प्रत्येकाच्याच घरी सध्या गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे आवडता सण. सर्व सांभाळून घरातील सर्वच व्यक्ती आपल्या आवडत्या सणाची तयारी करत आहे. बाप्पासाठी उत्तम डेकोरेशन करण्यासाठी सगळेच झगडत आहे. आपले डेकोरेशन एकदम वेगळे, आकर्षक असावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत डेकोरेशनची तयारी, फराळाची तयारी, घराची स्वछता होत आहे. मात्र या सर्वांमध्ये आपल्याला नीट आणि पुरेसा आराम न मिळाल्याने अनेकदा त्रास होतो. ऐन सणाच्या काळात आपल्याला होणारा त्रास नकोसा वाटतो. (Marathi)
आता सण म्हटल्यावर एक्झरशन तर होणार, रात्री जागरणं देखील होणार आणि घरात कामं सुद्धा जास्तीचे असणार यात वाद नाही. मात्र यातही आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आपण सतत कामं करत राहिलो तर शरीर थकणार आणि मग आपण आजारीच पडणार. जर तुम्हाला देखील या उत्सवाच्या दिवसांमध्ये आजारपण टाळायचे असेल तर काही गोष्टींची आजपासूनच काळजी घेण्यास सुरुवात करा. यासाठी अतिशय सोप्या टिप्स आहेत, त्या जाणून घ्या.(Marathi News)
हायड्रेटेड राहणे
सणासुदीचा काळ आपल्याला खूपच बिझी ठेवतो. अशावेळेस आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. डिहायड्रेशन आणि आळस टाळण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि दर तासाला पाणी प्या. (Todays Marathi News)
सक्रिय राहा
नियमित शारीरिक हालचाली ऊर्जेची पातळी वाढवू शकतात आणि तणाव कमी करू शकतात. सणांमध्येही, व्यायामासाठी वेळ काढा. अजिबातच वेळ नसेल तर घरच्याघरी सोपे व्यायाम प्रकार करा नाहीतर सरळ थोडा वेळ चालायला जा. अगदी डान्स केला तरी चालेल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. ते पचनास मदत करते. हे पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. सकाळी आणि संध्याकाळी योगा करा. फिरायला जा. ज्यामुळे तणाव दूर होतो आणि चयापचय देखील नियंत्रणात राहते. (Top marathi News)
खाण्याच्या सवयी
सणासुदीच्या काळात संतुलित आहार घ्या. संयम बाळगा आणि फळे, भाज्या, लीन प्रोटीन, भरड धान्याने समृध्द पौष्टिक जेवण करा. साखरेचे पदार्थ किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन टाळा ज्यामुळे एनर्जी क्रॅश होऊ शकते. आपल्या आहारात ताजी फळे आणि पालेभाज्यांचे सेवन वाढवा. ते फायबरने समृद्ध असतात. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न खा. यामुळे सूज येणे आणि अपचनाची समस्या दूर राहते. पपई, अननस आणि सफरचंद या फळांमध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असतात. बेरी भरपूर प्रमाणात पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवतात. (Top Trending News)
ब्रेक घ्या
सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा मेळाव्यात, विश्रांतीसाठी आणि स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी लहान-लहान ब्रेक घ्या. घाई-गडबडीपासून दूर राहिल्याने बर्नआउट टाळता येते आणि ऊर्जेची पातळी राखता येते. (Latest Marathi News)
==========
Health : एक महिना गहू बंद केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ फरक
Healh : जिभेच्या रंगांवरून समजतो शरीरातील आजार
==========
पुरेशी झोप
शरीराला डिटॉक्स करण्याइतकेच मनाचे डिटॉक्सिफाय करणे महत्त्वाचे आहे. रात्रीची चांगली झोप मेंदूतील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात आणि दिवसभराच्या थकव्यातून बरे होण्यास मदत करते. दररोज रात्री पुरेशी किमान ८ तास झोप घ्या. (Top Stories)
शरीराचे ऐका
तुमच्या शरीरातील थकव्याच्या या संकेतांकडे लक्ष द्या. तुम्हाला थकल्यासारखे वाटत असल्यास, तुमच्या विश्रांतीच्या गरजेचा आदर करा. थकवा आल्याने इनफ्लेमेशन होऊ शकते आणि उत्सवाचा आनंद कमी होतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics