Home » Mahatma Gandhi : महात्मा गांधींचे प्रेरणादायी विचार

Mahatma Gandhi : महात्मा गांधींचे प्रेरणादायी विचार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahatma Gandhi
Share

दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरा केली जाते. महात्मा गांधी हे भारताच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्य लढ्यातील अतिशय प्रभावशाली आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठा वाटा आहे. त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचाराने मोठा बदल घडवून आणला होता. कोणतीही हिंसा न करता त्यांनी अनेक बदल घडवले. अहिंसेच्या मार्गाने जाताना गांधीजींनी अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा दिला. आजही आपल्याला त्यांच्या जीवनातून शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते हा धडा शिकायला मिळतो. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे काही महत्त्वाचे विचार. (Mahatma Gandhi)

* असे जीवन जगा जसे की आपण उद्या मरणार आहात, काहीतरी शिका जसे की आपण कायमचे जगणार आहात.

* आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.

* ही पृथ्वी, हवा, भूमी,पाणी हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे, तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम होय. ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

* आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे, जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही. (Marathi News)

* मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात. (Top Marathi News)

* इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी “होय” म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह “नाही” म्हणणे चांगले.

* राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत. (Todays Marathi Headline)

Mahatma Gandhi

* स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला देऊन टाकणे. तुम्हाला जगात दिसणारा बदल तुम्हीच असला पाहिजे.

* उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे असे समजून जगा. तुम्ही कायम जगणार आहात असे समजून शिका.

* ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे. (Todays Marathi Headline)

* मित्राशी मैत्री करणे सोपे आहे. पण तुम्ही ज्याला शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे.

* मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जग आपणास हळूहळू ऐकेल.

* दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे. (Top Trending Headline)

* जर स्वातंत्र्यामध्ये चुका करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नसेल, तर ते स्वातंत्र्य मिळवण्यासारखे नाही.

* काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.

* अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली शस्त्रा पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.

* प्रार्थनेत टेकलेल्या हजार डोक्यांपेक्षा एका कृत्याने एकाला आनंद देणे हे कधीपण चांगले. (Top Marathi News)

* शरीर आणि मन अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र, माणसे तना-मनाने स्वच्छ हवी असतील, तर त्याचे शहर आणि परिसरही स्वच्छ हवा.

* कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे. (Latest Marathi Headline)

* कोणताही देश, त्या देशातल्या रहिवाशांनी हाल अपेष्टा सोसल्याशिवाय आणि स्वार्थत्याग केल्याशिवाय महत्पदाला चढलेला नाही.

* अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.

========

Lal Bahadur Shastri : लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

========

* एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा. (Top Trending News)

* हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.

* एका डोळ्याच्या बदल्यात एक डोळा हे संपूर्ण जग अंध करेल.

* स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला गमावणे. (Social News)

* सामर्थ्य शारीरिक क्षमतेतून येत नाही. ते अदम्य इच्छेपासून येते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.