Home » Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळे खाल्ल्यास होतील भरपूर लाभ

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळे खाल्ल्यास होतील भरपूर लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diabetes
Share

आपल्याला निरोगी ठेवण्यामध्ये योग्य आहार, नियमित व्यायाम यासोबतच ताजी फळं देखील महत्वाची भूमिका निभावत असतात. अनेकदा आपल्याला डॉक्टरांकडून फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. विविध आजारांमध्ये देखील फळं खाणे खूपच लाभदायक असते. कधी कधी तर अन्नापेक्षा जास्त लवकर फळांचा आपल्या शरीरावर सकारत्मक परिणाम होताना दिसतो. यासाठी नियमित, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य फळं खाणे फारच गरजेचे आहे. काही लोकं तर फळांचे महत्व जाणून एकवेळचे जेवण केवळ फळं खाऊनच करतात. (Diabetes)

मात्र सगळ्यांसाठीच फळं खाणे हे योग्यच असते असे नाही. काही रुग्णांमध्ये काही आजारांमध्ये मोजकीच आणि कमी प्रमाणात फळं खाण्यास सांगितले जाते. खासकरून किडनी आजार, मधुमेह आदी आजारांमध्ये फळं खाण्यावर काही प्रमाणात बंधनं असतात आणि कोणती फळं खावी कोणती खाऊ नये यासाठी देखील बरेच नियम असतात. आता आपण मधुमेह अर्थात डायबिटिसबद्दल जर पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, हा रक्तातील साखरेशी संबंधित आजार असल्याने, हा आजार असलेल्या रुग्णाने जास्त गोड किंवा साखर असलेली फळे खाणे टाळले पाहिजे. मग डायबिटिसच्या रुग्णांनी नक्की कोणती फळे खाणे फायदेशीर असते, चला जाणून घेऊया. (Fruits for Diabetes Patient)

फणस
बाहेरुन काटेरी असणाऱ्या आतून रसाळ असणारे फळ म्हणजे फणस होय. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, थियामिन, रायबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅंगनीज आणि मॅंग्नेशिअम सारखे पोषकतत्वे असतात. हे फळ शरीरातील इन्सुलिनच्या पातळीमध्ये सुधारणा करते. (Marathi)

Diabetes

============

हे देखील वाचा : तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित

============

टरबूज
टरबूजमध्ये सुमारे ९०% पाणी असते, ज्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवते. नैसर्गिक गोडवा असूनही, हे फळ कमी ग्लायसेमिक लोड (GL) असलेले आहे, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. त्यात अँटीऑक्सिडंट्स, लायकोपिन आणि फायबर असतात, जे हृदय आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात. (Marathi Latest News)

Diabetes

बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी यांसारख्या बेरीज डायबिटिसमध्ये खाणे फायदेशीर असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि ते शरीरात ग्लुकोज कमी शोषण्यास मदत करतात. तसेच, त्यांच्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म, व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण या आजाराच्या रुग्णांसाठी देखील लाभदायक आहे. (Marathi Top News)

Diabetes

जांभूळ
जांभळाला इंडियन ब्लॅक बेरी किंवा ब्लॅक प्लम असेही म्हटले जाते, हे फळ मधुमेह असलेले रुग्ण खाऊ शकतात. या फळामध्ये ८२ टक्के पाणी असते आणि सुक्रोज कमी आढळते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होत नाही. (Top Stories)

Diabetes

अननस
अननस हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. यासोबतच या फळाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कारण, या फळामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-इंफ्लेमेट्री आदी गुणधर्म असतात. (Marathi Trending News)

Diabetes

नासपती
व्हिटॅमिन सी, ई आणि के यांनी समृद्ध असलेले नासपती फळ मधुमेहाचे रुग्ण बिनधास्त खाऊ शकतात. कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि बीटा कॅरोटीन हे यात मुबलक प्रमाणात आढळतात. भरपूर फायबर असल्याने नासपती मधुमेहींसाठी चांगले असते.  (Marathi News)

Diabetes

पेरू
मधुमेहाला नियंत्रित करण्याचे काम पेरू करते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे. पेरूमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ असते आणि पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या फळाचा ग्लुकोज इंडेक्सही कमी असतो. (Health News)

Diabetes

सफरचंद
सफरचंदामध्ये केवळ भरपूर फायबर नसतात, तर त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. सफरचंद खाल्याने ग्लूकोजची पातळी स्थिर होण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारात मर्यादित प्रमाणात सफरचंदाचाही समावेश करता येतो. (Social News)

Diabetes

किवी
किवीमध्ये उच्च फायबर असते आणि ते रक्तातील साखर वाढण्यापासून थांबवते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ४९ आहे जो या आजारातील रुग्णांसाठी चांगला आहे. यासोबतच, किवी शरीरातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

============

हे देखील वाचा : Mango : गोड आणि केमिकल फ्री आंबा ओळखण्याच्या सोप्या टिप्स

============

Diabetes

स्टार फ्रूट
डायबिटीजच्या रुग्णांसाठी स्टार फ्रूट हे अतिशय फायदेशीर आहे. कारण, हे फळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करुन त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करते.

Diabetes

(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.