फिरण्याचा किंवा ट्रिपचा प्लॅन करण्याची गोष्ट येते तेव्हा बहुतांश लोकांच्या मनात खर्चाचा प्रश्न उभा राहतो. भारतात आज ही बहुतांश लोकांना परदेशातील ट्रिप करायची आहे. मात्र त्यासाठी होणारा खर्च पाहता न गेलेलेच बरे असे म्हणून जाणे काही वेळेस टाळले जाते. परंतु काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर तुमची परदेशातील ट्रिप ही मूळ खर्चापेक्षा कमी किंमतीत ही होऊ शकते. तर जाणून घेऊयात याच बद्दल अधिक. (Foreign Trip Tips)
-पर्यटन ठिकाणाची निवड
तुम्हाला असे परदेशातील पर्यटन स्थळ निवडावे लागेल जेथे भारतीय रुपया हा तेथील चलनापेक्षा महाग आहे. या व्यतिरिक्त परदेशात तुम्हाला नक्की कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे याची एक लिस्ट ही तयार करुन ठेवा. यावर थोडा रिसर्च केल्यास उत्तमच होईल. यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर अंदाजे किती खर्च होऊ शकतो हे कळू शकते.
-ट्रॅव्हल ब्लॉगर्स ठरतील मदतगार
सोशल मीडियाचा वापर सध्या ऐवढा वाढला आहे की, याच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीबद्दल सहज माहिती मिळते. अशातच तुम्ही परदेशात जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही ट्रॅव्हल ब्लॉगर्सचे व्हिडिओ किंवा त्यांनी दिलेली माहिती पाहून तुमच्या फिरण्याचा प्लॅन ठरवू शकता. कारण ते त्या ठिकाणी जाऊन आल्याने तुम्हाला अधिक स्पष्टता येईल की,नक्की तेथे काय मिळते, राहण्याची व्यवस्था कशी आहे किंवा फूड काय मिळते अशा काही गोष्टी नक्कीच तुम्हाला कळण्यास मदत होईल.
-ऑफ सीजनमध्ये जा
जर तुम्ही भारतीय पर्यटनाच्या ठिकाणी किंवा परदेशात जाण्याचा प्लॅन करत असाल तर नेहमीच लक्षात ठेवा ऑफ सीजनमध्ये प्रवास करावा. हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये सीजन असतो. त्यामुळे जर तुमचे बजेट अधिक असेल तर तुम्ही तेथे जाण्याचा प्लॅन करु शकता अन्यथा ऑफ सीजनच तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याचसोबत विमानाचे तिकिट बुकिंगसाठी काही वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला सवलतीच्या दरात तुम्हाला तिकिट बुकिंग करण्याची सुविधा देतात.(Foreign Trip Tips)
-लोकल फूड खा
बहुतांश लोक परदेशातील ट्रिप दरम्यान हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाण्याची चूक करतात. त्यामुळे जर तुम्हाला ट्रिपचा खर्च कमी करायचा असेल तर स्मार्ट विचार करावा लागले. ज्या ठिकाणी फिरायला जात आहात तेथील ठिकाण अधिक फिरा, तेथील लोकल फूडचा स्वाद घ्या. जेणेकरुन तुमचा खर्च कमी होऊ शकतो.
हे देखील वाचा- जगातील ‘या’ देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय
-वॉलिंटयर व्हा
जर तुम्ही परदेशात फिरण्यासह कामासाठी काही दिवस जात असाल तर तुम्ही एक गोष्ट जरुर करु शकता ती म्हणजे एका आठवड्यासाठी वॉलिंटयर होऊ शकता. या पद्धतीने तुमचा खर्च कमी होण्यास ही मदत होईल.