Home » Cricket : भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचे दुःखद निधन

Cricket : भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचे दुःखद निधन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket
Share

क्रिकेटविश्वामधे भारताचे नाव सर्वात वर आहे. भारतीय क्रिकेट टीमने आपल्या खेळाने या परकीय खेळाला भारतात मोठा नावलौकिक मिळवून तर दिला. शिवाय आजच्या घडीला या खेळावर भारताचे वर्चस्व आहे. क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमधील रँकिंगमध्ये भारत टॉपला आहे. भारतीय क्रिकेटला जगभरात ओळख मिळवून देण्यात आजवर अनेक क्रिकेटर्सने मोठी भूमिका बजावली आहे. यातलेच एक मोठे आणि महत्वाचे नाव म्हणजे दिलीप दोषी. दिलीप दोषी यांच्याशी निगडित एक दुःखद बातमी येत आहे. (Dilip Doshi)

भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. दिलीप दोशी यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने लंडनमध्ये झाले. दिलीप दोशी यांनी २३ जून रोजी अखेरचा श्वास घेतला. एकीकडे भारत आणि इंग्लडमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना ऐन रंगात आलेला असताना दुसरीकडे दोषी यांच्या मृत्यूच्या बातमीने भारतीय क्रिकेटविश्वात निराशा पसरली आहे. (Todays Marathi Headline)

दिलीप दोषी यांनी भारतासाठी मॅच खेळताना अनेक रेकॉर्ड तयार केले. त्यांच्या आक्रमक खेळण्यामुळे भारतासाठी अनेकदा विजय सोपा झाला होता. डावखुरे स्पिनर असलेल्या दिलीप दोशी यांनी भारतासाठी १९७९ ते १९८३ या कालावधीमध्ये ३३ टेस्ट आणि १५ वनडे मॅच खेळल्या. दिलीप दोशी यांनी टेस्टमध्ये ११४ विकेट आणि वनडेमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या. टेस्टमध्ये दिलीप दोशी यांनी इनिंगमध्ये ६ वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. तर वनडेमध्ये त्यांनी ३.९६ च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली होती. दोशींनी केवळ ४ वर्षांमध्ये त्यांच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. दोशी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आत्मचरित्रही लिहिलं. ‘स्पिन पंच’ असं दोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. (Top Marathi Headline)

Cricket

दिलीप दोषी यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी अर्थात 11 सप्टेंबर १९७९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. दिलीप दोषी यांनी आपल्या पहिल्याच टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १०३ रनमध्ये ६ विकेट घेतल्या होत्या तर सामन्यामध्ये त्यांनी १६७ रन देऊन ८ विकेटस मिळवल्या होत्या. दोषी यांचे पहिल्याच टेस्ट सामन्यामध्ये ५ विकेट मिळवणाऱ्या ९ भारतीय बॉलरच्या यादीमध्ये नाव सामील झाले होते. (Marathi Latest NEws)

दिलीप दोशी यांची एकदिवसीय कारकीर्द ३ वर्षांची होती. दोशींनी ६ डिसेंबर १९८० रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात दिलीप दोशी यांनी ५ विकेट घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे या सामन्यात दिलीप दोशी पायाच्या तुटलेल्या बोटाने खेळले होते. तर पाकिस्तान विरुद्ध १७ डिसेंबर १९८२ साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. या तीन वर्षांमध्ये दोशींनी १५ सामन्यांमध्ये २२ विकेट्स मिळवल्या. तसेच दोशी यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सौराष्ट्रसह बंगाल आणि नॉटिंघमशायरचे प्रतिनिधित्व देखील केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिलीप दोशी यांच्या नावावर ८९८ विकेट होत्या. दिलीप दोशी यांनी १९८० च्या दशकात भारतीय क्रिकेट बोर्डाच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : America : अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये इराणचे अणू प्रकल्प उध्वस्त, काय आहे बंकर बस्टर बॉम्ब?

Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !

=========

दिलीप दोषी यांच्या वैयक्यिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा आहे. दिलीप दोशी यांचा मुलगा नयन हा सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट आणि इंग्लंडमध्ये सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळला आहे. नयन यानेही फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वडिलांप्रमाणे सौराष्ट्र आणि सरेचं प्रतिनिधित्व केलं. दोशी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान दिलीप दोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी, अनेक आजी माजी क्रिकेटर्सने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच बीसीसीआयने दोशींना श्रद्धांजली वाहिली आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.