Home » फुल्ल टाइम की पार्ट टाइम जॉब? सध्याचे बदलेले वर्कक्लचर

फुल्ल टाइम की पार्ट टाइम जॉब? सध्याचे बदलेले वर्कक्लचर

by Team Gajawaja
0 comment
Full time part time job
Share

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच आपल्या खासगी आयुष्यात किंवा परिवाराला पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. उत्तम आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही पैसा मिळवण्यासाठी एखादा उद्योग किंवा नोकरी करते. पैसा मिळवण्याचे विविध मार्ग असले तरीही आपणं जे करतोय ते मनापासून आणि निष्ठेने करतोय का याकडे सुद्धा लक्ष देणे फार महत्वाचे आहे. कारण फक्त पैसा मिळतोय म्हणून आपण काम करतोय हे योग्य नाही. याचा कुठे ना कुठे प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आपली दिनचर्या ही घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सुरुच असते. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला किती वेळ आणि महत्व दिला पाहिजे हे तर आपल्या हातात असते. (Full time part time job)

आपल्या दिवसाची सुरुवात ही नेहमीच धडपडीनेच होत असते. कार्यालयात जायचे म्हटले तरी ही गोष्ट कुठेयं ती कुठेयं असचं करत आपण आपल्या गंतव्य ठिकाणी पोहचू पाहत असतो. दिवसाला ऑफिसला जाणारी रेल्वे स्थानक, रिक्षा स्टँड किंवा अन्य कोणतेही सार्वजनिक किंवा खासगी वाहतूकीची सेवा असो लोंढे च्या लोंढे आपल्याला इथून तिथे तेथून येताना दिसून येत असतात. ही सर्व धडपड फक्त आपल्याला योग्य वेळी कामाच्या ठिकाणी पोहण्यासाठी सुरु असते. तसेच कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर आपल्याला ठरवुन दिलेल्या वेळेत आपापल्या पदानुसार काम करावे लागतेच. कामात काही चुक झाली तरी बॉसचा ओरडा, शिव्या मिळतातच पण आपल्याला एक वेगळा न्यूनगंड सुद्धा त्यावेळी येतो. अशातच बॉस सर्वांवर आपल्याला ओरडला तर आपल्यासोबत लाजीवाणी गोष्ट घडल्याचे आपल्याला वाटू लागते.

सौजन्य – गुगल

मी सुद्धा यापूर्वी नोकरी केलीय. तेथे गेल्यावर आपल्याला त्यांनी ठरवून दिलेल्या नियम आणि अटींनुसार आणि दिलेल्या वेळेत काम करावे लागते हे फुल्ल टाइम जॉब (Full time part time job) करणाऱ्यांसाठी फार मोठे आवाहन असते.असो, तरीही आपल्याला ते काम आवडत असेल तर त्यात आपण रमतो आणि ते अधिक उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. मात्र याउलट स्थिती असेल तर कामात मन ही लागत नाही आणि नुसतं कधी एकदा कामाचे तास संपूण आपण घरची वाट पकडतोय याकडेच अधिक लक्ष लागून राहते. मी असं म्हणत नाही प्रत्येकालाच फुल्ल टाइम नोकरी संदर्भात काही समस्या असतील. कारण बड्या बड्या कंपनीत देखील लोक दिवसाची रात्र आणि रात्रीचे दिवस करुन काम करताना मी पाहिली आहेत. आज ती एका उत्तम पदावर ही कार्यरत आहेत. यासाठी त्यांच्या मेहनत आणि जिद्दीला सलाम करावासा वाटतो.

हे देखील वाचा- Vishaka Guidelines: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला ‘विशाखा मार्गदर्शक तत्वे’ माहिती असायलाच हवी

पण अलीकडच्या काळात कामाचे स्वरुप आणि काम करण्याची पद्धत ही बदलत्या जीवनशैलीसह तंत्रज्ञानामुळे बदलले आहे. सध्याची तरुण पिढी ही भावी देशाचे योगदानकर्ते जरी असले तरीही प्रत्येकाची काम करण्याची क्षमता, बौद्धिक शक्ती किंवा त्या संदर्भातील विचारात भिन्नता दाखवून देते. कारण आपण सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची नोकरी किंवा त्याहून अधिक वेळ कामासाठी देणे हे काहींना पटत नाहीयं. त्यांना असे वाटत राहते की, आपण जर एखाद्या नोकरीच्या ठिकाणी ऐवढे तास काम करतोय तर हेच काम आपण स्वत: स्वत: ही उत्तम पद्धतीने करु शकतो. यामध्ये वेळेचे अथवा कोणाचे ही बंधन नाही. त्यामुळेच सध्याची अनेक यंगस्टर्स हे फुल्ल टाइम (Full time part time job) पेक्षा पार्ट टाइम नोकरी करणे पसंद करत आहेत. कारण यामध्ये स्वत: ला वेळ तर देता येतोच पण वेळेचे बंधन ही येथे नाहीसे होते. फ्रीडम असल्यासारखे आपण ते काम मनमोकळे पणाने हवे तसे किंवा आपल्या वेळेनुसार करु शकतो. माझ्या काही मित्र-मैत्रीणी आहेत त्यांनी सुद्धा नोकरी सोडून पार्ट टाइमकडे आपली पाठ वळवली आहे. तर फुल्ल टाइम आणि पार्ट टाइम मधील फरक ऐवढाच की वेळेचे बंधन असणे आणि नसणे.

सौजन्य – गुगल

आता प्रश्न उभा राहतो की, फुल्ल टाइम नोकरी करणाऱ्याला एका विशिष्ट तारखेला पैसे हातात येणार असतात हे आधीच माहिती असते. परंतु फ्रिलान्स म्हणजेच पार्ट टाइम नोकरीचे पैसे आपल्याला नेमक्या कोणत्या तारखेला येणार हे आधीच माहिती नसते. आपला प्रोजेक्ट जसा पूर्ण होईल त्यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळेच आपण एखादी नोकरीचा शोध घेताना त्यासाठी पूर्णवेळ द्यायचा की पार्ट टाइम मध्ये नोकरी करायची हे ठरवावे लागणार आहे. आपला महिनाभराचा खर्च हा कोणत्या नोकरीच्या स्वरुपातून पूर्ण होऊ शकतो याचा ही विचार करुन पुढील पाऊल उचलावे. जेणेकरुन जर तुम्ही फुल्ल टाइम नोकरी करताय खरं पण पैसेच मिळत नाही अशी स्थिती असेल तर त्या गोष्टीसाठी वेळ देऊन काय फायदा? यापेक्षा आपण जे काम करतोय त्याचे योग्य मानधन मिळतयं हे सर्वात महत्वाचे आहे. कारण भारताच्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला काही हक्क आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला फुल्ल टाइम (Full time part time job) नोकरी करायची की पार्ट टाइम जॉब करायचा आहे हे सर्वस्वी ठरवण्याचा हक्क आहे.

एखादा म्हणतोय म्हणून आपण फुल्ल टाइम किंवा पार्ट टाइम नोकरी करतोय हे योग्य नाही. आपल्या मनाला काय वाटते करावे आणि आपल्यासाठी कोणता योग्य मार्ग आहे ते ठरवावे. आपल्यात एक म्हणं आहे, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. त्यानुसारच आपल्या करियरची सुरुवात कशी करायची याकडे आपले लक्ष पाहिजे. प्रत्येकालाच आयुष्यात मोठे व्हायचे असते, आपले समाजात अस्तित्व निर्माण करायचे असते. त्यासाठीच आपण नेहमी झटत असतो. तुम्ही सुद्धा फुल्ल टाइम आणि पार्ट टाइम (Full time part time job) नोकरी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती किंवा बदलत्या ट्रेंन्डनुसार आपल्यासाठी काय योग्य आहे ते पाहूनच पुढचे पाऊल उचलावे. तर आजकाल बहुतांश स्टार्ट अप ही एक उत्तम पद्धतीने स्पर्धात्मक मार्केटमध्ये खंबीरपणे उभे राहत आपले अस्तित्व निर्माण करु पाहत आहेत. आता सर्वस्वी निर्णय तुमच्या हाती सध्या फुल्ल टाइम करणे योग्य की पार्ट टाइम?


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.