Foot care in winter : थंडी सुरू झाल्यानंतर सर्दी-खोकल्यासारख्या काही समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कोरड्या त्वचेसह पायांना भेगा पडण्यास सुरुवात होते. पण ही समस्या अधिक वाढली जाते. यामुळे पायांच्या टाचा दुखणे किंवा त्यामधून रक्त येण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. थंडीत पायांना भेगा पडण्यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, थंडीत त्वचा कोरडी होणे, गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होणे. पण त्वचेला पुरेशा प्रमाणात ओलसरपणा मिळत नाही त्यावेळी त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. अशातच पायांच्या टाचांना भेगा पडण्यास सुरुवात होते. यापासून दूर राहण्यासाठी कोणते उपाय करू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
मॉइश्चराइजिंग
पायांच्या भेगांची समस्या दूर राहण्यासाठी पायांच्या टाचांना मॉइश्चराइज लावा. यामुळे पायाची त्वचा मऊ राहण्यास मदत होईल. याशिवाय नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापरही करू शकता.
पाय स्वच्छ ठेवा
पायांना धूळ-माती लागली जाते. यामुळेही पायांना भेगा पडण्यास सुरुवात होऊ शकते. अशातच पाय स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पायांना स्क्रबिंग करू शकता. यामुळे डेड स्किन सेल्स हटण्यास मदत होईल. यामुळे पायांना भेगा पडण्याच्या समस्येपासून दूर रहाल. (Foot care in winter)
या गोष्टींची योग्य निवड
पायांना भेगा पडू नयेत म्हणून योग्य आकाराचे शूज किंवा चप्पल घालणे फार महत्वाचे आहे. पायाला चप्पल व्यवस्थितीत बसल्या नाहीत तर टाचांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे थंडीत आरामदायी शूजचा वापर करा. पायांची त्वचा कोरडी होण्यापासून दूर राहण्यासाठी केमिकलयुक्त साबणापासून दूर राहा. यासाठी शॉवर जेलचा वापर करू शकता.