नादिया चौहान यांचा जन्म कॅलिफोर्नियात झाला. परंतु मुंबईत त्या वाढल्या. त्यांच्या वडीलांचे नाव प्रकाश चौहान असून जे पार्ले एग्रोचे चेयरमन होते. नादिया यांना दोन बहिणी असून त्या यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. नादिया केवळ 17 वर्षाच्या असताना त्यांनी पार्ले एग्रोला ब्रँन्ड मॅनेजरच्या पोस्टसाठी जॉइन केले. नादिया यांना बिझनेसच करायचा होता आणि त्यांनी तो यशस्वीही केला. त्या ब्रँन्ड मॅनेजर ते चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि नंतर जॉइंट डायरेक्टरच्या पदावर पोहचल्या. (Frooti Business)
नादिया यांनी जेव्हा औपचारिक रुपात आपली जबाबदारी सांभळी तेव्हा त्या फ्रुटीकडे लक्ष देत होत्या. त्यावेळी कंपनीचा टर्नओव्हर 300 कोटींचा होता. पार्ले एग्रोला 95 टक्के रेवेन्यू हा फ्रुटीकडून यायचा. त्यांनी सर्वात प्रथम याचे पॅकेजिंग बदलण्याचा निर्णय घेतला. जे पॅकेट आधी हिरव्या रंगात याचे ते पिवळ्या रंगात येऊ लागले. हिच त्यांची कल्पना हिट ठरली. त्यानंतर त्यांनी फ्रुटीची ओळख आणखी वाढावी म्हणून काही पावले उचलल. आता पर्यंत लहान मुलांना लक्षात घेता फ्रुटीची जाहिरात केली जायची तिच कॉन्सेप्ट त्यांनी थोडी बदलून तरूणांसाठी ते वयोवृद्धांसाठी ही अप्लाय केली. यामुळे कंपनीच्या सेलमध्ये वेगाने वाढ झाली.
नादिया यांना या बिझनेसमध्ये कळले की, कंपनी केवळ फ्रुटीवर अधिक निर्भर आहे. जर काही वर-खाली झाले तर कंपनीकडे कोणताही बॅकअप नाही. त्यामुळे फ्रुटीपेक्षा वेगळे काहीतरी म्हणून बाटलीबंद पाणी विक्री करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे Bailey चा जन्म झाला. नादिया येथे थांबल्या नाहीत. त्यांनी काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये ही हात आजमावले. सर्वसामान्यपणे सफरचंदापासून बनवण्यात येणारे सॉफ्ट ड्रिंक अॅपी फिज त्यांनी लॉन्च केले. फिजची ब्रँन्डिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग सर्वकाही अव्वल होते. मार्केटमध्ये ते खुप विक्री केले गेले. फिजला 2005 मध्ये लॉन्च केले गेले. आज या ड्रिंकने मार्केटमध्ये आपली ओळख बनवली आहे. (Frooti Business)
8 हजार कोटींचा झाला बिझनेस
पार्ले एग्रोचा बिझनेस 2022-23 मध्ये 8 हजार कोटींचा झआला आहे. फ्रुटीचा रेवेन्यू जवळजवळ 4 हजार कोटींवर पोहचला आङे. मात्र एकूणच रेवेन्यूमध्ये यची हिस्सेदारी कमी होऊन 48 टक्के झाली आहे. म्हणजेच फ्रुटमुळए कंपनीची कमाई वाढली पण त्याची निर्भरता कमी झाली. नादिया आज कंपनीच्या जॉइंट डायरेक्टर सुद्धा आहेत. त्यांचे लक्ष्य कंपनीला 2030 पर्यंत 20 हजार कोटी रुपयांचे टर्नओव्हर असणरी कंपनी बनवण्याचे आहे.