Home » Ganesh Chaturthi : लाडक्या बाप्पासाठी खास नैवेद्य रेसिपी

Ganesh Chaturthi : लाडक्या बाप्पासाठी खास नैवेद्य रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. डेकोरेशन देखील जवळपास होतच आले असेल. घराची स्वछता झाली असेल, मूर्ती देखील बुक झाली असेल, पूजेची देखील सर्व तयारी झाली. पण एक तयारी मात्र राहिली ती म्हणजे बाप्पाला दाखवण्यात येणार नैवेद्य. गणपती बाप्पाचा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणेशोत्सव म्हटले की मोदक खायला मिळणार याचा आनंद घरातील प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतो. आपल्या महाराष्ट्रात विविध भागात वेगवेगळे प्रकारचे मोदक केले जातात. (Ganpati Bappa)

जसे की, मुंबई आणि कोकणात उकडीचे मोदक तर उर्वरित भागात बहुतांशी तळणीचे मोदक होतात. आता तर मोडकांमध्ये देखल विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. गणेशोत्सव म्हटले की, बाप्पाला सकाळ आणि संध्याकाळी नवनवीन नैवेद्य दाखवायचा असतो. बाजारात तर मिठाई मोदक मिळतात मात्र सणासुदीच्या काळात ते किती चांगले असेल यावर प्रश्न निर्माण होतो. अशावेळेस घरीच सोप्या पद्धतीने बाप्पासाठी विविध प्रकारचा नैवेद्य करणे कधीही उत्तम असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही सोप्या आणि सहज होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत. (Ganesh Chaturthi)

उकडीचे मोदक
साहित्य
७५ ग्रॅम तांदळाचे पिठ, २० किसलेला गुळ,दोन तीन विलायची, २५ ग्रॅम पिठी साखर, आर्धि ओल्या नारळाची किसलेली वाटी,२० ग्रॅम बारीक केलेला सुकामेवा, १० ग्रॅम तुप

कृती
एका भांड्यात वरिल सामग्री घेऊन एकत्रित करा आणि गॅसवर तुपामध्ये परतुन एकजीव करून सारन बनवा. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात तांदळाचे पिठ घ्या त्यात एक चमचा तुप आणि पाण्याचा हबका मारून एकजीव करा मग पिठाचा गोळा तय़ार होईल. त्या पिठाच्या छोट्या आकाराच्या पाऱ्या लाटा. आता तयार पाऱ्यांमध्ये सारण घाला आणि त्याला हलक्या हाताने मोदकाचा आकार द्या. मोदक तयार होतील. नंतर सगळे मोदक एका भांड्यात घेऊन ते १५ ते २० मिनिटे उकडून घ्या. उकडीचे मोदक तयार झाल्यावर बाप्पाला नैवेद्य दाखवा. (Marathi News)

———————————————————————————————————————————

Ganesh Chaturthi

लाल भोपळा आणि मावाचे मोदक
साहित्य
लाल भोपळ्याचा किस ३ वाटी, तेल २ वाटी, खवा अर्धी वाटी, दूध एक वाटी, ५ टेबलस्पून साखर, वेलची पावडर, चिमूटभर मीठ, सुका मेवा, मैदा २ वाटी, दोन टेबलस्पून तूप

कृती
मध्यम गॅसवर कढई ठेऊन त्यात भोपळ्याचा टाकून त्यातील पाणी निघून जाईपर्यंत किस परतून घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात अर्धी वाटी खवा घेऊन त्यात साखर, दूध, मीठ हे सर्व एका पॅन मध्ये मध्यम गॅसवर ५ मिनिटापर्यंत शिजवा. आता परतवलेला भोपळ्याचा किस खव्याच्या मिश्रणात टाका आणि चांगले एकजीव होऊ द्या. शेवटी सुकामेवा घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या. मोदक बनवण्यासाठी कणकेच्या पिठाच्या लाट्या बनवा त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. तयार मोदक तेलात तळून घ्या. (Todays Marathi Headline)

——————————————————————————————————————————–

केसरी मोदक
साहित्य
२ वाटी खवलेला ओला नारळ, अर्धा टेबलस्पून वेलची पावडर, गरजेनुसार केसर, अर्धी वाटी साखर आणि तेल

कृती
एका जाड बुडाच्या कढईमध्ये खोवलेला नारळ आणि साखर टाकून मध्यम गॅसवर परतून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर टाकून एकजीव करा आणि थंड होऊ द्या. नंतर त्यात केसर आणि पिस्ता टाकून एकजीव करून सारण बनवा. त्यानंतर मोदकाच्या साचामध्ये बसेल एवढे सारण टाकून मोदक बनवा. (Top Trending News)

———————————————————————————————————————————

झटपट मलई मोदक
साहित्य
२५० ग्रॅम पनीर, १२५ ग्रॅम पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड.

कृती
पनीर किसून घेऊन ते हाताने छान मळून घ्या. कमीत कमी दहा मिनिटं तरी मळून घ्या. एकजीव करून घेतलेल्या पनीरमध्ये पिठीसाखर घाला. हे मिश्रण तव्यामध्ये घालून अगदी मंद आचेवर पाच ते सात मिनिटं परतून घ्या. मिश्रणाला पाणी अजिबात सुटता कामा नये. नंतर वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. आता मोदक साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या. (Marathi Latest News)

———————————————————————————————————————————

पंचखाद्य
साहित्य
काजू १ कप, सुक खोबरं १ कप, चणा डाळ १ कप, शेंगदाणे १ कप, गुळ १ कप, लाह्या ३ ते ४ कप, पाणी गरजेनुसार, वेलची पावडर

कृती
सगळ्यांत आधी एका कढई गॅसवर ठेवून ती व्यवस्थित गरम होऊ द्यावी. त्यानंतर अनुक्रमे काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे असे सगळे जिन्नस एक एक करून कोरडे भाजून घ्यावेत. आता एक मोठं पातेल घेऊन त्यात किसलेला गूळ आणि गरजेनुसार पाणी घालून या गुळाचा एकतारी पाक तयार करुन घ्यावा. एकतारी पाक तयार झाल्यानंतर त्यात सगळे भाजून घेतलेले जिन्नस व वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यावेत. त्यानंतर या मिश्रणात लाह्या घालूंन सगळे जिन्नस गुळाच्या पाकात व्यवस्थित मिक्स करुन घ्यावेत. (Top Stories)

———————————————————————————————————————————

==============

हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

===============

मोतीचूर लाडू
साहित्य
१ /२ कप बेसन, ३ कप तूप, २ चिमूटभर बेकिंग सोडा, १/२ टीस्पून हिरवी वेलची, १/२ टीस्पून खाद्य रंग, ३ कप साखर, २ कप पाणी

कृती
एका मोठ्या भांड्यात १/२ कप बेसन घ्या, नंतर त्यात केशरी रंग घाला आणि चांगले मिसळा. नंतर, थोडे पाणी आणि थोडा बेकिंग सोडा घाला. मिश्रण चांगले मिसळा आणि गुठळ्या नाहीत याची खात्री करा. आता एका मोठ्या कढईत तूप गरम करा. कढईवर लाडू तयार करण्यासाठी चाळणी ठेवा आणि थोडेसे पीठ घाला. बुंदीचे पीठ हळूहळू तेलात पडू द्या आणि मंद आचेवर चांगले टाळून घ्या. पूर्ण झाल्यावर बुंदीला टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल. नंतर, एक पॅन घ्या आणि त्यात थोडे पाणी आणि साखर घाला. हे मिश्रण दोन तारांची एकसंधता येईपर्यंत उकळू द्या. नंतर त्यात थोडी वेलची पूड टाकून पाक शिजून घ्या. नंतर त्यात बुंदी घाला आणि साखरेचा पाक आणि बुंदी पूर्णपणे मिसळेपर्यंत शिजवा. झाकण ठेवून गॅस बंद करा. हाताला थोडे तुप लावा आणि लाडू बनवायला सुरुवात करा. त्यांना एका खुल्या ट्रेमध्ये ठेवा आणि सुकामेवा वरून लावा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.