणेश चतुर्थीनिमित्त घराची सजावट करताना, काळा, तपकिरी, गडद निळा रंग वापरणे टाळावे. वास्तुनुसार गणेश चतुर्थीसारख्या धार्मिक प्रसंगी लाल, गुलाबी, पिवळा आणि हिरवा रंग वापरावा. या रंगांचा वापर केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि आपल्याला देवाचे आशीर्वाद देखील मिळतात. (Top Stories)

=========

Hartalika Vrat : हरतालिका व्रताची पूर्वतयारी कशी करावी?

=========

> गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावावा. तुळशीजवळ लावलेला दिवा तुमच्या घरात सकारात्मकता वाढवतो. यासोबतच चतुर्थीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा. वास्तुशास्त्रात हे स्थान देवाला समर्पित मानले जाते. यामुळे धनलाभ होतो. गणेश चतुर्थीला घराच्या स्वयंपाकघरात दिवा लावल्याने तुम्हाला चांगला लाभ होईल. (Social News)

(टीपः हा लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.