हे जग अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. तुम्ही पाहिलंच असेल की, पावसाळ्यात आकाशात सात रंगांचे इंद्रधनुष्य मनमोहक दिसते. हे अनोखे दृश्य पाहून प्रत्येकाचे मन मोहून जाते. तुम्ही अनेक प्रकारच्या नद्या पाहिल्या असतील. या सर्व नद्यांमध्ये जवळपास सारखेच पाणी आहे. मात्र आज आम्ही जगातील एका रहस्यमयी नदीबद्दल बोलत आहोत. (Rainbow River)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या नदीत ५ रंगांचे पाणी वाहते. पहिल्यांदा पाहिल्यावर ते एखाद्या फोटोशॉप केलेल्या फोटोसारखे दिसते. मात्र ही खरोखरच एक नदी आहे. हे पृथ्वीवर नदीच्या रूपात वाहणारे इंद्रधनुष्य आहे. यामध्ये तुम्हाला ७ ऐवजी ५ रंग पाहायला मिळतात. (Rainbow River)
नदी पाहण्यासाठी जगभरातून येतात लोक
जगातील ही सुंदर नदी दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया या देशात वाहते. सर्वांना चकित करणाऱ्या या सुंदर नदीचे नाव आहे कॅनो क्रिस्टल्स (Cano Crystales). ही रहस्यमय कॅनो क्रिस्टल्स नदी पाहण्यासाठी जगभरातून लोक कोलंबियाला भेट देतात. नदीच्या सौंदर्यामुळे याला दैवीय उद्यान असेही म्हणतात. (Rainbow River)
नदीत वाहते ५ रंगांचे पाणी!
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या नदीत पाच वेगवेगळ्या रंगाचे पाणी वाहते. या नदीच्या पाण्याचा रंग पिवळा, हिरवा, लाल, काळा आणि निळा आहे. पचरंगी पाण्यामुळे या नदीला ‘रिव्हर ऑफ फाईव्ह कलर्स’ असेही म्हणतात. तसेच, बरेचसे लोक या इंद्रधनुष्या सारख्या पाण्याला ‘लिक्विड रेनबो’ म्हणतात. (Rainbow River)
हे देखील वाचा: ऐकावं ते नवलच! ‘येथे’ नातेवाईकांच्या मृत्यूनंतर कापले जाते महिलेचे बोट
नदी पंचरंगी होण्यामागे आहे मनोरंजक कारण
कॅनो क्रिस्टल्स नदीच्या पाण्याचा रंग बदलण्यामागे एक मनोरंजक कारण आहे. खरं तर, जादू या नदीच्या पाण्यात नाही, तर त्यात वाढणाऱ्या विशेष वनस्पती मॅकरोनिया क्लॅव्हिग्रामध्ये आहे. या वनस्पतीमुळे पूर्ण नदीच वेगवेगळ्या रंगांनी भरलेली दिसते. पाण्याच्या तळाशी असलेल्या वनस्पतींवर सूर्यप्रकाश पडल्यास, ते पाणी लाल दिसते. त्याच वेळी, मंद आणि वेगवान प्रकाशानुसार, या वनस्पतीची वेगवेगळी छटा या पाण्याच्या रंगावर दिसून येते. त्यामुळे जणू काय पाण्याचाच रंग बदलतोय की काय, असे भासते! (Rainbow River)