Home » फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे काय? जाणून घ्या फायद्यासह तोटे

फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे काय? जाणून घ्या फायद्यासह तोटे

जापानमध्ये सध्या फ्रेंडशिप मॅरेजचा ट्रेण्ड अधिक वाढला आहे. यामागील कारण म्हणजे नव्या पिढीला विवाह, मुलं जन्माला घालणे अशा जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत.

by Team Gajawaja
0 comment
Friendship Marriage
Share

Friendship Marriage : जापानमध्ये सध्या फ्रेंडशिप मॅरेजचा ट्रेण्ड अधिक वाढला आहे. यामागील कारण म्हणजे नव्या पिढीला विवाह, मुलं जन्माला घालणे अशा जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत. यामुळेच त्यांनी फ्रेंडशिप मॅरेजचा ट्रेण्ड सुरु केला आहे. रिपोर्ट्सनुसार, वर्ष 2015 नंतर जवळजवळ 500 जणांनी फ्रेंडशिप मॅरेज केले आहे. यामध्ये पार्टनरसोबत फिरू शकता. पण त्याच्यासोबत आपल्या समस्या शेअर करू शकत नाही. याच ट्रेण्डबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे नक्की काय?
फ्रेंडशिप मॅरेज एक प्रकारचा करार आहे. यामध्ये कपल कायदेशीर रुपात वैवाहिक आयुष्य जगतात. पण त्यांच्यामध्ये रोमँटिक रिलेशन असे काहीही नसते अशातच लग्न झाल्यानंकर एकमेकांसोबत राहणे किंवा न राहणे कपलवर निर्भर करते. याशिवाय कपल एकत्रित किंवा वेगवेगळेही राहू शकतात. जर दोघांच्या सहमतीने मुलांचा प्लॅन केल्यास आर्टिफिशिअल पद्धतीने मुलांना जन्म देऊ शकतात. फ्रेंडशिप मॅरेजसंदर्भात लोकांचे असे म्हणणे आहे की, हा विवाह लाइफ पार्टनर नव्हे तर रुममेटसोबत राहण्यासारखे आहे.

फ्रेंडशिप मॅरेजला कसे हँडल करतात कपल?
फ्रेंडशिप मॅरेजआधी कपल एकमेकांसोबत खूप वेळ व्यथितीत करतात. याशिवाय आयुष्यातील काही क्षण एकमेकांसोबत शेअऱ करतात. घरातील खर्च, एकमेकांसोबत कसे राहायचे, घरातील कामे कशी करायची अशा सर्व गोष्टी ठरवल्या जातात. जापानच्या एका रिपोर्ट्सनुसार, फ्रेंडशिप मॅरेजमध्ये बहुतांशजण अशीच लोक आकर्षित होतात ज्यांचे वय 32 वर्षांच्या आसपास आहे. (Friendship Marriage)

जापानव्यतिरिक्त अन्य देशात ट्रेण्ड
जापानव्यतिरिक्त सिंगापूरमध्येही फ्रेंडशिप मॅरेजचा ट्रेण्ड सुरु आहे. येथे काही काळाआधी 24 वर्षीय दोन महिलांनी फ्रेंडशिप मॅरेज केले होते. असे काही लोक आहेत जे आपल्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या मित्रमैत्रीणीसोबत मिळून चीनमध्ये घर घेऊ इच्छितात. ते देखील फ्रेंडशिप मॅरेजकडे आकर्षित होतात.


आणखी वाचा :
रिलेशनशिपमध्ये ब्रेकअपचे कारण ठरतील तुमच्या ‘या’ सवयी, वेळीच सुधारा
रागीष्ट स्वभावाच्या व्यक्तींनी रागावर असे ठेवा नियंत्रण

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.