Home » Ashtavinayak : अष्टविनायकातील आठवा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर

Ashtavinayak : अष्टविनायकातील आठवा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashtavinayak
Share

पालीचा श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा आणि शेवटचा गणपती. बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. श्री बल्लाळेश्वराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. आज आपण याच पाळीच्या बल्लाळेश्वर गणपतीची माहिती जाणून घेणार आहोत. (Ganesh Chaturthi)

रायगड जिल्ह्यातील सुधागडाच्या पायथ्याशी पाली या गावात हे सुंदर मंदिर आहे. पालीत बल्लाळेश्वराचे अतिशय सुबक दगडी मंदिर आहे. या मंदिराआधी येथे धुंडीविनायकाचे मंदिर लागते. बल्लाळाने पूजन केलेली शिळा धुंडीविनायक म्हणून ओळखली जाते. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी धुंडीविनायकाचे दर्शन घेण्याची जुनी रीत आहे. पूर्वी बल्लाळेश्वराचे मंदिर लाकडी होते. पेशव्यांच्या कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आज असलेले हे दगडी मंदिर उभे राहिले. मंदिराच्या दर्शनी भागात मोठी घंटा आहे. ही घंटा वसईच्या विजयानंतर चिमाजीअप्पा यांनी, विजयाचे चिन्ह म्हणून मंदिराला अर्पण केली होती. (Marathi News)

बल्लाळेश्वराची मूर्ती दगडी सिंहासनावर स्थित आहे. साधारण तीन फूट उंच असलेली ही मूर्ती रुंद असून, मागच्या बाजूला चांदीच्या प्रभावळीवर रिद्धी आणि सिद्धी उभ्या आहेत. गणेशाचे कपाळ विशाल असून अतिशय प्रसन्न असलेल्या या पूर्वाभिमुख मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आणि बेंबीत हिरे जडविले आहेत. गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. तर मूर्तीसमोर, गर्भगृहाबाहेर हाती मोदक घेतलेला उंदीर आहे. या मंदिराची रचना अशी आहे की सूर्योदयावेळी सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात. मंदिराच्या परिसरात दोन तलाव आहे, त्यापैकी एकाचे पाणी पूजेसाठी वापरले जाते. (Top Marathi News)

Ashtavinayak

असे म्हटले जाते की हे मंदिर उंचीवरून पाहिले तर ते देवनागरीचे श्री अक्षर असे दिसते. मंदिराच्या आत आणि बाहेर दोन मंडप बांधण्यात आले आहेत. बाह्य मंडप १२ आणि आतील मंडप १५ फूट उंच आहे. आतील मंडपात बल्लाळेश्वराची मूर्ती बसवली आहे. बाहेरील मंडपात, त्याच्या वाहनाच्या उंदराचा पंजेमध्ये मोदक दाबणारा पुतळा देखील आहे. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. (Latest Marathi News)

बल्लाळेश्वराची आख्ययिका
विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. (Top Marathi News)

हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन ‘बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले’ अशी तक्रार करू लागले. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ”हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. (Todays marathi Headline)

Ashtavinayak

आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.’ आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. (Latest Marathi Headline)

इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, ‘येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.’ असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. (Top Trending News)

=========

Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक

Ashtavinayak : अष्टविनायकातील सातवा गणपती – महडचा वरदविनायक

=========

बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ”तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.” तेव्हा बल्लाळ म्हणाला – ”तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.” तेव्हा गणेश म्हणाला – ”तुझ्या इच्छेनुसार मी इथे ‘बल्लाळ विनायक’ या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.” असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.