पृथ्वीवर अशी बरीच ठिकाणं आहेत ज्यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती नसते (Unknown Places in the world). पण काही ठिकाणं मात्र अनोळखी असली तरी सुंदर असतात. अनेकांना फिरण्याची नवनवीन ठिकाणांना भेट देण्याची आवड असते. असे हे पर्यटक सतत नवनवीन ठिकाणाच्या शोधात असतात. रोजच्या धावपळीच्या वातावरणाला कंटाळून अनेकजण शांत आणि निर्जन लोकवस्ती असलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे पसंत करतात. तुम्हीही अशाच माणसांपैकी असाल तर, हा लेख नक्की तुम्हाला नक्की आवडेल. कारण या लेखातून अशाच जगातील काही अद्भुत निर्जन असलेली ,पण निसर्गाच्या सानिध्यातील नयनरम्य ठिकाणांची माहिती जाणूनघेणार आहोत (Unknown Places in the world).
१. पामर्स्टन बेट-
पॅसिफिक महासागरातील वायव्येस ५०० किलोमीटरवर पामर्स्टन बेट आहे. १६ जून १७७४ रोजी जेम्स कुकने ही जागा शोधली व त्याने तिथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणची अवघी ५७ लोकसंख्या असून येथील पॉलिनेशियन हे एकमेकांना नातेवाईक आहेत. या भागाच्या आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे मॉल्स किंवा शोरूम नाही. या ठिकाणी इंटरनेट आणि वीज पुरवठा केला जातो. अत्यावश्यक सेवेकरिता एक पोलीस, एक रुग्णालय, एक चर्च आणि दोन टॉयलेटस् या सुविधा असून ही निर्जन लोकवस्तीचे ठिकाण आहे.
२. व्हिला लास एस्ट्रेलास, अंटार्क्टिक –
अंटार्क्टिक महासागरातील हे बेट बर्फाच्छादित असून २०० पेक्षा कमी लोकवस्ती असलेले गाव आहे. या ठिकाणी एक हॉस्पिटल, वाचनालय, पोस्ट ऑफिस आहे. अत्यावश्यक सेवेकरिता येथील लोकांना उपचारासाठी दक्षिण अमेरिकेत जावे लागते.
३. सुपाई, ऍरिझोना-
अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील सुपाई गावात राहणाऱ्या लोकांची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या फक्त २१८ इतकी आहे. या गावातील लोक जगापासून अलिप्त राहत असले, तरीही याचा त्यांच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. येथील लोक प्रामुख्याने शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच हे लोक शिकार करण्यात पारंगत आहेत. या गावी जायला हेलिकॉप्टर शिवाय पर्याय नसून निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे.
४. पिटकेर्न द्वीपसमूह –
पेरू आणि न्यूझीलंड देशाच्या दरम्यान पिटकेर्न द्वीपसमूह बेट आहे. ५० लोकवस्ती असलेले हे बेट जगातील सर्वात कमी लोकसंख्येचे ठिकाण मानले जाते. येथील लोक आदिवासी भागातील असून शेती आणि मध विकणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.
५. सेंट हेलेना:-
दक्षिण-पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून १,९५० किलोमीटरवर दक्षिण अटलांटिक महासागरात वेढलेले आहे. दुर्गम ज्वालामुखीय आणि उष्णकटिबंधीय बेट म्हणून भागाला ओळखले जाते. इंग्रजांनी नेपोलियनला जेरबंद करून या ठिकाणी आणले होते. नेपोलियनने आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस या बेटावर काढले होते. येथे इंटरनेट सेवा आणि वीज पुरवठा होत असून हे जगातील दुर्गम ठिकाणांपैकी एक आहे.
=====
क फॅक्टस ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा – क फॅक्टस इंस्टाग्राम
=====