गणेशोत्सव सुरु होऊन आता आठ दिवस झाले आहेत. आता निरोपाची वेळ देखील जवळ येत आहे. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचे लाडके आणि आराध्य दैवत. वर्षातून १० दिवस बाप्पा आपल्या भेटीला येतात आणि संपूर्ण वर्षभर पुरेल एवढा आशीर्वाद आणि आनंद देऊन जातात. याच्याच आधारावर आपण वर्षभर बाप्पाची वाट बघत असतो. मागच्या आठवडाभरापासून आपण दररोज अष्टविनायक गणपतींबद्दल माहिती आणि इतिहास जाणून घेतला. आज आपण जगप्रसिद्ध अशा पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल माहिती जाणून घेऊया. (shrimant dagdusheth ganpati)
जेव्हा जेव्हा पुण्याचा विषय निघतो तेव्हा सगळ्यांनाच दगडूशेठ हलवाई गणपती नक्कीच आठवतो. या गणपतीची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे. फक्त पुण्यातूनच नाही तर जगभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. सामान्य लोकांपासून दिग्गजांपर्यंत सर्वच लोकांचा या गणपतीवर अतूट विश्वास आहे. मात्र या बाप्पाची स्थापना कशी झाली? बाप्पाचा नक्की कोणता आणि काय इतिहास आहे? याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल म्हणूनच आज आम्ही या गणेशाबद्दल तुम्हाला सर्वच माहिती देणार आहोत. (Top Marathi News)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. हलवाई हे श्रीमंत आणि अतिशय सज्जन होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहायची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. या आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले. मुलाला गमवल्यानंतर ते व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. त्यांना या दुःखातून बाहेर पडताच येत नव्हते. (Latest Marathi Headline)
========
Ashtavinayak : अष्टविनायकातील आठवा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर
========
अशातच दरम्यानच्या काळात हलवाई यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा. या दोन्ही मूर्तींची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. (Ganesh Chaturthi)
त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह अनेक लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनियमाने पूजा चालू होती. (Todays Marathi Headline)
लोकमान्य टिळकांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू, त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करत होते. सध्या ही मूर्ती कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. (Top Marathi Headline)
मंडळाची स्थापना १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झालेली असून, दगडूशेठ गणपती हा लौकिक प्राप्त झाला आहे. यंदा मंडळाने 130 व्या वर्षात पदार्पण केलं असून या 130 वर्षात मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हे राबविले आहे. (Top Trending News)
१९६८ मध्ये तयार झाली मंडळाची मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळात जी मूर्ती बसविण्यात आली आहे ती मूर्ती मंडळाने १९६८ मध्ये तयार करून घेतली आहे. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकर अप्पा शिल्पी यांच्या मूर्तिकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती. ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. (Latest Marathi News)
शंकर अप्पा यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. दगडूशेठ हलवाई गणपतीची बैठी मूर्ती असून, तिचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. इतर दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम देखील उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. कारण या मूर्तीच्या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. मुख्य म्हणजे कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. (Top Stories)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक
Ashtavinayak : अष्टविनायकातील सातवा गणपती – महडचा वरदविनायक
=========
१९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला होता. त्याकाळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे ११२५ रुपये इतका आला होता. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics