Home » Navratri : चौथी माळ : नवदुर्गेचे चौथे स्वरूप – श्री कुष्मांडा देवी

Navratri : चौथी माळ : नवदुर्गेचे चौथे स्वरूप – श्री कुष्मांडा देवी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

आज २५ सप्टेंबर रोजी नवरात्रीचा चौथा दिवस अर्थात चौथी माळ. आजचा रंग पिवळा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण श्री शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा देवी यांची अनुक्रमे तीन दिवस पूजा केली. आज चौथा दिवस असून, आज देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात चौथ्या दिवशी माँ दुर्गेचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सर्वजण विधीनुसार कुष्मांडा देवीची पूजा करतात आणि नैवेद्य, फळे अर्पण करून आरती करतात.(Navratri)

नवरात्रीची चतुर्थ माळ ‘कुष्मांडा’ देवीला समर्पित आहे. ‘कुष्मांड’ म्हणजे ‘कोहळा’. कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच बीजनिर्मिती, पुनरूत्पादनासाठी तीची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते. उत्पती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे. आपल्या स्मित हास्यामुळे संपुर्ण ब्रह्मांडांत देवी कुष्मांडाला ओळखले जाते, तसेच याच स्मित हास्याने ब्रह्मांडांचे उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. आज देवीला कोहळ्याची पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे करून अर्पण केले जातात. कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे ऊबदार आणि अण्ड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्माण्ड उत्पन्न झाले, म्हणून देवीला, कुष्मांडा हे नाव दिले गेले. (Marathi News)

कुष्मांडा देवीचे स्वरूप
कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते. या देवीला आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्षा, घृणा, मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात. (Todays Marathi Headline)

=======

Navratri : जाणून घ्या घटस्थापनेत धान्य पेरण्याचे महत्व

=======

Navratri

कुष्मांडा देवीची पौराणिक कथा
हिंदू धर्मग्रंथानुसार, प्राचीन काळी जेव्हा काहीच नव्हते तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी विश्वाच्या निर्मितीची कल्पना केली होती. त्यावेळी संपूर्ण विश्वात अंधार पसरला होता आणि सर्व काही स्तब्ध होते. त्यात ना कुठला सुर होता ना कुठला आवाज. सर्वत्र फक्त अंधार आणि शांतता होती. त्यावेळी विश्वाच्या निर्मितीसाठी त्रिदेवांनी आदिशक्ती देवी दुर्गेची मदत घेतली. त्यानुसार, आदिशक्ती देवी दुर्गेचे चौथे रूप माता कुष्मांडाने क्षणात विश्वाची निर्मिती केली. असे म्हणतात की, कुष्मांडा मातेने आपल्या मंद हास्याने विश्व निर्माण केले. आणि या मंद हास्याने सारे विश्व उजळून निघाले. देवीने आपल्या हास्याने विश्वाची निर्मिती केल्यामुळे देवीला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. शास्त्रानुसार, सूर्यलोकात देवी कुष्मांडाचा वास आहे. विश्वाची निर्मिती करणाऱ्या कुष्मांडा मातेच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजाने सूर्य प्रकाशित झाला असे म्हटले जाते. देवी सूर्यलोकात आणि बाहेर सर्वत्र वास करू शकते. (Top Marathi Headline)

कुष्मांडा देवीचे पूजन
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते. (Top Marathi Headline)

कुष्मांडा देवीची माहिती
दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरुपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. तिच्या भक्तीमुळे उदंड आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. (Latest Marathi Headline)

Navratri

देवी कुष्मांडा मंत्र
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे॥ (Latest Marathi News)

ध्यान मंत्र
वंदे वांछित कामर्थेचन्द्रार्घकृतशेखराम्.
सिंहरूढाअष्टभुजा कुष्माण्डायशस्वनीम्॥
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च.
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥
वंदे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्.
सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्वनीम्॥
दुर्गतिनाशिनी त्वंहि दारिद्रादि विनाशिनीम्.
जयंदा धनदां कूष्माण्डे प्रणमाम्यहम्॥
जगन्माता जगतकत्री जगदाधार रूपणीम्.
चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम्॥ (Top Marathi News)

देवी कुष्मांडा आरती
कुष्मांडा जय जग सुखदानी।
मुझ पर दया करो महारानी॥
पिगंला ज्वालामुखी निराली।
शाकंबरी माँ भोली भाली॥
लाखों नाम निराले तेरे ।
भक्त कई मतवाले तेरे॥
भीमा पर्वत पर है डेरा।
स्वीकारो प्रणाम ये मेरा॥
सबकी सुनती हो जगदंबे।
सुख पहुँचती हो माँ अंबे॥ (Top Trending News)

=======

Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?

=======
तेरे दर्शन का मैं प्यासा।
पूर्ण कर दो मेरी आशा॥
माँ के मन में ममता भारी।
क्यों ना सुनेगी अरज हमारी॥
तेरे दर पर किया है डेरा।
दूर करो माँ संकट मेरा॥
मेरे कारज पूरे कर दो।
मेरे तुम भंडारे भर दो॥
तेरा दास तुझे ही ध्याए।
भक्त तेरे दर शीश झुकाए॥ (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.