Home » मैत्री कितीही घट्ट असली तरी चुकूनही ‘ या ‘ गोष्टी शेअर करू नका

मैत्री कितीही घट्ट असली तरी चुकूनही ‘ या ‘ गोष्टी शेअर करू नका

प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असा असतो जो आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख दुसऱ्या व्यक्तीला मोकळेपणाने सांगतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्याबद्दल आपल्या जवळच्या देखील व्यक्तींना सांगू नये.

by Team Gajawaja
0 comment
Friendship with neighbors
Share

Friendship Boundaries :   मैत्री सर्वाधिक सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. मित्रपरिवाराशिवाय आयुष्य अपूर्ण असल्याचे सर्वांनाच वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो ज्याच्यासोबत तुम्ही सर्वकाही गोष्टी शेअर करू शकता. पण नेहमीच लक्षात ठेवा तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरीही काही गोष्टी सांगणे टाळले पाहिजे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…..

पार्टनरच्या भूतकाळाबद्दल बोलू नका
बहुतांशजणांना सवय असते की, जरा काही झाले तरीही मित्रमैत्रीणाला सांगतात. अशातच पार्टनरच्या काही गोष्टी मित्राला सांगणे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या मित्राच्या मनात तुमच्या पार्टनरबद्दलची एक वेगळे व्यक्तिमत्व निर्माण होते. अशातच नात्यातील खासगी गोष्टी, पार्टनरच्या भूतकाळातील काही गोष्टी सांगणे टाळले पाहिजे. यामुळे तुमचे रिलेशनशिप बिघडले जाऊ शकते.

Friendship with neighbors

खासगी फोटो आणि मेसेज शेअर करणे
पार्टनरचे खासगी फोटो किंवा मेसेज कधीच मित्रपरिवारासोबत शेअर करू नका. ही तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी चूक ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीचे एक खासगी आयुष्य असते. अशातच पार्टनरचे मेसेज आणि फोटो कधीच मित्रपरिवारामध्ये शेअर करू नका. (Friendship Boundaries)

पार्टनरच्या घरातील मंडळींबद्दल वाईट बोलणे
काहीवेळेस पार्टनर किंवा त्याच्या घरातील मंडळींबद्दल बहुतांशजण मित्रपरिवाला सांगतात. जेणेकरुन त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्याने तुमचे मन हलके आणि शांत होते. लक्षात ठेवा पार्टनरच्या घरातील मंडळींबद्दल किंवा त्याच्याबद्दल इतरांसमोर बोलणे टाळा.


आणखी वाचा :
हेल्दी रिलेशनशिपसाठी ‘या’ मर्यादा ठरवा
आई-वडिलांच्या ‘या’ सवयींमुळे मुलांवर होतो परिणाम
नाते मोडण्याची नवी पद्धत Delicate Dumping चा ट्रेण्ड

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.