Home » Ganesh Chaturthi 2025 : भारतातील सोंड नसलेल्या गणेशाचे अनोखे देऊळ, वाचा खास कथा

Ganesh Chaturthi 2025 : भारतातील सोंड नसलेल्या गणेशाचे अनोखे देऊळ, वाचा खास कथा

by Team Gajawaja
0 comment
Ganesh Chaturthi 2025
Share

Ganesh Chaturthi 2025 : जयपूर शहरातील अरवली पर्वतरांगांवर वसलेले गड गणेश मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे गणेशाची सोंड नसलेली मूर्ती आहे. हे मंदिर गणेशाच्या बालरूप स्वरूपासाठी प्रसिद्ध आहे. 18व्या शतकात जयपूर शहराची स्थापना करताना सवाई जयसिंग यांनी गुजरातमधून खास पंडितांना बोलावून अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी बालरूप गणेशाची मूर्ती तयार करून तिची पूजा करण्यात आली. शहराचे रक्षण आणि आशीर्वाद यासाठी ही मूर्ती उत्तरेकडील अरवली पर्वताच्या टेकडीवर किल्ला (गड) बांधून प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यामुळे याला गड गणेश असे नाव मिळाले. सवाई जयसिंग आणि यज्ञ करणारे पुजारी मानत की, या मूर्तीमुळे गणेशाची नजर संपूर्ण शहरावर राहील.

मंदिरापर्यंतच्या पायऱ्यांची कथा

गड गणेश मंदिर सुमारे 500 फूट उंचीवर वसलेले आहे. असे सांगितले जाते की मंदिरापर्यंत जाण्यासाठी दररोज एक पायरी बांधली जात होती. अशा प्रकारे 365 दिवसात पायऱ्या पूर्ण झाल्या. आजही हजारो भाविक या पायऱ्या चढून बाप्पाचे दर्शन घेतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार, हा गणपती नवसाला पावणारा आहे.

300 वर्षांनंतरही गाभाऱ्यातला फोटो नाही

मंदिराच्या स्थापनेनंतरच येथे छायाचित्रणास बंदी घालण्यात आली. त्यामुळे गेली जवळपास 300 वर्षे या गणेशाच्या मूर्तीचा एकही फोटो उपलब्ध नाही. भक्तांना फक्त गाभाऱ्यात प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळते. हीच या मंदिराची अनोखी ओळख आहे.

Ganesh Chaturthi 2025

Ganesh Chaturthi 2025

=========

हे देखील वाचा : 

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का घेत नाही?

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

Ganesh Chaturthi : गणेश मूर्ती खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

==========

सिटी पॅलेसवरून होणारी आरती

गड गणेश मंदिराची रचना अशी करण्यात आली की सवाई जयसिंग सिटी पॅलेसच्या गच्चीवरून उभे राहून दररोज सकाळ-संध्याकाळ मंदिरातील आरती पाहू शकत होते. या मंदिरासोबतच गोविंद देव मंदिर, सिटी पॅलेस आणि अल्बर्ट हॉल एकाच रेषेत बांधले गेले आहेत.(Ganesh Chaturthi 2025)

गड गणेशाकडे केलेली प्रार्थना बुधवारच्या सात वाऱ्या पूर्ण केल्याने सिद्ध होते अशी मान्यता आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवलेले दोन उंदीर विशेष आकर्षण आहेत. भाविक आपल्या इच्छा या उंदरांच्या कानात सांगतात आणि ते उंदीर त्या प्रार्थना थेट बाल गणेशापर्यंत पोहोचवतात असे मानले जाते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.