Home » मांसाहारी वनस्पती! खाते कीटक, अळ्या अन् छोटी बेडकं

मांसाहारी वनस्पती! खाते कीटक, अळ्या अन् छोटी बेडकं

0 comment
Share

साधारणपणे पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून झाडे जगतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, की एखादी वनस्पती मांसाहारी देखील असू शकते? तुमचा यावर विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे. उत्तराखंडच्या जंगलांमध्ये हजारो अज्ञात आणि विचित्र वनस्पती आढळतात. अलीकडेच येथे अत्यंत दुर्मिळ मांसाहारी वनस्पती आढळून आली आहे. या वनस्पतीचे नाव Atricularia fersellata आहे. चमोली जिल्ह्यातील मंडल खोऱ्यात याचा शोध लागला आहे. या वनस्पतीचा शोध वनविभागाने लावला आहे आणि ते म्हणतात की, ही एक दुर्मिळ वनस्पती आहे. ज्याला सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा व्यतिरिक्त जगण्यासाठी इतर जीवांवर अवलंबून राहावे लागते. (carnivorous plant)

उत्तराखंडच्या वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वतांवर अशा अनेक विचित्र वनस्पती आहेत, ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. यामध्ये ऍट्रिक्युलेरिया फेर्सेलाटा शोधणे देखील अवघड काम होते. (carnivorous plant)

पूर्व पश्चिमी हिमालयात पहिल्यांदाच पाहिली गेली अशी वनस्पती

या मांसाहारी वनस्पतीला स्थानिक आणि सामान्य भाषेत ब्लॅडरवॉर्ट म्हणतात, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ही वनस्पती केवळ उत्तराखंडमध्येच नाही तर संपूर्ण पश्चिम हिमालयीन प्रदेशात प्रथमच दिसली आहे. (carnivorous plant)

हे देखील वाचा: शास्त्रज्ञांनी लावला शोध, पसरणाऱ्या रोगांवर डासच करणार उपचार!

हे आहे ‘ब्लॅडरवॉर्ट्स’ वनस्पतींचे खाद्य

साधारणपणे, काही झाडांना जगण्यासाठी पाणी, ऊन, हवा आवश्यक असते. परंतु ब्लॅडरवॉर्ट्सचे खाद्य त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. या वनस्पती जगण्यासाठी इतर जीव खातात. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही वनस्पती डास आणि इतर अनेक प्रकारचे छोटे कीटक खातात. त्याची भौतिक रचना इतर वनस्पतींपेक्षा वेगळी आहे. हे प्रोटोझोआ, कीटक, अळ्या, डास आणि नवीन टॅडपोल म्हणजेच छोटी बेडकं खातात. (carnivorous plant)

कुठे आढळते ही वनस्पती

साधारणपणे या वनस्पती अशा ठिकाणी वाढतात, जेथे मातीची खत क्षमता कमी असते. म्हणूनच त्या कीटक खातात. (carnivorous plant)

या वनस्पतीचा सर्वात मोठा फायदा

या वनस्पतीचे औषधी फायदे खूप आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मांसाहारी वनस्पतींची मागणी सातत्याने वाढत आहे. खरं तर, ही वनस्पती व्हॅक्यूम तयार करून नकारात्मक दाब निर्माण करते. अशा स्थितीत, तिच्या जवळपासचे आणि त्यावर बसलेले कीटक तिच्या आत अडकतात. (carnivorous plant)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.