जर तुम्ही भाज्या दीर्घकाळापर्यंत स्टोर करत असाल तर त्यासाठी फ्रोजनचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. याच्या मदतीने तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या महिन्याभरापर्यंत स्टोर करु शकता. मात्र काही लोकांना अशी समस्या असते की, त्यांच्या फ्रोजन भाज्या फ्रेश राहत नाही आणि त्यांना शिजवण्यासाठी सुद्धा समस्या येते. ऐवढेच नव्हे तर काही वेळा त्यांना शिजवताना सुद्धा एक वेगळा वास येतो. अशाच आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत की, तुम्ही फ्रोजन भाज्यांचा कशा पद्धतीने वापर करु शकता. त्याचसोबत त्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जेणेकरुन भाज्यांची चव ताजी राहिल आणि त्या दीर्घकाळापर्यंत स्टोर करु जाऊ शकतात. (Frozen Vegetable Tips)
फ्रोजन भाज्या अशा पद्धतीने करा वापर
-डीफ्रॉस्ट करा
जर तुम्ही माइनस तापमानात भाज्या स्टोर करत असाल तर त्या काढल्यानंतर त्या सर्वात प्रथम डीफ्रोस्ट करणे गरजेचे आहे. खरंतर कोबी, मटर, गाजर सारख्या भाज्यांवर जमा झालेला बर्फ निघून जाण्यापूर्वी ते डीफ्रॉस्ट करा. त्यासाठी त्यांना एका प्लेट मध्ये ठेवा आणि काही वेळासाठी रुम टेम्परेचरमध्ये ठेवा. फ्रोजन भाज्या थेट शिजवल्यास त्या शिजण्यासाठी ही वेळ लागतो.
-उकळवू नका
जर तुम्ही फ्रोजन भाज्या शिजवण्यापूर्वी उकळवत असाल तर ही पद्धत अगदी चुकीची आहे. लक्षात ठेवा जर तुम्ही सामान्य भाज्या शिजवण्यापूर्वी त्या उकळवत नाही तर फ्रोजन का? फ्रोजन भाज्या स्टीम किंवा माइक्रोवेव करण्याची गरज नसते. असे केल्याने भाज्या ओव्हर कुक झाल्याचे दिसतील आणि त्यांचे टेक्चर ही खराब होईल. तुम्ही फ्रोजन भाज्या अर्धा तास तरी सामान्य तापमानात ठेवल्यानंतर त्याचा वापर करा.
-गरजेपेक्षा अधिक वेळ स्टोर करणे
जर तुम्हाला भाज्या अधिक दिवसांपर्यंत फ्रेश ठेवायच्या असतील तर त्यांना फ्रीज करुन तुम्ही त्या महिन्यापर्यंत फ्रेश ठेवू शकता. मात्र त्याचे सील पॅक उघडले गेले असेल तर त्या लवकर खराब होऊ शकतात. खुल्या पॅकेटमध्ये ठेवलेल्या भाज्या सुकतात आमि त्यांचा स्वाद ही निघून जातो. जर पॅकेट मधील भाज्या असतील तर त्याची एक्सपायरी डेट तपासून नक्की पहा. (Frozen Vegetable Tips)
हे देखील वाचा- थंडीत जास्त अंडी खातायत तर थांबा! हे आधी वाचा
-फ्रोजन भाज्यांचा अशा प्रकारे करा वापर
तु्म्ही फ्रोजन भाज्यांचा लवकर वापर करु इच्छिता तर त्यांना रनिंग वॉटरमध्ये स्वच्छ करा. काही वेळासाठी त्या पाण्यात बुडवून ठेवा. १० मिनिटानंतर त्यामधील पाणी काढून टाका. असे केल्यानंतर त्यांना सुकवा. खरंत त्यांच्यामधील एंजाइम्सला डीअॅक्टिव्ह करण्याची गरज असते. त्यामुळे स्वाद हा नेहमीच राहतो आणि त्या ताज्या ही राहतात. त्यांना शिजवणे ही सोप्पे जाते.