Flight Ticket Booking- प्रवास करण्यामागील मुख्य उद्देश असा असतो की, काही नव्या गोष्टींचा अनुभव घेणे किंवा नव्या ठिकाणी फिरणे. काही वेळा आपण नव्या अनुभवांचा सामना करतो आणि त्याचवेळी काही चुका सुद्धा होतात. मात्र प्रत्येक वेळी ट्रॅव्हलिंगसंबधित चुक पुन्हा करणे म्हणजे वेळ फुकट घालवणेच पण त्याचसोबत पैसे ही उगाचच खर्च होतात. अशातच तुम्ही एखाद्या ठिकाणी विमानाच्या माध्यमातून प्रवास करणार असाल तर प्रथम तुम्ही त्याचे तिकिट बुक करता. यावेळी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. बहुतांशवेळा असे दिसून आले आहे की, लोक विमानाचे तिकिट बुक करतात पण त्यामध्ये झालेली एक लहानशी चुक सुद्धा तुमचा फिरण्याचा आनंद घालवते. त्यामुळे थोड्या स्मार्ट पद्धतीने तिकिट बुकिंग करण्याचा फायदा नक्कीच होतो. तर जाणून घेऊयात विमानाची तिकिट बुकिंग करताना लोक कोणत्या चुका वारंवार करतात त्याबद्दल अधिक.
-हॉलिडे सीजनसाठी उशिराने तिकिट बुकिंग
जर तुम्ही हॉलिडे किंवा सणासुदीच्या काळात विमानाच्या माध्यमातून आपल्या घरी येऊ इच्छिता किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला उशिराने तिकिट बुकिंग करणे टाळले पाहिजे. या चुकीमुळे तुम्हाला फ्लाइटचे तिकिट मिळत नाही. अशातच तुमचा ट्रॅव्हल करण्याचा मूड ही बिघडतो.

-नॉन-हॉलिडेसाठी लवकरात लवकर बुकिंग
काही वेळा लोक नॉन-हॉलिडेच्या सीजनमध्ये ट्रॅव्हलिंग करतात. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तिकिट बुकिंग करतात. ही सुद्धा चुक तुम्हाला काही वेळा तुमचे पैसे फुकट घालवू शकते. म्हणजेच जसा-जसा तुमचा ट्रॅव्हलिंग करण्याचा दिवस जवळ येतो आणि त्याच वेळी जर विमान कंपनीकडून तिकिट दरात कपात केल्यास तुम्हालाच त्याचा फटका बसतो. नॉन-हॉलिडे सीजनमध्ये तुम्ही तिकिट बुकिंग करण्यासाठी घाई केली नाही पाहिजे. (Flight Ticket Booking)
हे देखील वाचा- फिरण्याची आवड असेल तर भारतातील ‘या ठिकाणी तुम्हाला फुकटात राहता येईल
-ट्रॅव्हल पॅकेज खरेदी न करणे
ट्रॅव्हल पॅकेजचे काही फायदे असतात. बहुतांश प्रवासी तर ही एक समस्या असल्याचे मानतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा काहीच माहिती नसल्याने ते ट्रॅव्हलचे पॅकेज बुक करत नाहीत. ट्रॅव्हल पॅकेजमध्ये तुम्हाला राहण्याची जागा, हॉटेल ट्रांन्सपोर्टेशन आणि डेस्टिनेशन टूर्स सारख्या सुविधा मिळतात. जर तुम्ही एखाद्या कारणास्तव टूर रद्द करता तर प्रोवाडर तुम्हाला ती पुन्हा अरेंज करण्याची सुविधा सुद्धा देतो.
तर विमानाच्या तिकिटांचे प्री-बुकिंग करण्याचे सुद्धा काही फायदे आहेत. जसे की, तुम्ही प्रवासाच्या ४५ दिवस आधी तिकिट बुक करत असाल तर तुम्हाला स्वस्तात तिकिट मिळते. एका सर्वेत असे ही म्हटले गेले आहे की, जर फ्लाइटची तिकिट दुपारच्या वेळेत बुकिंग केल्यास त्याचे दर थोडे कमी असतात.