Home » ‘या’ वस्तू चुकूनही ठेऊ नका फ्रिजमध्ये

‘या’ वस्तू चुकूनही ठेऊ नका फ्रिजमध्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health Tips
Share

आजच्या काळात फ्रिज ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. प्रत्येक घरात हे फ्रिज असतेच असते. लहान का असेना सगळ्यांच्या घरत फ्रिज असतेच असते. फ्रीजचा वापर अलीकडच्या काळात खूपच जास्त वाढला आहे. फ्रीजचा वापर विशिष्ट वस्तू ठेऊन त्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी केला जातो. अनेकांकडे तर फ्रिजमध्ये हातात येईल ती वस्तू ठेवणारे कपाट बनले आहे.

अनेकांचे फ्रिज जर आपण उघडून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, फ्रिज हे डम्पिंग स्टेशन बनले आहे. त्यात अन्न, भाज्या, दूध ठेवण्यासोबतच इतरही अनेक गोष्टी ठेवल्या जातात. शिजवलेले अन्न आणि खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. फ्रीजमुळे हे पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. फ्रिजमध्ये जवळजवळ सगळेच पदार्थ आपण ठेवतो. पण सगळे पदार्थ ठेवायची गरज नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे घातक ठरू शकते. हे पदार्थ खराब तरी होतात किंवा हे आपलं आरोग्य तरी बिघडवतात.

कॉफी
कॉफी फ्रिजमध्ये ठेऊ नका. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने दुसऱ्या गोष्टींनाही त्याचा वास येतो आणि कॉफी लवकर खराब होते.

मध
मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

Health Tips

लोणचे
लोणच्यात व्हिनेगर असते. हे फ्रिजमध्ये ठेवल्याने लोणच्यासोबत इतर साहित्यही खराब होते. त्याचा वास फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंमध्ये जातो. आणि विशेषतः दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू चुकूनही लोणच्यासोबत ठेवू नयेत.

केळे
केळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते काळे पडते. यातून इथाइलीन नावाचा गॅस बाहेर पडतो. त्यामुळे केळ्यासोबत दुसरी फळेही खराब होतात.

टोमॅटो
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर नरम पडतात आणि त्याची चवही बिघडते. टोमॅटोला अनेकदा बुरशी देखील लागते.

बटाटे
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे रुपांतर शुगरमध्ये होते. यामुळे बटाट्याचा स्वादही बिघडतो. कधी कधी बटाट्याना कोंब येऊन त्याची चव जाते. अशाने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता असते.

आंबट फळे
संत्र, लिंबू, यांसारखी आंबट फळे फ्रिजमध्ये ठेऊ नका. हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने फळांच्या साली काळ्या पडतात आणि त्यातील रसही सुकू लागतो. लिंबूला बुरशी लागून तो मऊ पडतो.

कलिंगड
न कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊ नका. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

कांदा
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने नरम होतो आणि कालांतराने खराब होऊ लागतो.

लसूण
लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याला अंकूर फुटू लागतात. तो नरम पडून खराब होऊ लागतो. कधी कधी लसूणला फ्रिजमधील ओलाव्यामुळे बुरशी देखील येते.

======

हे देखील वाचा : बैल पोळा सणाची माहिती आणि महत्व

======

ब्रेड
ब्रेड किंवा त्यापासून बनलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेऊ नये. कारण ब्रेडमध्ये असलेले यीस्ट थंड वातावरणात खराब होऊ लागते. ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे तो ताजा तर नाहीच पण खाण्या योग्यसुद्धा राहात नाही.

शिमला मिरची
तुम्ही शिमला मिरची फ्रीज मध्ये ठेवत असाल तर ही सवय लगेच बंद करा. कारण, कमी तापमानात शिमला मिरचीची स्कीन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा निघून जातो. ज्यामुळे शिमला मिरचीची चव पूर्णपणे नष्ट होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.