आज गणेश चतुर्थीचा सहावा दिवस असून, आज जेष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे पूजन होत आहे. बाप्पांचे आगमन पाच दिवस झाले. भक्तगण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या गणपती मंदिरांना भेट देत आहेत. अष्टविनायक मंदिरं ही यातलीच मुख्य मंदिरं आहेत. आज आपण अष्टविनायक मंदिरांपैकी आज आपण लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपतीची माहिती जाणून घेऊया. हा एकमेव असा गणपती आहे जो गिरी म्हणजेच पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. गणपती बाप्पाचे हे एकमेव असे रूप आहे जे डोंगरात एका गुहेत आहे. (Top Marathi News)
जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरली आहे. लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते. (Latest Marathi Headline)
श्री गिरिजात्मजाची अख्यायिका
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म दिला. त्यासाठी देवी पार्वतीने लेण्याद्री पर्वतावर कठोर तपश्चर्या केली आणि भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनविली. यानंतर पार्वती देवीने त्यात प्राण फुंकले आणि त्यांच्यासमोर समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला एक बालक प्रकट झाला. याला देवीने विनायक असे नाव दिले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. देवी पार्वतीला गिरीजा देखील म्हटले जाते. त्यामुळे या विनायकाचे नाव गिरिजात्मक पडले. गिरिजात्मक अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिले असे म्हटले जाते. या अवतारात श्री गणेशाने अनेक दैत्यांचा संहार केला अशी अख्यायिका आहे. (Top Trending News)
श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर
लेण्याद्री मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळे या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे असून, मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. (Top Stories)
========
Gauri Pujan : गौरी अर्थात महालक्ष्मी सणाची संपूर्ण माहिती
Ovsa : कोकणात साजरा होणारा ओवसा म्हणजे काय?
========
हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत. मान्यता आहे की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये यात्रेकरू बसून ध्यान करू शकतात. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात २ चैत्यगृहे, २८ विहार, पाण्याची १५ कुंडे आणि ६ शिलालेख आहेत. (Social News)
कसे पोहचणार?
पुण्याहून नाशिक महामार्गाने नारायणगाव-ओझरमार्गे लेण्याद्री : ८९ किमी
पुण्याहून नाशिक महामार्गाने जुन्नरमार्गे लेण्याद्री : ९९ किमी
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics