Home » Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी

Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashtavinayak
Share

गणेश चतुर्थी झाली. काळ सर्वत्र मोठ्या दणक्यात, वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. आता पुढे दहा दिवस फक्त बाप्पाच्या सेवेमध्ये जाणार आहे. ६४ कलांचा अधिपती असलेला गणपती प्रथमपुज्य आहे. त्याच्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये गणेशाची अनेक ऐतिहासिक, जाज्वल्य मंदिरं आहेत. मात्र महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या महिमा श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रातील हे सर्व अष्टविनायक गणपती खूपच महत्वाचे मानले जातात. काळ गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण अष्टविनायकांमधील पहिल्या मयुरेश्वर मंदिराची माहिती आणि इतिहास पाहिला. आज आपण अष्टविनायकांमधील दुसरा थेऊरचा चिंतामणी गणेशाबद्दल जाणून घेऊया. (Ganeshotsav)

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गणपती म्हणून चिंतामणी गणपती ओळखला जातो. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गणपती असल्याने त्याला चिंतामणी म्हणले जाते. येथील चिंतमणी गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची आहे. तसेच गणपतीच्या डोळ्यात माणिकरत्न आहेत. पुण्यातील पेशवे घराणे श्री गणेशाचे खूप मोठे भक्त होते. पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत दर्शनासाठी येत होते. माधवराव पेशवे यांनी थेऊरचा विस्तार केला, त्यांचे निधनही येथेच झाले. पुणे-सोलापूर महामार्गावरून काही अंतरावर थेऊर गाव असून ते पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. (Todays Marathi Headline)

चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. (Top Trending News)

Ashtavinayak

थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून पुण्यापासून हे ३० किमी अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (Latest Marathi Headline)

चिंतामणी गणपतीची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, राजा अभिजित आणि त्याची पत्नी गुणवती यांना गणसूर नावाचा मुलगा होता. तो एक बलवान पण लोभी राजपुत्र होता. एकदा गाणासुर कपिल ऋषींच्या आश्रमात गेला. एकदा गणासूर नावाचा राक्षस त्यांच्या आश्रमात आश्रयासाठी आला होता. कपिल मुनींजवळ सर्व इच्छा पूरिण करणारे चिंतामणी रत्न होते. त्यावेळी कपिल मुनींनी या रत्नाचा वापर करून पंचपक्वान असलेले भोजन गणासूराला दिले. हे पाहून गणासूर आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनात मुनींजवळ असलेल्या रत्नाचा मोह निर्माण झाला. गणासूराने कपिलमुनींकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली. परंतु मुनींनी ते रत्न देण्यास गणासूराला नकार दिला. परंतु बळाचा वापर करून गणासूराने चिंतामणी रत्न मुनींकडून हिसकावून घेतले. (Top Stories)

=========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

=========

रत्न परत मिळवण्यासाठी कपिलमुनी यांनी तपश्चर्या करून श्री गणेशाला आवाहन केले. मुनींची तपश्चर्या पाहून गणेश भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी थेऊर येथील कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध केला. कपिल मुनींनी परत मिळालेले चितामणी रत्न गणेश भगवंताच्या गळ्यात बांधले. तेव्हापासून येथे गणेश भगवंताना चिंतामणी म्हटले जाऊ लागले. तसेच या ठिकाणाला कदंबनगर म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.