फ्रान्समध्ये गेल्या दोन वर्षापासून असलेले राजकीय संकट अधिक गडद होत चालले आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावरील राजकीय विश्वास कमी होत असतांना पंतप्रधानांचे राजीनामा सत्र कायम आहे. यामुळे तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी त्यांचे नवीन मंत्रिमंडळ नियुक्त केल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिला. त्याआधी लेकोर्नू यांना सरकार पाडण्याच्या विरोधकांकडून धमक्या आल्या होत्या. लेकोर्नू हे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी म्हणून परिचित आहेत. २०२२ मध्ये मॅक्रॉन यांच्या पुनर्निवडणुकीनंतर नेमणूक झालेले ते पाचवे पंतप्रधान होते. (Louis de Bourbon)

सध्या फ्रान्सच्या संसदेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांनी मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच आता लेकोर्नू यांच्या राजीनाम्यामुळे फ्रान्समध्ये एक गंभीर राजकीय संकट निर्माण झाले आहे. यापूर्वी असा प्रकार फ्रान्सच्या संसदेत झाला नव्हता. याबाबत जनतेमध्येही नाराजी आहे. लोकमान्यता नसलेले मंत्रीमंडळ संसदेत असल्याची टीका करण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी होत असतांना आता फ्रान्सच्या राजकारणात एक नाव चर्चेत आलं आहे, ते म्हणजे, लुई सोळावा यांचे वंशज लुई डी बर्बन. वास्तविक फ्रान्सच्या इतिहासात २१ सप्टेंबर १७९२ हा दिवस ऐतिहासिक मानण्यात येतो. याच दिवशी फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आली फ्रान्समध्ये लोकशाही अस्तित्वात आली. मात्र सध्या फ्रान्समधील राजकीय अस्थिरता बघता, पूर्वीची राजेशाही बरी होती, अशी परिस्थिती आहे. याचवेळी लुई सोळावा यांचे वंशज लुई डी बर्बन हे पुढे आले आहेत. (International News)
फ्रान्सच्या बोर्बन राजघराण्यातील या वंशजानी फ्रान्सच्या कल्याणासाठी पुन्हा आपण देशाची सुत्र हाती घेण्यास तयार असल्याचे विधान एका जाहीर मुलाखतीमध्ये केले आहे. राजसत्ता लोप पावली असली तरी, फ्रान्समध्ये आजही लई डी बर्बन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या सर्वानीच त्यांना पाठिंबा दिला असून फ्रान्सच्या भविष्यासाठी लई यांनी सत्ता हाती घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे लोकशाही फ्रान्सची वाटचाल पुन्हा राजेशाहीकडे सुरु झाली आहे का, हा प्रश्न चर्चिला जात आहे. आपल्या सर्वांनाच इतिहासाच्या धड्यात फ्रान्सची क्रांती, हा धडा होता. लोकशाहीसाठी फ्रान्समधील जनतेनं दिलेला हा लढा अनेक देशामध्ये लोकशाहीची प्रेरणा देऊन गेला. २१ सप्टेंबर १७९२ रोजी फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आली. राष्ट्रीय अधिवेशनात राजेशाही रद्द झाल्याचे घोषित केले आणि फ्रेंच प्रथम प्रजासत्ताक स्थापन झाले. यापूर्वी, १० ऑगस्ट १७९२ रोजी झालेल्या बंडानंतर राजा लुई सोळावा यांना पदच्युत करण्यात आले. येथूनच फ्रान्समधील राजेशाहीच्या पतनाची सुरुवात झाली. (Louis de Bourbon)

याच दिवशी क्रांतिकारकांनी राजा लुई सोळावा आणि त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतले. २१ जानेवारी १७९३ रोजी राजा लुई सोळावा यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांची पत्नी मेरी-अँटोइनेट हिलाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे फ्रान्समधील बोर्बन घराण्याची सत्ता कायमची संपुष्ठात आली. मात्र आता त्याच घराण्यातील वारस फ्रान्सच्या राजकीय अस्थिरतेमुळे पुढे आला आहे. फ्रान्समध्ये गेल्या दोन वर्षात पाच पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. यावर लुई सोळावा यांचे वंशज लुई डी बर्बन यांनी एका जाहीर मुलाखतीमध्ये फ्रान्समध्ये राजेशाही परत आणण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले आहे. शिवाय आपण पुन्हा देशाची सेवा करण्यास तयार आहेत, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. (International News)
========
Pakistan : पाकिस्तानमध्ये दाणादाण आणि डुरंड रेषा !
========
फ्रेंच राजा लुई सोळावा यांचे वंशज लुई डी बर्बन यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, ते सध्याच्या सरकारच्या राजकारणावर खूप नाराज आहेत. यामुळेच देशात पुन्हा राजेशीही पुन्हा येण्याची वेळ झाल्याचे लई डी बर्बन सांगतात. लुई डी बर्बन, हे लुई XX म्हणूनही ओळखले जाते. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांचा खूप मोठा पाठिराखा वर्ग आहे. गेल्या काही महिन्यापासून ते फ्रान्सची राजकीय, संस्थात्मक आणि सामाजिक परिस्थिती बिघडत चालल्याबाबत वक्तव्य करत आहेत. बोर्बन कुटुंबाचा प्रमुख म्हणून देशासाठी बोलणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगून त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावरही टीका केली आहे. लुई डी बर्बन ५१ वर्षांचे आहेत आणि बरेच जण त्यांना फ्रान्सचा भावी राजा म्हणून वंदना करतात. त्यामुळे हे लुई आता फ्रान्समध्ये राजकीय उठाव करणार का, याकडे लक्ष लागले आहे. (Louis de Bourbon)
सई बने
