Home » Ganesh Chaturthi : गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेची ‘अशी’ करा पूर्वतयारी

Ganesh Chaturthi : गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेची ‘अशी’ करा पूर्वतयारी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आता लवकरच येणार आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमची आणि स्वागताची लगबग चालू आहे. महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणून गणेश उत्सवाची ओळख आहे. महाराष्ट्र्रात तर चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. डेकोरेशन, प्रसाद, घराची स्वच्छता, बाप्पाची मूर्ती सगळेच आता तयार होत आहे. मात्र यात एक गोष्टीचे टेन्शन सगळ्यांनाच असते आणि ती गोष्ट म्हणजे गणपतीची प्राणप्रतिष्ठा योग्य वेळेत होईल ना? बाप्पाच्या पूजेसाठी काय साहित्य लागते? सर्व तयारी उत्तम असेल ना? बाप्पा वेळेत विराजमान होतील ना? कारण या दिवशी सगळ्यांचाच गुरुजी पूजेसाठी मिळतील असे नाही? (Ganesh Charurthi)

तुमची हीच काळजी आम्ही कमी करायला आज एक मदत करणार आहोत. अजून बाप्पाला येण्यासाठी काही दिवसांचा अवकाश आहे, त्यातही एक शनिवार आणि रविवार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या पूजेची तयारी कशी करायची आणि काय काय साहित्य तुम्हाला बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागेल याबद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता पूजेची काळजी न करता निर्धास्त राहा आणि सर्व समान जमेल तसे आणुन ठेवा. म्हणजे पूजेच्या दिवशी कोणताही गोंधळ होणार नाही. (Todays Marathi Headline)

येत्या २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १.५४ वाजता होणार आहे. त्याच वेळी बुधवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४४ वाजता त्याची सांगता होईल. उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी उत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची घरोघरी आणि मंडळामध्ये स्थापना होईल. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हाच्या काळात गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत असेल. तसे या दिवशी लोकं दिवसभर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतात. मात्र हा वेळ पूजेसाठी अतिशय उत्तम आहे. मान्यतेनुसार गणपती बाप्पांचा जन्म दुपारच्या सुमारास झाला आहे, त्यामुळे ही वेळ योग्य आहे. (Top Marathi News)

Ganesh Chaturthi

पूजासाहित्य
पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, सिंदूर २५ ग्रॅम, अष्टगंध ५० ग्रॅम, रांगोळी पाव किलो, अत्तर १ डबी, यज्ञोपवीत (जानवी) २ नग, उदबत्ती, कापूर २५ ग्रॅम, वाती, कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, सुपार्‍या १५ नग, नारळ ५ नग, विड्याची २५ पाने, तांदूळ १ किलो, १ रुपयाची १० नाणी, तिळाचे तेल १ लिटर, शुद्ध तूप १०० ग्रॅम, फुले १ किलो, फुलांचे ३ हार, तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, दोनशे दूर्वा, बेलाची १५ पाने, फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, पत्री, देवाची मूर्ती अर्थात गणपतीची मूर्ती, चौरंग १ नग, पाट ४, कलश १ नग, ताम्हण ३ नग, घंटा १ नग, समई २ नग, निरांजने ४ नग, पंचपात्री १ नग, पळी १ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, वाट्या १५ नग, पातेली १, आंब्याची डहाळी, एकारती १, पंचारती १, एक काडेपेटी, परात १, मोदक, धूप १०० ग्रॅम, खण १, देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी) (Latest Marathi News)

बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. बाप्पांना वीजमं करण्याची जागा ठरवावी. पूजास्थळाची शुद्धी करावी. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. केर काढल्यावर खोलीतील जमिनीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावा अथवा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. जिथे पूजा करणर आहात तिथे आणि घराच्या आभार आंब्याची डहाळी लावावी. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा. पूजेसाठी जी काही उपकरणं किंवा भांडी लागणार आहेत ती स्वच्छ करून घ्यावी. देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दुर्वांनी जलप्रोक्षण म्हणजेच स्वच्छ पाणी शिंपडावे. (Top Trending News)

==============

हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

===============

रांगोळी काढणे. जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे आणि घराच्या बाहेर देखील रांगोळी काढावी. बाप्पा जिथे विराजमान होणार आहेत, त्याच्या आजूबाजूला रांगोळी काढावी. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली रांगोळी काढावी. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वाहावे. घरात सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण ठेवावे. या दिवशी घरात वाद टाळावा. इच्छा असल्यास तुम्ही मंद आवाजात सनई देखील लावू शकता. अशी सर्व तयारी जर तुम्ही आधीच करून ठेवली तर नक्कीच पूजेच्या दिवशी तुम्हाला चिंता होणार नाही आणि पूजा देखील उत्तमपणे संपन्न होईल. पुढच्या लेखात आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठा घरी गुरुजी नसले तरी कशी करायची ते पाहूया. (Social News)

(टीप : ही माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.