आरोग्यासाठी फळं ही खुप फायदेशीर असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की ही फळं त्वचेचे सौदर्य वाढवण्यासाठी सुद्धा फार महत्वाची असतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला फ्रुट फेशियल घराच्या घरी कसे करावे आणि त्याचे फायदे काय होतात याबद्दल अधिक सांगणार आहोत. तसेच फ्रुट फेशियलच्या (Fruit facial) काही प्रकारांबद्दल ही जाणून घेऊयात. तर त्वचेसाठी फळ खुप फायदेशीर असतात. कारण यामध्ये असलेली पोषक तत्व ही फक्त शरिरालाच नव्हे तर त्वचेला सुद्धा वेगळे तेज देतात.
फेशियलसाठी कोणती फळं वापरली पाहिजेत?
-केळं
केळं हे असे एक फळं आहे जे त्वेचेला बाहेरुन आणि आतमधून सुद्धा उजळवू शकते. यामध्ये त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे गुण असतात. त्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघण्यास ही मदत होते. तसेच फेस पॅक म्हणून तुम्ही केळं वापरत असाल तर टॅनिंग कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. केळ्यात अँन्टी एक्ने आणि अँन्टी एजिंट सारख्ये गुण असतात. जे पिंपल्स आणि रिंकर्ल्सची समस्या कमी करु शकतात.
-संत्र
त्वचेसाठी संत्र हे अधिक फायदेशीर मानले जाते. एका शोधात अशी माहिती दिली आहे की, संत्र्यात अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टीफंगल गुण भरपूर प्रमाणात असतात. जे बॅक्टेरिया आणि फंगस सोबत लढण्यास मदत करु शकतात या व्यतिरिक्त संत्र्यात अँन्टीऑक्सिडेंट गुण ही असतात.
-पपई
पपई सुद्धा घऱच्या घरी फेशियल करायचे असेल तर तुम्ही वापरु सकता. खरंतर उत्तम ब्लिचिंग एजेंटच्या रुपात पपई काम करते. जे डेड स्किन काढून टाकत नवी आणि उत्तम स्किन तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेदरम्यान तुमच्या त्वचेच्या रंगात ही हलका बदल झाल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त पपई तुमच्या त्वचेवर आलेले पिंपल्स, डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास महत्वपूर्ण भुमिका निभावतात. तसेच त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून होणाऱ्या नुकसानी पासून ही बचाव करण्यास मदत करते.
-स्ट्रॉबेरी
त्वचेसाठी जर स्ट्रॉबेरी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये भऱपूर प्रमाणात अँन्टीऑक्सिडेंट गुण असतात. जे त्वचेवर पडणाऱ्या हानिकार युवी किरणांपासून बचाव करण्यास मदत करते. तसेच स्ट्रॉबेरीचा वापर हे पिंपल्स आणि सुरकुत्यांच्या समस्येसाठी केली जाऊ शकतो.
हे देखील वाचा-व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ कोणते? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे
तर जाणून घेऊयात फळांचे फेशियल करण्याची पद्धत
-स्ट्रॉबेरी फेशियल
चार स्ट्रॉबेरी, एक चमचा कोको पावडर आणि एक चमचा मध घ्या. आता स्ट्रॉबेरी मिक्सरमधून काढत त्याचा जो ज्यूस निघेल त्यात कोको पावडर आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
-संत्र्याची साल वापरुन फेशियल
सर्वात प्रथम तुम्हाला संत्र्याच्या साल घेऊन त्या उन्ह्यात वाळवाव्या लागणार आहेत. उत्तमपणे त्या वाळल्यानंतर त्याची मिक्सरमधून बारीक पावडर तयार करा. आता ही पावडर वापरुन त्यात मध आणि दही मिळून त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि सुखल्यानंतर चेहरा धुवा.(Fruit facial)
-केळ वापरुन फेशियल
केळ्याचे फेशियल करण्यासाठी तुम्हा एक पिकलेले केळं, अर्धा चमचा मध आणि एक चमचा लिंबूचा रस लागणार आहे. तर हे सर्व मिश्रण एकत्रित करावे असे करताना केळं हे व्यवस्थिती स्मॅश करुन घ्या. हे मिश्रण काही वेळ चेहऱ्यावर लावल्यानंतर पाण्याचे स्वच्छ धुवा.
-पपई-मध फेशियल
पपईचे तीन-चार तुकडे आणि एक चमचा मध घ्या. पपई मिक्सरमधून काढत त्याच्या रसात मध टाका. आता यांची पेस्ट तयार झाल्यानंतर ती चेहऱ्याला १५-२० मिनिटे ठेवून द्या. आता चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यावर मॉइश्चराइजर लावा.