कोणतेही काम करण्यासाठी वयाला बंधन नसते ते खरंय. कारण भारतातील काही महिला गिर्यारोहकांनी वयाच्या पंन्नाशीत ही फिटनेसच्या जोरावर यशस्वी ट्रेक पूर्ण केलाय. खरंतर केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकुर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये फिट@50+ महिला ट्रांन्स हिमालयन अभियान २०२२ च्या टीमला सन्मानित केले होते. दिग्गज भारतीय गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वाखाली अभियानाला मार्च महिन्यात खेळ विभाग, तरुण प्रकरणे आणि खेळ मंत्रालयाचे सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्याद्वारे नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिरवा कंदील दाखवला होता.(Fit India)
हे अभियान पंगसाऊ दर्रे (इंडो म्यांमार सीमा), अरुणाचल प्रदेशापासून द्रास सेक्टर, लद्दाख मधील कारगिल पर्यंत चालले. ज्यामध्ये ४८४१ किमीपेक्षा अधिक अंतर कापले गेले होते. या दरम्यान, भारत आणि नेपाळ मध्ये हिमालयातील पूर्व ते पश्चिम पर्यंत १४० दिवसांमध्ये ३५ उंच पर्वत पार केली.
एकूण १७ गिर्यारोहकांची टीम द्वारे करण्यात आलेल्या अभियानाचा उल्लेख करत अनुराग सिंह ठाकुर यांनी असे म्हटले होते की, वयाच्या पंन्नाशीत सुद्धा फिट असणे ही एक मोठी गोष्ट आहे. हे अभियान केवळ देशातील वयाच्या पंन्नाशीच्या लोकांसाठीच नव्हे तर भारतातील सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. तुम्ही सर्वांनी जे केले ते प्रत्येक प्रकारे उल्लेखनीय आहे. प्रत्येक स्री ची शक्ती ही खरी शक्ती आहे.(Fit India)
त्यांनी असा सुद्धा सल्ला दिला की, आपल्याला सीमेच्या क्षेत्रांमध्ये फिटनेससंबंधित आणखी काही कार्यक्रम आणले पाहिजेत. जे फिट इंडिया आणि एक भारत श्रेष्ठ भारत अभिनयासह जोडले जाऊ शकतात. या कार्यक्रमात सीमालगतच्या क्षेत्रात फिटनेस कार्यक्रम ठेवला जाईल. तरुणांना सीमेलगतचे परिसर आणि गावांसंदर्भात जाणून आणि पाहण्याची संधी मिळेल. त्यांनी असे ही म्हटले की, सीमालगतच्या क्षेत्रात राहणाऱ्या तरुणंना सुद्धा मेट्रो शहरांमधील आयुष्याचा सुद्धा अनुभव मिळाला पाहिजे.
हे देखील वाचा- वयाच्या ९४ व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत कशी मिळवली पदकं? वाचा आजींबद्दल अधिक
फिट@50+ महिला ट्रांन्स हिमालयन अभियानातील टीम
बछेंद्री पाल, डॉ सुषमा बिस्सा, बिमला देवस्कर, चेतना साहू, गंगोत्री सोनेजिक, एल अन्नपूर्णा, मेजर कृष्णा दुबे, वसुमति श्रीनिवासनी, पायो मुर्मू, सविता धापवाल, शामला पद्मनाभनी, भानु रानी, अविनाश श्रीनिवास देओस्कर, रणदेव सिंह, मोहन सिंह रावत, हेमंत गुप्ता, आशीष कुमार सक्सेना.