Frozen Corn : फ्रोझन कॉर्नचा वापर मॅगी, पास्ता किंवा अन्य रेसिपीसाठी केला जातो. काहीजण फ्रोझन कॉर्न भाजून किंवा उकळून खातात. जेणेकरुन चव वाढली जाईल. पण फ्रोझन फूड्स प्रमाणे फ्रोझन कॉर्नचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.खरंतर, फ्रोझन कॉर्नचे सेवन करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे.योग्य पद्धतीने कॉर्न स्टोअर केल्यास ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतात. अन्यथा त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता वाढली जाते. याशिवाय फ्रोझन कॉर्नच्या क्वालिटीकडेही लक्ष द्यावे. यामध्ये बुरशी दिसून आल्यास किंवा कोणत्याप्रकारची बॅक्टेरियल ग्रोथ दिसून आल्यास किंवा वास येत असेल तर असे कॉर्न खाणे टाळा.

Frozen Corn
या गोष्टींकडेही लक्ष द्या
-एक्सपायरी डेट वाचा. त्यानंतरच फ्रोझन कॉर्न खरेदी करा.
-फ्रिझर बर्न किंवा बॅक्टेरिया होऊ नये म्हणून फ्रोझन कॉर्न 0°F (-18°C) किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर स्टोअर करा.
-फ्रोझन कॉर्न वापरण्यापूर्वी नेहमीच रेफ्रिजरेटर, थंड पाण्यात घाला.
-फ्रोझन कॉर्न व्यवस्थितीत शिजवून घ्यावेत.
-खाण्यापूर्वी कॉर्नमधून दुर्गंधी, चिकटपणा जाणवत असेल तर ते खाणे टाळा.
-फ्रोझन कॉर्नवर दिलेली माहिती व्यवस्थितीत वाचून घ्या. (Frozen Corn)
===============================================================================================
हेही वाचा :
उन्हाळ्यात भेसळयुक्त आइस्क्रिम खाण्यापासून रहाल दूर, वापरा या ट्रिक्स
आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे
==================================================================================================
याशिवाय फ्रोझन कॉर्नच्या सेवनापूर्वी याचा योग्य वापर करावा. जसे की, फ्रोझन कॉर्नचा तयार करण्यापूर्वी पाण्यात काही मिनिटांसाठी भिजवून ठेवा. यानंतर कॉर्न गरम पाण्यामध्ये घालून उकळून घ्या. यानंतर हलक्या स्वरुपात उकळून घेतल्यानंतर मीठासह अन्य मसाले मिक्स करा. अर्धवट शिजलेल्या कॉर्नच्या सेवनापासून दूर रहा. यामुळे पोटात दुखण्यास सुरुवात होऊ शकते. याशिवाय पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे कॉर्न उकळवण्यापूर्वी त्याला स्पर्श करुन पहा. कॉर्न सॉफ्ट असतील तर रेसिपीसाठी वापरू शकता.