गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक आश्चर्याचे धक्के आपल्याला पाहीला मिळाले. प्रत्येक महिन्यात एकदा तरी नेत्यांनी पक्षांतर केल्याची बातमी आपल्यापर्यंत येतच होती. मराठी टीव्ही मालिकांपेक्षा अधिक ट्विस्ट अँड टर्न्स महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु होते. नेते पक्ष आणि चिन्ह ह्यासंगळ्यांचीच अदलाबादल होण्याचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकांनंतर थोडं स्थिरावलं होतं त्यातच आता आणखी एक मोठी बातमी चर्चेत येते ती म्हणजे पुण्याची पसंत मोरे वसंत ह्यांनी पुन्हा पक्ष बदलल्याची. लोकसभेच्या निवडणुकांनंतर असं काय झालं की वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला अवघ्या तीन महिन्यात राम राम ठोकला. जाणून घेऊया या विडियोच्या माध्यमातून.
वसंत मोरे यांनी मनसेत असताना सलग तीनवेळा नगरसेवक पदासाठी विजय मिळवला होता. याशिवाय त्यांनी पुणे महानगरपालिकेत विरोधीपक्ष नेत्याचीही भूमिका पार पाडली होती. २०२१ साली राज ठाकरेंनी मोरेंना कृष्णकुंजवर बोलावून पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं होतं.. पण २०२३ ला राज ठाकरेंनी पक्षाची विचारसरणी आणि झेंडा बदलून मनसेचं इंजिन हिंदुत्वाकडे वळवलं. आणि त्याचाचं फटका वसंत मोरेंना बसण्याचे चान्सेस होते. वसंत मोरेंचा वॉर्ड असलेल्या कात्रजचा प्रभागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम राहतात.
वसंत मोरे यांचे इथल्या मुस्लिमांसोबत चांगले संबंध आहेत. या भागात वसंत मोरे यांनी मुस्लिमांसाठी बरीच कामे केलेली आहेत. पक्षाचा नवा आदेश पाळणं वसंत मोरेंना जड जात होतं. मोरेंनी त्यांची खदखद व्यक्त केली आणि त्यांच्याकडून पुण्याचं शहर अध्यक्षपदच काढून घेण्यात आलं. तरी लोकसभा निवडणूकीची अपेक्षा ठेऊन वसंत मोरे शांत राहिले. पण पक्षाकडून कुठलीच आशा न दिसल्याने. १२ मार्च २०२४ रोजी अखेर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमाद्वारे मनसेतून आपली exit जाहीर केली.
खरंतर मनसेतून exit घेतल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत आणि शरद पवार ह्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. आणि मग अधांतरी असणाऱ्या मोरेंना वंचित बहुजन आघाडीतून तिकीट मिळालं. स्वताच्या ताकदीवर निवडणुकी जिंकणाऱ्या वसंत मोरेंचं
लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं. म्हणूनच त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे.
मी पक्ष सोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला होता “साहेब मला माफ करा” नंतर प्रकाश आंबेडकरांचा फोन आला पण मी त्यांना सांगितलं की आता खूप उशीर झाला आहे. ठाकरे गटात जाण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय असं त्यांच म्हणण आहे शिवाय माझ्या पाठिशी असणार्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे असं ही ते म्हणाले आहेत.
====================
हे देखील वाचा : यांच्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही !
====================
९ जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील. तसं बघितलं तर मोरे हे पूर्वाश्रमीचा शिवसैनिक. वयाच्या १८-१९ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेची शाखा सुरु केली. ३१ वर्षांचा होईपर्यंत ते शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल. कुठल्याही प्रलोभानापोटी मी शिवसेनेत जात नाहीये उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेन अस ही ते म्हणतायेत. लोकशाहीत आणि राजकारणात लोक पक्षांतर करतात, भूमिका बदलतात पण नेमका कोणाचा फायदा कोणाला होतो हे बघणं महत्त्वाचं.