Home » Ganeshotsav : ‘या’ गावात चक्क मशिदीमध्ये केली जाते गणपतीची प्रतिष्ठापना

Ganeshotsav : ‘या’ गावात चक्क मशिदीमध्ये केली जाते गणपतीची प्रतिष्ठापना

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganeshotsav
Share

अवघ्या काही तासांमध्ये बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन होत आहे. सगळीकडे भक्तिमय वातावरण आणि जल्लोष पाहायला ऐकायला मिळत आहे. बाप्पांची सर्व तयारी झाली असून, आता फक्त गणेशच्या आगमनाची आतुरता आहे. उद्यापासून पुढचे दहा दिवस फक्त बाप्पांचाच बोलबाला असणार आहे. गणती हे हिंदू लोकांचे आराध्य दैवत आहे. गणेशशिवाय कोणतेच शुभ काम पूर्ण होत नाही. त्यामुळे याच गणपती बाप्पांच्या उत्सवाची उत्सुकता जास्त असते. आपला देश सर्व धर्मीय लोकांचा देश आहे. केवळ हिंदूच नाही तर इतर अनेक धर्मांचे लोकं भारतात मोठ्या आनंदाने राहतात. कायम आपल्याकडे हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या ऐक्याचा संदेश दिला जातो. मात्र अशी अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळतात जिथे हा संदेश प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणला जातो. याच एकोप्याचे एक उदाहरण गणेशोत्सवात महाराष्ट्रात पाहायला मिळते. (Ganesh Chaturthi)

गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा सण आहे. घरोघरी, मंडळांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा केली जाते. मात्र यातच जर आम्ही तुम्हाला सांगितले की, महाराष्ट्रातील एका गावात चक्क मशिदीमध्ये गणेशाची स्थापना केली जाते तर? विश्वास बसणार नाही ना…? मात्र हे अगदी खरे आहे. महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याची ही अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. या गावात मागील ४४ वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बसवला जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जिथे मुस्लीम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवतो. गेल्या ४४ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे. (Todays Marathi Headline)

Ganeshotsav

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील न्यू गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाने मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली. मशिदीमध्ये गणपती बसवण्याचे यंदाचे हे ४६ वे वर्ष आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत येथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात. १९८१ साली न्यू गणेश मंडळाने पहिल्यांदा मशिदीच्या बाहेर गणपती बसवन्याची परंपरा सुरू केली होती. विशेष म्हणजे या मशिदीमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाचवेळी साजरे केले जातात. मशिदीमध्ये गणपती बसवण्याची प्रथा एका संकटामुळे सुरु झाली जी आजतागायत कायम आहे. मग नक्की काय घडले की मशिदीमध्ये बाप्पा विराजमान होऊ लागले? जाणून घेऊया. (Top Marathi Headline)

४४ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावातील झुंजार चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. आता गणेशोत्सव हा मुळातच पावसाळ्यात येतो. त्यामुळे त्यावर्षी देखील गणेशोत्सवात पाऊस होताच. मात्र त्यावेळी प्रचंड पाऊस सुरु झाला, गणपतीचा मंडप ओला झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील काही वयस्कर लोकांनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ही मूर्ती मशिदीमध्ये नेण्यात आली. त्यामुळे गणपतीचे पावसापासून रक्षण झाले. (Latest Marathi News)

पुढच्या वर्षी गावात एक बैठक झाली. या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठपणा होते. मुस्लीम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा, अर्चना, आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २००९ मध्ये गणपतीच्या काळातच मोठी हिंदू मुस्लीम दंगल झाली होती. पण, गोटखिंडी गावात अशा कठीण प्रसंगी सुद्धा हिंदू मुस्लीम ऐक्य अबाधित राहिले. त्यांनी त्यांचा धार्मिक सलोखा अबाधित ठेवला. (Top Trending News)

=======

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’च का म्हणतात?

=======

मुख्य म्हणजे, गणपतीच्या काळात म्हणजे दोन, तीनदा मोहरम आणि बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे सण एकत्रितपणे आले होते. तेव्हाही मुस्लिम समाजाने त्या काळात कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला होता. याच काळात एकदा मोहरमचा सण आला होता तेव्हा त्यांनी मोहरमच्या पंजांची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती. या गावाचे आणि गावातील या हिंदू मुस्लिम ऐक्याचे कायमच कौतुक होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.