नवीन वर्ष (New Year)आलंय. येत्या वर्षात काय- काय करायचं , कुठे-कुठे फिरायचं या सगळ्याच प्लँनिंग तुम्ही सगळ्यांनी केलच असेल. पण ही आपल्यासारखी २०-२५ वर्षाची पोर ना दरवर्षी एक गोष्ट ठरवतातच ते म्हणजे यावर्षी तरी कुठेतरी विमानाने जायचंच ! पण ते काय आपल्याला possible होत नाय. विमानाने प्रवास करायला कोणाला नाही आवडत? सगळ्यांनाच आवडतं ! मग ते भले अर्ध्या एक तासासाठी का असेना, पण वरून एवढ्या उंचीवरून खालची गावं शहरं बघणं, ढगांना अनुभवणं हे विलक्षणच आहे! पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना हाच विमानप्रवास खूप महागडा वाटतो आणि तो असतो सुद्धा. हीच गोष्ट लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी एका माणसाने हे चित्रच बदलून टाकलं आणि हा विमान प्रवास Airline travel चक्क एक रुपयांवर आणला ! हा माणूस म्हणजे कॅप्टन जीआर गोपीनाथ. आज आपण त्यांच्याबद्दल आणि या विमानप्रवासाबद्दल जाणून घेऊ.
एकेकाळी बैलगाडीतून प्रवास करणाऱ्या G. R. Gopinath यांनी स्वतःची विमान कंपनी काढ्ण्यापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. त्यांनी २००३ मध्ये डेक्कन एअरलाईन्सची स्थापना केली. त्यांना प्रतिसादही उत्तम मिळत होता, त्यांचे shares सुद्धा चांगले होते. पण तरीही हि कंपनी जास्त वर्ष टिकू शकली नाही. असं का झालं, हेच जाणून घेऊया. (Marathi News)
सुरवातीला जीआर गोपीनाथ म्हणजे कोण ? तर कॅप्टन गोपीनाथ यांचे पूर्ण नाव गोरूर रामास्वामी अय्यंगार गोपीनाथ आहे. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी कर्नाटकातील गोरूर नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते आणि शेतीचे कामही करत होते, तर आई गृहिणी होती. त्यांच्या वडिलांना शाळा ही चाकोरीबद्ध वाटायची, म्हणून त्यांनी गोपीनाथला होमस्कूलिंगसाठी घरीच ठेवल. त्यानंतर त्यांना कन्नड माध्यमाच्या शाळेत पाचवीत दाखल करण्यात आलं. १९६२ मध्ये विजापूरच्या सैनिक स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यानंतर गोपीनाथ यांनी सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढे त्यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमीत निवड झाली. त्यानंतर गोपीनाथ यांनी आठ वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिली. यानंतर १९७१-७२ च्या बांगलादेश युद्धापर्यंत ते लष्करात राहिले. पण तिथे त्यांना आपण कुठल्यातरी बंधनात आहोत असं जाणवू लागलं, आणि अखेर सैन्यात 8 वर्षे घालवल्यानंतर त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी सैन्यातून निवृत्ती घेतली.(Biography)
कर्नाटकात आल्यानंतर त्यांना काहीतरी नवीन करायचं होतं. म्हणून मग त्यांनी रेशीम शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मोटारसायकल डीलरशिप आणि अशा अनेक व्यवसायांमध्ये हात आजमावला. पण कशातच जम बसत नव्हता. शेवटी १९९७ मध्ये त्यांनी डेक्कन एव्हिएशन नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी व्हीआयपींसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यायची. ह्या कंपनीला हवं तसं यश मिळत होतं. पण गोपीनाथ यांच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. त्यांच्यामते, भारतात सगळ्या गोष्टी लोक विकत घेतात, पण विमान तिकीट ही तेव्हा चैनीची वस्तु मानली जायची आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक विमान प्रवस करायला कचरायचे. म्हणूनच मग त्यांनी ठरवलं भारतातला सगळ्यात स्वस्त विमान प्रवास आपण सुरु करायचा. मग ऑगस्ट 2003 मध्ये, कॅप्टन गोपीनाथ यांनी एअर डेक्कनची स्थापना केली. 23 ऑगस्ट 2003 रोजी या कंपनीची पहिली फ्लाइट बेंगळुरू ते हुबळी पर्यंत होती. ही airline ‘नो फ्रिल्स एअरलाइन्स’ होती. म्हणजेच, एक विमान सेवा ज्यामध्ये प्रवाशांना फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जातात, ज्यामुळे तिकीट स्वस्त होत. थोडक्यात प्रवाशांना विमान प्रवास परवडणारा बनवण्यासाठी अनावश्यक सुविधांवर खर्च केला जात नाही. त्यामुळे एअर डेक्कनच्या तिकिटांच्या किमती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा निम्म्या होत्या. पण मग तेच प्रतिस्पर्धी स्वस्त तिकिटांमध्ये हि सुविधा दयायला लागले आणि याचा एअर डेक्कनवर परिणाम झाला.
=============
हे देखील वाचा : करोडपती भिकारी जे कमावतात सामान्यांपेक्षा जास्त!
=============
शेवटी २००७ मध्ये ५० कोटींचा तोटा झाल्यानंतर ही कंपनी विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये विलीन झाली. अहवालानुसार, डेक्कन एअरलाइनच्या ताफ्यात तेव्हा ४३ विमानं होती, ज्यांनी ६० हून अधिक गंतव्यस्थानांसाठी दररोज ३५० उड्डाणे चालवली.डेक्कन एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतरही, गोपीनाथ यांनी हार मानली नाही आणि २०१३ मध्ये डेक्कन ३६० नावाची एअर-कार्गो सेवा सुरू केली. पण हा व्यवसायही यशस्वी झाला नाही. डेक्कन ३६० ने थकबाकी भरली नसल्याने जुलै २०१३ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने एअरलाईन बंद करण्याचे आदेश दिले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ यांनी बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्येही त्यांनी त्याच जागेवरून नशीब आजमावले, पण पुन्हा त्यांच्या पदरी अपयश आले. थोडक्यात होमस्कूल पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास राजकारणी होण्यापर्यंत पोहोचला. पण पदरात अपयशच होतं.
“मी दूध विकण्यासाठी जनावरे पाळली, कोंबड्यांची पाळली, रेशीम कीटकांची शेती केली, बाईक डीलर झालो, स्टॉक ब्रोकर झालो, सिंचनाचे सामान विकले, कृषी सल्लागार झालो आणि शेवटी विमानचालन उद्योजक झालो. संघर्ष करणं, पडणं, उठणं, पडणं, पुन्हा उठणे आणि टेक ऑफ करणं हेच आयुष्य आहे. अशाप्रकारे ‘सिंपली फ्लाइंग’ नावाच्या पुस्तकात कॅप्टन गोपीनाथ यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाचं वर्णन मोजक्या शब्दांत केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर ‘सोरारई पोटरू’ हा तमिळ भाषिक चित्रपटही येऊन गेला आहे. दरम्यान त्यांनी दिलेली विमान सेवा म्हणजे सामान्य माणसाची एअरलाइन म्हणून प्रसिद्ध होती. त्याकाळी त्या एक रुपयाच्या तिकिटावर सुमारे तीस लाख लोकांनी विमानाने प्रवास केला होता. त्यामुळे भारतीयांना स्वस्त दरात फ्लाइंगचा अनुभव देणार हा अवलिया कायम सगळ्यांच्या स्मरणात राहावा इतकंच.