ऑफिस, क्लब, पार्टीज, बार, रेस्टॉरंट आणि अन्य काही ठिकाणी असलेली लोक तेथील वातावरणात मजा करतात. यादरम्यान काही पुरुष महिलांसोबत आणि काही महिला पुरुषांसोबत फ्लर्टिंग करतात. जर असे करताना समोरच्या व्यक्तीच्या भावना न दुखावता करत असाल तर त्यात काही चुकीचे नाही. काही शोध असे सांगतात की, फ्लर्टिंग मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. संशोधकांच्या मते फ्लर्टिंग करणे बेस्ट आहे. (Flirting best for health)
फ्लर्टिंग केवळ मनोरंजनच्या व्याख्येत तुम्ही बसवू शकता. तुम्ही टेक्स मेजेसवर काही विशिष्ठ इमोजी पाठवून फ्लर्ट करू शकता. अथावा व्यक्तिगत रुपात जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा बार मध्ये जाता तेव्हा सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तुम्ही त्याच्याशी फ्लर्ट करण्यास सुरुवात करता.परंतु खरंच फ्लर्टिंग केल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो? याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात.
कधीकधी आपण आयुष्यात नकारात्मक व्यक्तींना भेटतो. जे आपल्या कामाला किंवा खासगी आयुष्यात नेहमीच पाण्यात पाहत असतात. त्याचसोबत दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने असुरक्षित ही वाटते आणि यामुळे आत्मविश्वास कमी होतो. परंतु तुम्ही एखाद्यासोबत फ्लर्टिंग करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढला जातो.
ऑर्गेनाइजेशन बिहेवियर अॅन्ड ह्युमन डिसीजन प्रोसेसेज मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले की, लोक आपल्या कर्मचाऱ्यांसोबक काम करताना अचानक थट्टा-मस्करी करतात. यामुळे तेथील वातावरण बदलले जाते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसते. अशातच जेव्हा तुम्ही एखाद्याशी फ्लर्टिंग करत असाल तर त्याच्यासोबत थट्टा-मस्करी करू शकता. यामुळे तुमच्यातील तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.संशोधक असे म्हणतात की, फ्लर्टिंग लैंगिक शोषणापेक्षा फार वेगळे आहे.
त्याचसोबत एखाद्यासोबत उत्तम नातेसंबंध ठेवणे फार नॉर्मन गोष्ट आहे. परंतु जेव्हा फ्लर्टिंगचा मुद्दा असेल तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न अधिक करता. जेणेकरुन त्या व्यक्तीला आनंद होईलच पण तुमचे नातेसंबंध सुद्धा सुधारू शकतील. संशोधक असे म्हणतात उत्तम संवादाचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी एक उत्तम श्रोता असणे फार गरजेचे आहे. फ्लर्टिंग दरम्यान तुम्ही एकमेकांशी बोलणे सुरु करता. परंतु तो व्यक्ती नक्की काय बोलतोय हे सुद्धा ऐकून घेणे फार महत्त्वाचे असते. (Flirting best for health)
हेही वाचा- पार्टनर जर वारंवार ‘या’ चुका करत असेल तर दुर्लक्ष करू नका
फ्लर्टिंग हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असले तरीही काही लोक फार लाजाळू असतात. त्यांना ते जमत नाही आणि ते त्यापासून पळ काढतात. मात्र जेव्हा तुम्ही फ्लर्ट करण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही अधिक आत्मविश्वासू आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वाच्या रुपात समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत असता.