जेव्हा पावसाचे दिवस सुरु होतात तेव्हा प्रत्येकजण वाट पाहत असतो की, खुप पाऊस पडावा. मात्र तसे बहुदा होत नाही. यामुळेच शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक विविध पद्धतीने पाऊस पाडण्यासाठी काही ट्रिक्स वापरतात. काही ठिकाणी तर यज्ञ सुद्धा केले जातात. तर कुठे बेडकांचे लग्न लावले जाते. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. भारतात पाऊस पडावा म्हणून काही ठिकाणी चक्क बेडकांच लग्न लावून दिले जाते. जेणेकरुन लवकर पाऊस पडेल. त्याचसोबत त्यांचा घटस्फोट सुद्धा होतो. नक्की ही काय परंपरा आहे याच बद्दल आपण जाणून घेऊयात सविस्तर. (Frog Marriage)
कसे केले जाते लग्न?
पाऊस पडावा म्हणून दोन बेडकांचे लग्न लावून दिले जाते. हे लग्न व्यक्तींचे होते तसेच थोडेफार असते. सर्वसामान्यपणे एखाद्या लग्नात सजावट, नाच-गाणं आणि घरी पाहुणे येतात आणि नंतर लग्न सोहळा पार पडतो. मात्र बेडकांच्या लग्नात चक्क बेडकाला सुद्धा सिंदूर लावले जाते. त्यांचे लग्न पाहून तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या लग्नाची आठवण येईल.
लग्नानंतर काय होते?
परंपरांनुसार, एकदा लग्न झाल्यानंतर त्या जोडप्याला नदी किंवा तलावात सोडले जाते. अशा प्रकारे त्यांचा विवाह संपन्न झाल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की, जर असे झाले तर त्या क्षेत्रात पाऊस पडतो. आता येथे हे सर्वकाही थांबत नाही. तर त्यांच्या घटस्फोट सुद्धा केला जातो.

का करतात घटस्फोट?
खरंतर लग्नानंतर घटस्फोटाची सुद्धा परंपरा आहे. मान्यतांनुसार बेडकांचे लग्न लावल्यानंतर पाऊस पडतो. पण जेव्हा दोन बेडुक वेगवेगळे होतात तेव्हा पाऊस पडणे थांबतो. म्हणजेच परंपरा अशी आहे की, जेव्हा दोन बेडूक एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याचे मानले दाते. खरंतर जेथे अधिक पाऊस पडतो तेथे त्यांचा घटस्फोट केला जातो. (Frog Marriage)
हेही वाचा- समुद्रातील ‘या’ मंदिराची सुरक्षा करतात साप
कशा प्रकारे होते घटस्फोट?
घटस्फोटासाठी सुद्धा दोन बेडुक पकडले जातात. एका परंपरेनुसार त्यांना वेगवेगळ्या डबक्यात सोडले जाते. अशा प्रकारे त्यांच्यात घटस्फोट होतो. ते वेगळे होतात. असे म्हटले जाते की, यामुळे पाऊस पडणे थांबतो.
असे खरंच होते आणि त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होतात. ही एक परंपरा असली तरीही आपण मात्र पावसाची मज्जा घ्यायची असते.