Home » फ्रान्सचा तरुण पंतप्रधानपदी झाले विराजमान

फ्रान्सचा तरुण पंतप्रधानपदी झाले विराजमान

by Team Gajawaja
0 comment
Prime Minister of France
Share

भारताचा मित्र देश असलेल्या फ्रान्सच्या राजकारणात सध्या मोठे बदल होत आहेत.  गेल्या वर्षी हाच देश उपद्रवींच्या हातचं खेळणं झाला होता.  त्यानंतर फ्रान्समधील राजकारणात कमालीचा बदल झाला.  परदेशातून आलेल्या निर्वासितांवर या देशाचं अवघं राजकारण फिरत आहे.  त्यातूनच फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी राजनामा दिला. (Prime Minister of France)

त्याबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका तरुणाला पंतप्रधानपदी विराजमान केलं आहे.  या तरुणाचं वय अवघं 34 वर्ष आहे.  फ्रान्सच्या या सर्वाधिक तरुण पंतप्रधानाचं नाव आहे, गॅब्रिएल अटल.  गॅब्रिएल अटल  हे जरी सर्वात तरुण नेते आणि फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.  अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.  याच गॅब्रिएल अटल यांनी काही महिन्यापूर्वी घेतलेल्या एका निर्णयावर वाद निर्माण झाला होता.  त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टिका झाली होती.  पण गॅब्रिएल अटल आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 

कारण आपल्यासाठी आपला देश प्रथम आहे, त्यानंतर बाकीचे सर्व हे त्यांचे धोरण आहे.  याच त्यांच्या धोरणी आणि स्पष्ट स्वभावाचे अनेक चाहते आहेत.  फ्रान्सच्या शाळेत बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेणारे गॅब्रिएल अटल हे समलैंगिक आहे.  विशेष म्हणजे, ही बाब त्यांनी स्वतः जाहीर केली आहे.  तरुण, अभ्यासू, स्पष्टवक्ता आणि देशभक्त असा गॅब्रिएल अटल यांचा नावलौकीक आहे.  या तरुण नेत्याची थेट पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांचा फॅनक्लबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Prime Minister of France) 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली,  आणि एकच गोंधळ उडाला.  कारण याच गॅब्रिएल अटल यांनी काही दिवसांपूर्वी आपण समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते.  एवढा तरुण नेता फ्रान्ससारख्या देशाची पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळू शकतो का, हा प्रश्नही विचारण्यात आला.  मात्र फ्रान्समध्ये या निवडीचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.  कारण गॅब्रिएल अटल यांचा धडाडीचा स्वभाव तेथील जनतेला माहित आहे.  आता फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान झालेले गॅब्रिएल यांनी  याआधीही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदा-या पाड पाडल्या आहेत.  शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असतांनाच त्यांनी फ्रान्समधील सरकारी शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती.  या त्यांच्या निर्णयावर अनेकांनी टिका केली.  मात्र अटल यांनी हा निर्णयावर अटल ठाम राहिले.  आमच्या देशात आमचे नियम प्रथम हा त्यांचा निर्णय तरुणांमध्ये लोकप्रिय झाला होता.  (Prime Minister of France)

गॅब्रिएल अटल यांनी एलिझाबेथ बॉर्न यांची जागा घेतली आहे.  एलिझाबेथ बॉर्न यांनी परदेशी नागरिकांना निर्वासित करण्याच्या सरकारच्या क्षमतेला बळकटी देणाऱ्या इमिग्रेशन कायद्यावरून झालेल्या वादानंतर राजीनामा दिला.  फ्रान्समध्ये इमिग्रेशन कायद्याबाबत राजकीय वादळ सुरु आहे.  या वादळाचा क्रेंद्रबिंदू आता नवे पंतप्रधान गॅब्रिएल अटल रहाणार आहेत.  गॅब्रिएल हे आधुनिक विचारांचे असले तरी ते राष्ट्रभक्त आहेत.  आपल्या देशाच्या हितासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर भाषणादरम्यान सांगितले आहे.  त्यामुळेच फ्रान्सच्या राजकारणातील एक तेजस्वी आणि उदयोन्मुख राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  

गॅब्रिएल अटल यांची शिक्षणमंत्री म्हणून कारर्कींदही गाजली आहे.  या पदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी प्रथम फ्रेंच शाळांमध्ये बुरखा पद्धतीवर बंदी घालण्याची घोषणा केली. आता पंतप्रधान झाल्यावर अटल हे असेच धाडसी निर्णय घेतात का ? याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  फ्रान्समधील अस्थिर राजकीय परिस्थिबरोबर अटल यांच्यापुढे फ्रान्समध्ये जूनमध्ये होणार्‍या युरोपियन संसदेच्या निवडणुकांचे आव्हान आहे.(Prime Minister of France)

गॅब्रिएल यांचा जन्म 16 मार्च 1989 रोजी क्लेमार्ट, फ्रान्स येथे झाला. त्यांचे वडील यवेस अटल हे वकील आणि चित्रपट निर्माते आहेत, तर आई  मेरी या एका चित्रपट निर्मिती कंपनीमध्ये कामाला होत्या. फ्रान्समध्ये अतिशय दर्जेदार मानल्या जाणा-या इकोले अल्सेसिन या खाजगी अटल यांचे शिक्षण झाले आहे. मास्टर ऑफ पब्लिक अफेअर्समध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली असून कायद्याचा अभ्यासही  केला आहे.

============

हे देखील वाचा : जगातील अनोखे रेस्टॉरंट, नकारात्मक विचार करणाऱ्याच मंडळींचे केले जाते स्वागत

============

शालेय जीवनापासूनच ते विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रीय होते.  2006 मध्ये झालेल्या युवा निदर्शनात अटल यांचा प्रमुख सहभाग होता.   फ्रेंच नॅशनल असेंब्लीमध्ये अटल यांनी इंटर्नशिप केली.  2012 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अटल यांनी मारिसोल टूरेनसोबत काम केले. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे आरोग्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले.  2014 च्या महापालिका निवडणुकीतही गॅब्रिएल अटल यांचा सहभाग होता.  2016 मध्ये सोशलिस्ट पक्षातून अटल बाहेर पडले, तेव्हा त्यांचे वय अवघे 17 होते.  त्याच्या पुढच्याच वर्षी, 18 जून 2017 रोजी फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे सदस्य बनले.  अटल यांची भाषणे गाजली आहेत.  16 ऑक्टोबर 2018 रोजी अटल यांची सहाय्यक मंत्री म्हणून नियुक्ती झाली.  जुलै 2023 मध्ये अटल यांची राष्ट्रीय शिक्षण आणि युवा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Prime Minister of France)

आता हेच अटल फ्रान्सचे पंतप्रधान झाले आहेत.  फ्रान्समध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांनुसार मॅक्रॉन सरकारमध्ये गॅब्रिएल अटल यांना सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.  त्यामुळे अटल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारर्किदीत त्यांच्याकडून अशाच धडाकेबाज कामाची प्रतीक्षा फ्रान्सच्या युवकांना आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.