अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एन्सिनिटास बीचवर एक मासा मृतावस्थेत मिळाला. ही खरंतर सर्वसामान्य घटना आहे. पण या माशाचे नाव ऐकल्यावर तमाम अमेरिकेत कुजबूज सुरु झाली. या माशाला ओअरफिश, डूम्सडे फिश किंवा फिश ऑफ द लास्ट डे या नावानं हा मासा कुप्रसिद्ध आहे. आणखी एक नाव या माशाला मिळालं आहे, ते म्हणजे, कयामतचा मासा. हा मासा कधीही समुद्र किना-यावर येत नाही. फारकाय कोणत्याही मासेमाराच्या जाळ्यात तो सापडत नाही. अत्यंत खोल समुद्रात त्याचे वास्तव्य असते. पण हा मासा जेव्हा एखाद्या मासेमाराला सापडतो, किंवा तो किना-यावर दिसतो, तेव्हा मात्र तो अपशकून असल्याची धारणा आहे. आता तर तो मृतावस्थेत सापडला आहे, त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. (Fish of the Last Day)
हा ओअरफिश दुर्मिळ आहे, आणि तो किना-यावर येण्याची घटनाही दुर्मिळ आहे. मात्र गेल्या वर्षभरात अमेरिकेच्या किना-यावर असे तीन ओअरफिश मृतावस्थेत सापडल्यामुळे ही विनाशाची घंटा तर नाही, अशा चर्चा येथील सोशल मिडियामध्ये सुरु झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात अमेरिकेत येणा-या वादळांनी मोठे नुकसान केले आहे. त्यातच आता कॅलिफोर्नियामध्ये बॉम्ब चक्रीवादळ येत असून त्यांनी मोठी हानी होण्याची शक्यता आहे. शिवाय रशिया युक्रेनच्या युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला दिलेला क्षेपणास्त्रांचा साठा आणि यावरुन रशियानं दिलेला अण्वस्त्र वापराचा इशारा या सर्व घटना पहाता पुढचे काही महिने अमेरिकेसाठी तापदायक असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याअनुशंगानं बाबा वेंगा यांची भविष्यवाणीही व्हायरल होऊ लागली आहे. समुद्राच्या पोटात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मानवासाठी गुढ आहेत. अनेक जलचर आपल्याला माहित नाहीत. त्यापैकीच एक आहे ओअरफिश. हा मासा डूम्सडे फिश आणि फिश ऑफ लास्ट डे म्हणून ओळखला जातो. शक्यतो हा मासा समुद्र किना-यावर दिसतच नाही. आणि तो जर दिसला तर तो सर्वात मोठा अपशकून मानला जातो. असाच ओअरफिश दक्षिण कॅलिफोर्नियातील एन्सिनिटास किना-यावर तिसऱ्यांदा मृत सापडला. या माशाला जपानी कथांमध्ये विनाशाची चाहूल सांगणारा मासा अशी उपमा दिली आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी ही धोक्याची सूचना असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (International News)
हा दुर्मिळ मासा सुमारे 10 फूट लांबीचा आहे. हा मासा भयंकर भूकंपाची सूचना घेऊन येतो, असेही मानले जाते. प्रामुख्यानं जपानी कथांमध्ये या माशाबरोबर असलेल्या अपशकुनांच्या अनेक कथा आहेत. 17 व्या शतकातील या जपानी लोककथेनुसार, ओअरफिश समुद्र देवता र्युजिनच्या सेवकांचे प्रतिनिधित्व करतात. समुद्र देवता काही विनाश येणार असल्यास या माशाला संदेशवाहक म्हणून ती सूचना देण्यासाठी किना-यावर पाठवतात असे सांगण्यात आले आहे. आता एन्सिनिटास किना-यावर हा मासा तिस-यांदा दिसल्यामुळे येथे चर्चांना उत आला आहे. समुद्राच्या खोल भागात राहणारे हे मासे अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यामुळे आता या ओअरफिशचे शवविच्छेदन करुन त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे तपासले जाणार आहे. तसेच त्याला सागरी संग्रहालयात भविष्यातील अभ्यासासाठी जतन करुन ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात असाच मासा किना-यावर आला होता. अभ्यासकांच्या एका गटाच्या मते खोल समुद्रात होणा-या भुकंपसदृश्य घटनांमुळे हे मासे किना-यावर येतात. (Fish of the Last Day)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
मात्र त्यांना खोल समुद्रात राहण्याची सवय असल्यामुळे किना-यावर येताच त्यांचा मृत्यू होतो. या सर्वात या ओअरफिशमाशाबाबत अपशकूनाच्या अनेक घटनांचे आवरण आहे. मार्च 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या सर्वात मोठा भूकंप आधीच तेथील समुद्रकिनाऱ्यावर ओरफिश दिसले होते. आता हाच मासा अमेरिकेच्या समुद्रकिना-यावर दिसला आहे. काही दिवसातच या समुद्रकिना-यावर बॉम्ब नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हे सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक असल्याची माहिती अमेरिकेच्या हवामान अभ्यासकांनी दिली आहे. शिवाय या बॉम्ब वादळामुळे अमेरिकेतली अनेक राज्यांमध्ये विनाशकारी परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तीव्र वारे, प्रचंड हिमवृष्टी आणि पाऊस होणार असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉशिंग्टन राज्यापासून ओरेगॉन आणि उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत लाखो अमेरिकन लोकांवर याचा परिणाम होणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. अशातच हा ओअरफिश मासा मिळाल्यामुळे येथे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (International News)
सई बने