Foods to avoid with lemon tea : लेमन टी मुळे आरोग्याला फायदे होतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होणे ते शरिराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहितेय का, काही पदार्थांसोबत लेमन टी चे सेवि करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. खरंतर, काही पदार्थांसोबत लेमन टी चे सेवन केल्याने आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे प्रकृती बिघडली जाऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
डेयरी प्रोडक्ट्स
लेमन टी सोबत डेयरी प्रोडक्ट्सचे सेवन करू नये. जसे की, दही, दूध किंवा पनीर पासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. खरंतर, लिंबामधील आम्ल दूधातील प्रोटीनच्या विरोधात काम करतात. यामुळे पोटात गॅस होणे आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
रताळ
लेमन टी चे रताळ्यासोबत सेवन करणे टालावे. रताळ्यामध्ये कार्बोहाइड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. पण लिंबामधील आम्लामुळे रताळ्याचे पचन होण्यास अडथळा आणू शकतात.
मांसाहार करणे टाळा
लेमन टी सोबत मांसाहार करणे टाळा. नॉन-व्हेज पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन आणि वसा असते. तर लिंबामध्ये आम्ल असते. याच्या मिश्रणाने पचनक्रियेवर परिणाम होतो. अशातच गॅस, सूज येणे आणि पोट जड झाल्याची समस्या उद्भवली जाते.
मसालेदार भोजन
मलासेदार भोजन जसे की, समोसा, तिखट भाज्या यांचे लेमन टी सोबत सेवन करणे टाळा. यामुळे पोटात जळजळ होणे आणि अपचन अशी समस्या निर्माण होऊ शकते.
फ्रिजमधील पदार्थ
लेमन टी सोबत फ्रिजमधील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे पचक्रिया प्रभावित होते. याशिवाय पचक्रियेची प्रक्रिया मंदावली जाते. अशातच पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते. (Foods to avoid with lemon tea)
गोड पदार्थ
साखर किंवा गोड पदार्थ लेमन टी सोबत खाणे टाळावे. यामुळे शरिरातील रक्ताचा स्तर वेगाने वाढू शकता. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर लेमन टी आणि गोड पदार्थ खाणे टाळा.