जापान मधील टेक्नोलॉजी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. बुलेट ट्रेन ते गाड्यांमध्ये त्यांनी जगातील काही देशांना मागे सोडले आहे. दरम्यान, कंप्युटरच्या नव्या तंत्रज्ञानात सुद्धा जापान काही देशांच्या मागे आहे. जापाननमध्ये आज सुद्धा संदेश पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी फॅक्सचा सर्वाधिक वापर केला जात आहे. तर डेटा स्टोरेजसाठी जापान मधील लोकांची पहिली पसंदी काही वर्षांपूर्वी चलनाबाहेर गेलेली फ्लॉपी डिस्क (floppy disk) होती. आता जापानने याच्या विरुद्ध युद्ध छेडले आहे.
ऑनलाईनच्या दिशेने पुढे जातोय जापान
तारो कोनो यांनी इंग्रजीत ट्विट केले, डिजिटल मंत्रालयाचा फ्लॉपी डिस्कच्या विरोदात युद्धाची घोषणा. त्यांनी पुढे असे म्हटले की, डिजिटल एजेंसी नियम-कायदे बदलणार आहे. जेणेकरुन सामान्य लोक प्राशसनिक कामांसाठी अधिकाधिक ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करु शकतील. दरम्यान, जापानला नेहमीच जुन्या तंत्रज्ञानाची आवड आहे. बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, जापानमध्ये २०१५ पर्यंत म्युझिक कॅसेट्सचा खुप संख्येत वापर केला जात होता. २०१९ मध्ये जापानच्या साइबर सिक्युरिटी मंत्र्यांनी सार्वजनिक रुपात स्विकार केला होता की, त्यांनी आपल्या आयुष्यात कंप्युटरचा वापर केलेला नाही.

फ्लॉपी डिस्क म्हणजे काय?
१९७० आणि १९९० दरम्यान फ्लॉपी डिस्कचा (floppy disk) प्रचंड वापर केला जात होता. याच्या माध्यमातून डेटा स्टोरेज केला जायचा. जसे आज आपण पेन ड्राइव्हचा डेटा स्टोरेजसाठी वापर करतो. त्याचप्रमाणे जुन्या काळात फ्लॉपी वापरली जायची. याचा आकार थोडा मोठा होता. फ्लॉपी डिस्क कंप्युटर डेटा आणि प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी काम येणारी एक रिमूव्हेबल स्टोरेज डिस्क म्हटले जायचे. वर्ड डॉक्यूमेंटवर एका बाजूला एनिमेटेड ऑप्शनमध्ये फ्लॉपी डिस्क सेव्ह करण्याचे ऑप्शन दाखवते. फ्लॉपी डिस्क सर्वाधिक प्रथम आईबीएमने विकसित केली होती. ज्यामध्ये ८०० केबी डेटा सेव्ह होऊ शकत होता. ८०० केजी आजच्या जगात जीबीच्या तुलनेत ०.००००८ टक्के होते.
हे देखील वाचा- Instagram ला ३२ अरब रुपयांचा दंड, मुलांच्या खासगी डेटासह छेडछाड केल्याचा आरोप
सुरक्षा आणि इंजिनियर्सच्या कमतरतेचे आहे कारण?
जापान आतापर्यंत हे जुने तंत्रज्ञान वापरण्यामागे काही कारणं आहेत. खरंतर जापानमध्ये फ्लॉपी सारखी आउटडेटिड तंत्रज्ञान हटवला जाते आणि नवे तंत्रज्ञान लागू केले जाते. तेव्हा दररोजच्या कामांसाठी बहुतांश सॉफ्टवेअर बनवण्याची गरज असते. सध्या जापानच्या जवळ ५ लाख सॉफ्टवेअर इंजिनियअर्सची कमतरतेला सामोरे जावे लागत आहे. ऐवढेच नव्हे तर खासगी आणि शासकीय डेटा संदर्भात जापानचे अधिकारी बहुत संवेदनशील आहे. जापानी सरकारच्या अधिकारांचे मानणे आहे की, फ्लॉपी मध्ये डेटा आज ही आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा अधिक सुरक्षित राहते. त्यासाठी ते शासकीय कामकाजासाठी ईमेलचा सुद्धा वापर करत नाही. गुप्त शासकीय कागदपत्र फ्लॉपी डिस्कवर सेव्ह केले जातात.