Friendship day 2023: मैत्रीचे नाते अत्यंत भावनात्मक, सुंदर असते. हे असे एक नाते असते जेथे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींशी परिवारापेक्षा अधिक इमोशनली जोडले जाता. मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो. अशातच जगभरात आणि देशात फ्रेंन्डशिप डे साजरा केला जातो. भारतात प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंन्डशिप डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्रमंडळींसोबत मज्जा, मस्ती आणि या दिवसाचा आनंद घेतो. एकमेकांना फ्रेंन्डशिप डे निमित्त शुभेच्छा दिल्या जातात. अशातच भारतात ६ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.
फ्रेंडशिप डे चा उद्देश मैत्रीचे महत्त्व समजून घेणे. मित्रत्वाची भावना टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस मित्रत्वाला समर्पित आहे. फ्रेंडशिपच्या डे दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्रांसोबत एंजॉय करतात. ते आपल्या मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. लोक हा दिवस विविध प्रकारे साजरा करतात. काहीजण एका दिवसांची ग्रुप पिकनिकचा प्लॅन किंवा डिनरचा प्लॅन करतात. तु्म्ही सुद्धा हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करू शकता.
पहिल्यांदा १९५८ मध्ये Dr Ramon Artemio Bracho यांना आला. त्यांनी ही आयडिया त्यांच्या मित्रांसोबत शेअर केली. त्यानंतर याची सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय फ्रेंन्डशिप डे पहिल्यांदा ३० जुलै १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंन्डशिप डे धर्मयुद्धाने प्रस्तावित केला होता. ही एक आंतरराष्ट्रीय नागरिक संघटना आहे. त्यानंतर २०११ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतरुपात फ्रेंन्डशिपची डे ची तारीख ३० जुलै निवडली. याच कारणास्तव विविध देशांत फ्रेंन्डशिप डे ३० जुलैला साजरा केला जातो. दरम्यान अमेरिका, भारत, बांग्लादेश सारख्या देशात फ्रेंन्डशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
फ्रेंन्डशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यामागे आणखी एक कथा सांगितली जाते. त्यानुसार १९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याचा एक खुप जवळचा मित्र होता. त्याला जेव्हा याबद्दल कळले तेव्हा त्याने सुद्धा आत्महत्या केली. मित्रांमधील असे नाते पाहता अमेरिकच्या सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंन्डशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतासह अन्य देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंन्डशिप डे साजरा करण्यात जाऊ लागला. (Friendship day 2023)
हेही वाचा-वयाने मोठ्या असलेल्या पार्टनरला डेट करताना असे सांभाळा नाते
प्रत्येकवर्षी फ्रेंन्डशिप डे ची थीम ही वेगवेगळी असते. यंदाच्या फ्रेंन्डशिप डे ची थीम Sharing the human spirit through friendship अशी आहे. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये याची थीम सुद्धा हिच होती.