Home » केवळ ३ लोकांच्या लोकसंख्येने बनलाय ‘हा’ देश

केवळ ३ लोकांच्या लोकसंख्येने बनलाय ‘हा’ देश

0 comment
Share

जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची लोकसंख्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे, असे काही देश आहेत ज्यांना कुठूनही मान्यता मिळालेली नाही. खरं तर, जगात एकूण १९५ देश आहेत. त्यापैकी १९३ देश संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत, तर दोन देश निरीक्षक आहेत. परंतु या व्यतिरिक्त, असे काही देश आहेत जे स्वतः एक वेगळे राष्ट्र असल्याचा दावा करतात. परंतु त्यांना ना संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे, ना इतर कोणत्याही देशाची मान्यता मिळाली आहे. अशा स्वयंघोषित राष्ट्रांना मायक्रोनेशन म्हणतात. आज जगातील अशाच पाच मायक्रोनेशन्सबद्दल जाणून घेऊया. (Unique Micronations of Worlds)

स्वतःच्या सीमा, स्वतःच्या बँका, स्वतःचे कायदे

जगातील या मायक्रोनेशन देशांच्या त्यांच्या सीमा आहेत, त्यांची स्वतःची बँकिंग आहे, त्यांचे स्वतःचे चलनही आहे. तसेच या देशांकडे त्यांचे स्वतःचे सैनिक देखील आहेत. परंतु त्यांना संयुक्त राष्ट्र किंवा शेजारील देशांनी देश मानलेले नाही. (Unique Micronations of Worlds)

जगात ६५ हून अधिक आहे ‘मायक्रोनेशन’

मायक्रोनेशनच्या नकाशानुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत अशा देशांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. यातील काही देशांची सीमा केवळ काही एकरांपर्यंतच मर्यादित आहे. (Unique Micronations of Worlds)

१. रिपब्लिक ऑफ मोलोसिया

या देशाची लोकसंख्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या मायक्रोनेशनमध्ये एकूण ३४ जीव राहतात. यामध्ये ३० मानव आणि ४ कुत्र्यांचा समावेश आहे. या देशाचे क्षेत्रफळ एकूण २.२८ एकरात पसरलेले आहे. (Unique Micronations of Worlds)

कुत्र्यांनाही आहे नागरिकत्व

हे मायक्रोनेशन अमेरिकेतील नेवाडाजवळ आहे. या देशाचा हुकूमशहा म्हणजे केविन बॉघ. या देशाचे एक वेगळे चलन देखील आहे, ज्याचे नाव valora आहे. ही सिस्टम चालवण्यासाठी बँक ऑफ मोलोसिया, चिप नाणी आणि छापील नोटा देखील आहेत. कुत्र्यांनाही देशात नागरिकत्व मिळते. रिपब्लिक ऑफ मोलोसियाने आपले राष्ट्रगीत दोनदा बदलले आहे. तसेच, याचा ध्वज निळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या तिरंगा डिझाइनमध्ये आहे. (Unique Micronations of Worlds)

२. सीलँड

इंग्लंडच्या किनाऱ्याला लागून असलेले उत्तर समुद्रातील सीलँड देखील एक मायक्रोनेशन आहे. हा देश दोन महाकाय स्तंभांवर उभा आहे. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात असल्याने ब्रिटिश नौदलाने १९६६ मध्ये ही जागा रिकामी केली. नंतर एक माजी सैनिक आणि एक समुद्री डाकू येथे स्थायिक झाले आणि त्यांनी हा त्यांचा स्वतंत्र देश घोषित केला. येथे २७ लोक राहायचे. परंतु १९७० च्या आसपास या देशाची लोकसंख्या ७० पर्यंत पोहोचली होती. या देशाचा आकार फक्त दोन टेनिस कोर्ट एवढा असेल. (Unique Micronations of Worlds)

३. लिबरलँड

लिबरलँड हे क्रोएशिया आणि सर्बिया दरम्यान डॅन्यूब नदीच्या काठावर स्थित आहे. या देशाचा नेता विट जेडलिका आहे, ज्याने १३ एप्रिल २०१५ रोजी हा स्वतंत्र देश घोषित केला. (Unique Micronations of Worlds)

येथील लोकसंख्या आता सुमारे अडीच लाखापर्यंत पोहचली आहे. येथील लोकांना वेगवेगळे कर, मालमत्ता कायदे आणि नागरी हक्क लागू होतात. (Unique Micronations of Worlds)

हे देखील वाचा: पायलट व्हायचं आहे अशी करा तयारी

४. प्रिंसिपलिटी ऑफ पॉन्टिन्हा 

एक वेगळा देश असल्याचा दावा करणाऱ्या या मायक्रोनेशनची लोकसंख्या फक्त तीन आहे. एका शाळेच्या शिक्षकाने हा भाग पोर्तुगालमधील समुद्र किनार्‍याजवळ असलेल्या एका रिकाम्या खडकावर वसवला आणि त्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. (Unique Micronations of Worlds)

याच्या मालकाने स्वतःला प्रिन्स घोषित केले आणि पोर्तुगालवर त्याच्या देशाला धमकी दिल्याचा आरोपही केला. (Unique Micronations of Worlds)

५. रिपब्लिका ग्लेशियर

ग्रीनपीसच्या कार्यकर्त्यांनी २०१४ मध्ये चिली आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये रिकामे असलेले क्षेत्र पाहिल्यानंतर, त्याला स्वतंत्र देश घोषित केले. येथील लोकसंख्या सध्या एक लाख आहे. या देशाकडे स्वतःचा पासपोर्टही आहे. (Unique Micronations of Worlds)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.