विज्ञान जसजसे प्रगती करत आहे, तसतसे माणसाचे जीवन सोपे आणि आरामदायी होत आहे. पक्षी पाहून माणसाच्या मनात हवेत उडण्याची कल्पना आली. त्यावर प्रयोग करताना विमानाचा शोध लावला गेला. अशा रीतीने माणूस हळूहळू आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यात गुंतलेला आहे. येत्या काही दिवसात ही स्वप्नं उडत्या हॉटेलच्या रुपात सत्यात दिसणार आहे. (Flying Hotel)
नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लवकरच एक हॉटेल हवेत उडेल. हे विमानासारखे तयार केले गेले आहे. ते विना लँडिंग अनेक महिने हवेत उडत राहील.
कॉन्सेप्ट व्हिडिओ
हाशेम अल-घैली नावाच्या यूट्यूब चॅनलने एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हॉटेलची नवी संकल्पना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांच जण हैराण झाले आहेत. हा कॉन्सेप्ट व्हिडिओ फक्त एक कल्पना आहे. हे ग्राफिक्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. हे पाहून हवेत उडणारे हॉटेल कसे तयार होईल आणि त्याचे स्वरूप कसे असेल, याचा अंदाज येऊ शकतो. (Flying Hotel)
न्यूक्लीअर रिऍक्टरने चालेल विमान
व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, हे हॉटेल कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे एआय पॉवर्ड स्काय क्रूझ असेल. त्यात न्यूक्लियर फ्यूजनवर चालणारी २० इंजिने असतील. त्याची रचना विमानासारखी असेल. ते जमिनीवर न उतरता अनेक महिने हवेतच उडत राहील. (Flying Hotel)
हे देखील वाचा: मांसाहारी वनस्पती! खाते कीटक, अळ्या अन् छोटी बेडकं
आलिशान सुविधांनी असेल सुसज्ज
या हॉटेलमध्ये पाच हजार प्रवाशांची आसनव्यवस्था असेल. कॉन्सेप्ट व्हिडिओनुसार, हे विमान विविध प्रकारच्या लक्झरी फीचर्सने सुसज्ज असेल. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, त्यात रेस्टॉरंट्स, एक मोठा शॉपिंग मॉल, जिम तसेच थिएटर आणि एक स्विमिंग पूल देखील असेल. (Flying Hotel)
हवेतच केली जाईल दुरुस्ती केली
या विमानाची रचना अशा प्रकारे केली जाईल, की ते कधीही जमिनीवर उतरणार नाही. कॉमन एअरलाइन्स कंपनीची विमाने प्रवाशांना या विमानात आणतील. प्रवाशी हवेत उडत असतानाच या विमानात प्रवेश करतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, विमानाच्या दुरुस्तीचे कामही हवेतच केले जाईल. युट्युबरचा दावा आहे की, ही अणुशक्तीवर चालणारी ‘स्काय क्रूझ’ मानवाचे भविष्य असू शकते. (Flying Hotel)
अपघात झाला तर होईल विध्वंस
सोशल मीडियावरही युजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. लोक म्हणत आहेत की, न्यूक्लीअर रिऍक्टरने चालेल. ते कधी क्रॅश झाले, तर विध्वंस होऊ शकतो. त्याचबरोबर विमानातील प्रवासाच्या खर्चावरही अनेकांनी आपली मते मांडली आहेत. (Flying Hotel)